तुमसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरून पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही तांदळाची मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकूण २१ राइस मिल आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."तुमसर रोड" हे नागपूर - कोलकाता या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य रेल्वे स्थानक या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्गाची शाखा तिरोडीस गेली आहे. या रेल्वेमार्गावरून तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे मध्य प्रदेशातील कटंगी जवळ असलेल्या मॅंगेनिझ ओर ऑफ इंडियाच्या खाणींमधुन मॅंगेनिझ वाहतुक होते.

भंडारा जिल्ह्यातील तालुके
भंडारा तालुका | साकोली | तुमसर | पवनी | मोहाडी | लाखनी | लाखांदूर