दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग

भारतामधील रेल्वे मार्ग
(दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्लीचेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा २,१८२ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशतमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा, आग्रा, झाशी, भोपाळ, नागपूर, विजयवाडा इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत.

दिल्ली–चेन्नई रेल्वेमार्ग
प्रदेश दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशतमिळनाडू
मालक भारतीय रेल्वे
चालक उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी २,१८२ किमी (१,३५६ मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी; १९८०-१९९१ दरम्यान
कमाल वेग १६० किमी/तास
मार्ग नकाशा
Grand Trunk Express and Tamil Nadu Express (NDLS-MAS) Route map.jpg

प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • दिल्ली-आग्रा पट्टा
  • आग्रा-भोपाळ पट्टा
  • भोपाळ-नागपूर पट्टा
  • नागपूर-काझीपेठ पट्टा
  • काझीपेठ-विजयवाडा पट्टा
  • विजयवाडा-चेन्नई पट्टा

दिल्ली व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या तमिळनाडू एक्सप्रेस, चेन्नई राजधानी एक्सप्रेस, ग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.