रामगुंडम

तेलंगणााच्या पेद्दापल्ली जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख औद्योगिक शहर


रामगुंडम हे तेलंगणााच्या पेद्दापल्ली जिल्ह्याचे मुख्यालय व एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. रामगुंडम शहर तेलंगणाच्या उत्तर भागात गोदावरी नदीच्या काठावर करीमनगरच्या ६० किमी ईशान्येस तर हैदराबादच्या २५० किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली रामगुंडमची लोकसंख्या सुमारे २.२९ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

रामगुंडम
రామగుండం
भारतामधील शहर

येथील एन.टी.पी.सी.चे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र
रामगुंडम is located in तेलंगणा
रामगुंडम
रामगुंडम
रामगुंडमचे तेलंगणामधील स्थान

गुणक: 18°45′50″N 79°28′30″E / 18.76389°N 79.47500°E / 18.76389; 79.47500

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
जिल्हा पेद्दापल्ली जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ५८७ फूट (१७९ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,२९,६४४
  - महानगर २,५२,३०८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

रामगुंडम येथे दक्षिण भारतामधील सर्वात मोठे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. २६०० मेगावॉट क्षमतेचे येथील एन.टी.पी.सी. केंद्र आय.एस.ओ. १४००१ प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले वीजनिर्मिती केंद्र होते. येथे तयार होणारी वीज तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूकेरळ ह्या ६ राज्यांना पुरवली जाते.

रामगुंडम रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर असून येथे अनेक एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.