कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक

कानपूर सेंट्रल हे उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वद्रळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात.

कानपूर सेंट्रल
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कानपूर, उत्तर प्रदेश
गुणक 26°27′16″N 80°21′4″E / 26.45444°N 80.35111°E / 26.45444; 80.35111
मार्ग दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग
दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग
कानपूर-झाशी मार्ग
जोडमार्ग कानपूर-लखनौ मार्ग
फलाट १४
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९३०
विद्युतीकरण होय
संकेत CNB
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर मध्य रेल्वे
स्थान
कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक is located in उत्तर प्रदेश
कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक
उत्तर प्रदेशमधील स्थान
स्थानकाची इमारत

१९३० साली बांधून पूर्ण झालेल्या कानपूर स्थानकाच्या इमारतीचे स्थापत्य लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकासोबत मिळतेजुळते आहे.

गाड्या

संपादन

येथे हावडा राजधानीसह एकूण ७ राजधानी एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.