नम्मा मेट्रो
नम्मा मेट्रो (कन्नड : ನಮ್ಮ ಮೆಟ್ರೊ अर्थ:आमची मेट्रो ) अथवा बंगळूरू मेट्रो ही भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळूरू येथे असणारी एक जलद परिवहन सेवा आहे. याचे निर्माण कार्य त्यासाठी निर्धारित संस्था बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन (बीएमआरसीएल) ने केले.या मेट्रोचे उद्घाटन २० ऑक्टोबर २०११ला झाले.याची प्रथम मार्गिका बयप्पनहल्ली ते महात्मा गांधी मार्ग (एम.जी.रोड) या दरम्यान तयार झाली.[१] हे सध्या दिल्ली मेट्रो आणि हैदराबाद मेट्रो नंतरचे भारतातील सर्वात लांब मेट्रोचे नेटवर्क आहे. या मेट्रोमुळे बंगळूरू तील अती गर्दीच्या भागातील वाहतूकीत सुधारणा होईल व तेथील ताण कमी होईल असा अंदाज आहे.[२]
नम्मा मेट्रो | |
---|---|
स्थान | बंगळूरू, कर्नाटक, भारत |
वाहतूक प्रकार | जलद परिवहन |
मार्ग | २ |
मार्ग लांबी | ४२.३ किमी कि.मी. |
दैनंदिन प्रवासी संख्या | ४,४०,००० दररोज |
सेवेस आरंभ | 20 ऑक्टोबर 2011 |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी) |
चित्रदालन
संपादन-
बयप्पनहल्ली टर्मिनस
-
पर्पल लाइनचा पूर्ण भाग
-
बयप्पनहल्ली टर्मिनस वर उभी मेट्रो ट्रेन
संदर्भ
संपादन- ^ "Namma metro to chug on October 20 - southindia - Bangalore - ibnlive". 2011-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-21 रोजी पाहिले.
- ^ "Metro comes to Bangalore finally". द टाइम्स ऑफ़ इण्डिया . 20 ऑक्टोबर 2011. 2011-10-20 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-12-27 रोजी पाहिले.
हेही बघा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- बेंगलुरु मेट्रो रेल कार्पोरेशन लि. Archived 2011-10-23 at the Wayback Machine.
- बीएमआरसीचा अधिकृत मार्ग नकाशा Archived 2011-10-23 at the Wayback Machine.
- प्रजा मेट्रो ट्रैकर Archived 2011-10-12 at the Wayback Machine.