करीमनगर
करीमनगर हे तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. करीमनगर शहर तेलंगणाच्या उत्तर मध्य भागात वसले असून ते हैदराबादच्या १६४ किमी ईशान्येसस स्थित आहे. २०११ साली करीमनगरची लोकसंख्या सुमारे २.६१ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
करीमनगर కరీంనగర్ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | तेलंगणा |
जिल्हा | करीमनगर जिल्हा |
क्षेत्रफळ | ४० चौ. किमी (१५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,६३४ फूट (४९८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,६१,१८५ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
करीमनगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.
बाह्य दुवे
संपादन- करीमनगर महापालिका Archived 2016-06-25 at the Wayback Machine.