गोंदिया रेल्वे स्थानक

गोंदिया जंक्शन हे भारत देशाच्या गोंदिया शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. गोंदिया शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे गोंदिया हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग गोंदियामधूनच जातो. गोंदिया-जबलपूर ह्या रेल्वेमार्गाचे पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर दिल्ली-चेन्नई गाड्या गोंदियामार्गे धावू शकतील. ह्यामुळे गोंदियाचे महत्त्व वाढीस लागण्याची क्षमता आहे.

गोंदिया
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता गोंदिया, गोंदिया जिल्हा
गुणक 21°27′42″N 80°11′32″E / 21.46167°N 80.19222°E / 21.46167; 80.19222
समुद्रसपाटीपासूनची उंची १०२० मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत G
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
गोंदिया is located in महाराष्ट्र
गोंदिया
गोंदिया
महाराष्ट्रमधील स्थान

गोंदियामधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा