जोरहाट

भारतातल्या आसाम राज्यातील नगर


जोरहाट (आसामी: শিলচর) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जोरहाट शहर आसामच्या पूर्व भागात गुवाहाटीच्या ३०० किमी पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून ते पूर्व आसामधील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. जोरहाट आहोम साम्राज्याचे अखेरचे राजधानीचे शहर होते. २०११ साली येथील लोकसंख्या १.२६ लाख इतकी होती.

जोरहाट
শিলচর
आसाममधील शहर

जोरहाट टाउन रेल्वे स्थानक
जोरहाट is located in आसाम
जोरहाट
जोरहाट
जोरहाटचे आसाममधील स्थान

गुणक: 26°45′0″N 94°13′12″E / 26.75000°N 94.22000°E / 26.75000; 94.22000

देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
जिल्हा जोरहाट जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १९०९
क्षेत्रफळ ९ चौ. किमी (३.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३८० फूट (१२० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,२६,७३६
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

येथून उत्तरेला ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली हे नदीपात्रात असलेले जगतील सर्वात मोठे बेट आहे.[ संदर्भ हवा ]

जोरहाट टाउन रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या तिनसुकिया विभागाच्या अखत्यारीत येते. जोरहाट विमानतळ जोरहाट शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित असून येथून बंगळूर, गुवाहाटीकोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे.

आसाम कृषी विद्यापीठाचे आवार जोरहाटमध्ये आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत