गेल (इंडिया) लिमिटेड (इंग्लिश:Gas Authority of India Limited, बी.एस.ई.532155, एन.एस.ई.GAIL) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली गेल इंडिया देशातील नैसर्गिक वायूद्रवित पेट्रोलियम वायूचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. १९८४ साली स्थापन झालेल्या गेल इंडियाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून तिच्या सेवेचे जाळे भारतभर पसरले आहे.

गेल (इंडिया) लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.532155
एन.एस.ई.GAIL
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
स्थापना इ.स. १९८४
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती बी.सी. त्रिपाठी
उत्पादने नैसर्गिक वायू, खनिज तेल, वीज निर्मिती
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ४७३.३३ अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया ४०.२२ अब्ज
कर्मचारी ३,९९४ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.gailonline.com

गेल कंपनी ही वाहनांमध्ये वापरल्या जात असलेल्या नैसर्गिक वायू तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एल.पी.जी.चे वितरण इतर सरकारी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे करते. मुंबई महानगर क्षेत्रामधील अनेक स्थानांमधील घरांमध्ये स्वयंपाकासाठी पाईपने वायू पुरवणारी महानगर गॅस लिमिटेड तसेच पुणे परिसरात ही सेवा पुरवणारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड इत्यादी अनेक कंपन्यांमध्ये गेल इंडियाची भागीदारी आहे.

बाह्य दुवे संपादन