बंगळूर सिटी रेल्वे स्थानक
बंगळूर सिटी रेल्वे स्थानक हे बंगळूर महानगरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या बंगळूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज १०० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या सुटतात. हे स्थानक बंगळूरच्या मध्यभागात मॅजेस्टिक बस स्टॅंडच्या जवळच स्थित आहे. नम्मा मेट्रोच्या जांभळ्या मार्गिकेवरील स्थानक येथून जवळ बांधण्यात आले आहे ज्यामुळे बंगळूर स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे. बंगळूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी शहराच्या उत्तर भागात यशवंतपूर रेल्वे स्थानक उघडण्यात आले.
बंगळूर सिटी भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | बंगळूर, कर्नाटक |
गुणक | 12°58′42″N 77°34′10″E / 12.97833°N 77.56944°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ९०३ मी |
फलाट | १० |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | SBC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
प्रमुख गाड्या
संपादन- बंगळूर-चेन्नई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस
- म्हैसूर-चेन्नई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस
- बंगळूर-हुबळी जन शताब्दी एक्सप्रेस
- बंगळूर-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस
- बंगळूर-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- बंगळूर-मुंबई उद्यान एक्सप्रेस
- बंगळूर-कोल्हापूर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
- बंगळूर-म्हैसूर राज्यराणी एक्सप्रेस