নবরত্ন (bn); Navratna (fr); Navratna (en); नवरत्न कंपन्या (mr); നവരത്ന കമ്പനികൾ (ml); नवरत्न कम्पनियाँ (hi) Categorization of Indian PSEs (en); Categorization of Indian PSEs (en) നവരത്ന (ml)

१९९७ साली, नवरत्‍न हा किताब भारत सरकारने देशामधील ९ सर्वात मोठ्या व बलाढ्य सरकारी कंपन्यांना दिला होता. हा शब्द नऊ मौल्यवान खडे नवरत्‍ने ह्यावरून दिला गेला. सध्या भारतामधील सर्व सरकारी कंपन्या (पब्लिक सेक्टर) खालील गटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ह्या कंपन्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे विविध गुंतवणुकीचे व स्वायत्ततेचे अधिकार दिले गेले आहेत.

नवरत्न कंपन्या 
Categorization of Indian PSEs
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय
मालक संस्था
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

प्रकार

संपादन
  • महारत्‍न
    • तीन वर्षे वार्षिक निव्वळ नफा   5000 कोटी पेक्षा अधिक
    • निव्वळ मूल्य   15000कोटी
    • एकूण उलाढाल   २५,००० कोटी
  • नवरत्‍न
    • निव्वळ नफा, निव्वळ मूल्य, उत्पादन क्षमता, उत्पादन खर्च, सेवा खर्च, भांडवल इत्यादी ६ घटकांवर आधारित चाचणीमध्ये १०० पैकी किमान ६० गूण
    • कंपनी नवरत्‍न बनण्यापूर्वी मिनिरत्‍न असणे आवश्यक.
  • मिनिरत्‍न वर्ग-१
    • मागील ३ वर्षे सलग नफा कमवला आहे किंवा एका वर्षात   ३० कोटी नफा कमवला आहे
  • मिनिरत्न वर्ग-२
    • बाजार मूल्य शून्याहून अधिक आहे व गेली तीन वर्षे नफा कमवला आहे.

भारतामध्ये एकूण 11 महारत्‍न, १४ नवरर्‍न, 61 मिनिरत्‍न वर्ग-१ तर 12 मिनिरत्‍न वर्ग-२ कंपन्या आहेत.

महारत्‍न कंपन्या

संपादन
  1. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड[]
  2. कोल इंडिया लिमिटेड []
  3. गेल (इंडिया) लिमिटेड[]
  4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन []
  5. एन.टी.पी.सी. []
  6. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन []
  7. स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
  8. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  9. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
  10. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
  11. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

नवरत्‍न कंपन्या

संपादन
  1. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
  2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
  3. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
  4. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड
  5. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
  6. नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन
  7. ऑइल इंडिया लिमिटेड
  8. राष्ट्रीय इस्पात निगम
  9. रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन
  10. भारतीय नौवहन निगम

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "- Dept of Public Enterprises, Govt. of India" (PDF). 2013-08-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-11-25 रोजी पाहिले.
  2. ^ Coal India gets Maharatna tag - Economic Times Article
  3. ^ 5 PSUs get maharatna status - Indianexpress
  4. ^ 4 PSUs get maharatna status - Indianexpress
  5. ^ http://www.thehindu.com/business/companies/maharatna-status-for-ioc-ongc-and-ntpc/article890235.ece