आग्रा छावणी रेल्वे स्थानक
आग्रा छावणी हे उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्ली व उत्तरेकडून मध्य रेल्वेमार्गे मुंबई व पुण्याकडे धावणाऱ्या गाड्या देखील येथे थांबतात.
आग्रा छावणी भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | आग्रा, उत्तर प्रदेश |
गुणक | 27°9′30″N 77°59′25″E / 27.15833°N 77.99028°E |
मार्ग | दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग |
फलाट | ६ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १९०४ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | AGC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | उत्तर मध्य रेल्वे |
स्थान | |
|
ताजमहाल, आग्र्याचा किल्ला इत्यादी जगप्रसिद्ध वास्तू असलेले आग्रा हे भारतामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ह्यामुळे आग्र्याला वर्षाकाठी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात.