तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानक

तुमसर रोड जंक्शन किंवा तुमसर रोड रेल्वे स्थानक (स्टेशन कोड: TMR ) हे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक तुमसर शहराला व आजूबाजूच्या गावण भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'तुमसर-तिरोडी-कटंगी-बालाघाट' आणि 'नागपूर-तुमसर-गोंदिया रायपुर' हे दोन लोहमार्ग तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकसशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणाऱ्या अनेक 'प्रवासी,मेल-एक्स्प्रेस, जलद (सुपरफास्ट )' इत्यादी गाड्या तुमसर रोड स्थानकात थांबतात. तुमसर रोड रेल्वे स्थानक तुमसर शहरापासून ५ किमी अंतरावर आहे.[]

इतिहास

संपादन

या स्थानकातून जाणाऱ्या संपूर्ण रेल्वे मार्गिकेचे विद्युतीकरण झाले आहे. गोंदिया-भंडारा रोड विभागाचे १९९०-९१ मध्ये विद्युतीकरण करण्यात आले.[] तुमसर रोड स्टेशन हे विद्युतीकरणाच्या भंडारा रोड-गोंदिया या दोन रेल्वे स्थानाकांच्या मध्ये स्थित आहे.[]

महत्त्वाच्या गाड्यांची यादी

संपादन
गाडी क्रमांक नाव कधी
११०३९ / ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस रोज
१८०२९ / १८०३० शालिमार एक्सप्रेस रोज
१८२४० / शिवनाथ एक्सप्रेस रोज
१८२३७ / छत्तीसगड एक्सप्रेस रोज
१८२३९ / गेवरा रोड-नागपूर शिवनाथ एक्सप्रेस
२२६१९ / तिरुनेलवेली-बिलासपूर एक्सप्रेस
१२४०९ रायगड- हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस
१२८०७ समता एक्सप्रेस
१२१०६ विदर्भ एक्सप्रेस रोज
१२१३० आझाद हिंद एक्सप्रेस रोज
१२८३४ हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस रोज
१२८१० हावडा मुंबई मेल ( नागपूर मार्गे) रोज
२२६४७ / २२६४८ कोरबा कोचुवेली एक्सप्रेस
१२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस
०८२६८ रायपुर एक्सप्रेस स्पेशल
१८१०९ / १८११० इतवारी-टाटानगर एक्सप्रेस
तिरोडी-तुमसर रोड डेमू
०८७४३ इतवारी-गोंदिया मेमू स्पेशल
इतवारी-तिरोडी पॅसेंजर स्पेशल
०८२८२ तिरोडी-इतवारी पॅसेंजर स्पेशल

समस्या आणि आव्हान

संपादन

तुमसर, मोहाडी व गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचा सीमावर्ती भाग, तसेच मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिणेकडील गावांतील नागरिक या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत; पण या स्थानकात बहुतांश गाड्यांचे थमयबे नाहीत. वाढत्या लोकसंख्येबरोबर तुमसर रोड रेल्वे स्थानकावरही काही समस्या आणि आव्हाने निर्माण झाली आहेत.

प्रमुख समस्या

संपादन
  • अस्वच्छता: वाढत्या गर्दीचा परिणाम हा स्थानकातील 'स्वच्छता आणि सुव्यवस्था' राखण्यावर होत आहे.
  • अपुरे प्लॅटफाॅर्म: तुमसर रोड जंक्शन स्थानकात सध्या ५ प्लॅटफाॅर्म आहेत.

प्रमुख आव्हाने

संपादन

प्रमुख प्रस्ताव

संपादन

तुमसर रेल्वे स्थानकाच्या संदर्भात विविध विचारवंत आणि भंडारा जिल्ह्यातील प्रवासी संघटना यांनी पुढील प्रस्ताव ठेवले आहेत.

  • तुमसर रोड-तुमसर टाऊन-रामटेक रेल्वेमार्ग

स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या २०१६ मध्ये सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली होती. यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे होता. हा रेल्वे मार्ग तिरोडी-कटंगी-बालाघाट मार्गाला जोडण्याचा रेल्वेचा प्रस्ताव होता. परंतु अद्यापही या कामाच्या बाबतीत हालचाली दिसत नाहीत.[][]

  • अमृत भारत स्थानक योजनेत समावेश

तुमसर रोड रेल्वेस्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश झाला. या योजनेच्या माध्यमातून दोनही रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे. रेल्वे स्थानक अतिशय देखणे व निटनेटके राहणार आहे. प्रवाशांसाठी आरोग्य सुविधा वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, रेल्वे स्थानकावर एटीएमची सुविधा, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, शुद्ध पाणी आणि रेल्वे कर्मचान्यासाठी अत्याधुनिक सदनिका बांधण्यात येणार आहे.[]

शोभिवंत फलाट

संपादन

उपलब्ध नाही.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Jayashree. "37 Departures from Tumsar Road SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2023-01-09 रोजी पाहिले.
  2. ^ "History of Electrification". IRFCA. 2016-01-14 रोजी पाहिले.
  3. ^ "[IRFCA] Electrification History from CORE". irfca.org. 2023-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ author/admin (2016-09-06). "रामटेक-तुमसर रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला हिरवी झेंडी". Lokmat. 2023-01-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Rail line | तुमसर टाउन से रामटेक तक बिछाए रेल लाइन, पैसों के साथ समय की होगी बचत | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2023-01-09 रोजी पाहिले.
  6. ^ epaper.lokmat.com http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HBHN_20230203_1_11. 2023-02-05 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)