एन.टी.पी.सी. लिमिटेड

(एन.टी.पी.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)

एन.टी.पी.सी. लिमिटेड (जुने नाव: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन; बीएसई.532555, एनएसई.NTPC) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेली एन.टी.पी.सी. वीज निर्मिती करणारी भारतामधील सर्वात मोठी कंपनी आहे. सध्या सर्व एन.टी.पी.सी. वीजनिर्मिती केंद्रांची एकत्रित क्षमता ४१,७९४ मेगावॉट इतकी आहे जी भारतामधील एकूण वीजनिर्मितीच्या सुमारे १८ टक्के आहे.

एन.टी.पी.सी. लिमिटेड
प्रकार सरकारी कंपनी
संक्षेप बी.एस.ई.532555
एन.एस.ई.NTPC
बी.एस.ई. सेन्सेक्स सदस्य
एस.&पी. सी.एन.एक्स. निफ्टी सदस्य
उद्योग क्षेत्र वीज निर्मिती
स्थापना इ.स. १९७५
मुख्यालय भारत नवी दिल्ली, भारत
महत्त्वाच्या व्यक्ती अरूप रॉय चौधरी
उत्पादने वीज निर्मिती, वितरण
महसूली उत्पन्न भारतीय रूपया ७२५.४० अब्ज
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
भारतीय रूपया १६६.११ अब्ज
कर्मचारी २५,४८४ (मार्च २०१३)
संकेतस्थळ www.ntpc.co.in

वीजनिर्मिती केंद्रे व क्षमता

संपादन

एन.टी.पी.सी. कोळशावर चालणारे १७ तर वायूवर चालणारे ८ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प चालवते. ह्यांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकल्पांमध्ये एन.टी.पी.सी.ची भागेदारी आहे.

कोळशावर चालणारे

संपादन
क्र. प्रकल्प राज्य क्षमता
1 सिंगरौली औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश 2,000
2 एन.टी.पी.सी. कोर्बा छत्तीसगड 2,600
3 एन.टी.पी.सी. रामगुंडम, करीमनगर जिल्हा आंध्र प्रदेश 2,600
4 फराक्का औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, मुर्शिदाबाद जिल्हा पश्चिम बंगाल 2,100
5 एन.टी.पी.सी. विंध्याचल, सिंगरौली जिल्हा मध्य प्रदेश 4,260
6 रिहंड औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश 3,000
7 कहलगांव औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, भागलपूर जिल्हा बिहार 2,340
8 दाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश 1,820
9 तालचेर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, अंगुल जिल्हा ओडिशा 3,000
10 फिरोज गांधी उंचहर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, राय बरेली जिल्हा उत्तर प्रदेश 1,050
11 तालचेर वीजनिर्मिती प्रकल्प ओडिशा 460
12 सिम्हाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, विशाखापट्टणम जिल्हा आंध्र प्रदेश 2000
13 टांडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, आंबेडकर नगर जिल्हा उत्तर प्रदेश 440
14 बदरपूर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प दिल्ली 705
15 बाढ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, पटना जिल्हा बिहार 3300
16 सिपात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बिलासपूर जिल्हा छत्तीसगड 2980
17 मौदा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, नागपूर जिल्हा महाराष्ट्र 1,000
एकूण 35,655

वायूवर चालणारे

संपादन
क्र. प्रकल्प राज्य क्षमता
1 अंता औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बरान जिल्हा राजस्थान 413
2 औरेया औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, औरैया जिल्हा उत्तर प्रदेश 652
3 कावस औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, सुरत जिल्हा गुजरात 645
4 दाद्री औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उत्तर प्रदेश 817
5 झनोर-गंधार औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, भरूच जिल्हा गुजरात 648
6 राजीव गांधी वीजनिर्मिती प्रकल्प, अलप्पुळा जिल्हा केरळ 350
7 फरीदाबाद औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, फरीदाबाद जिल्हा हरयाणा 430
एकूण 5895

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन