रुरकेला
रुरकेला (हिंदीत रुड़केला, इंग्रजीत Rourkela) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात झारखंड राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस ३४० किलोमीटरवर, तर जमशेदपूरच्या नैर्ऋत्येस २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती.
रुरकेला ରାଉରକେଲା |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | ओडिशा |
जिल्हा | सुंदरगढ जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२१ फूट (२२० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,७२,७२१ |
- महानगर | ५,५२,२३९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
रुरकेला येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस हा देखील रुरकेलामध्ये आहे.
वाहतूक
संपादनरुरकेला रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या हावडा-नागपूर-मुंबई ह्या प्रमुख मार्गावर दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ रुरकेलामधून जातो.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- पर्यटन माहिती Archived 2015-09-24 at the Wayback Machine.