हावडा–गया–दिल्ली रेल्वेमार्ग

(दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

दिल्ली–गया-हावडा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्लीकोलकाता ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,४४९ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल ह्या राज्यांमधून धावतो. अलीगढ, कानपूर, अलाहाबाद, गया, धनबाद इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग हा देखील दिल्ली व कोलकात्यादरम्यान धावतो व दोन पट्टे सोडले तर दिल्ली-गया-हावडा नार्ग हा मुख्य मार्गाचाच भाग मानला जातो.

दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग
प्रदेश दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपश्चिम बंगाल
मालक भारतीय रेल्वे
चालक पूर्व रेल्वे, पूर्व मध्य रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी १,४४९ किमी (९०० मैल)
ट्रॅकची संख्या
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी; १९६०-१९६६ दरम्यान
कमाल वेग १६० किमी/तास

प्रशासकीय सोयीसाठी दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग हा मार्ग खालील पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे.

  • दिल्ली-कानपूर पट्टा
  • कानपूर-मुघलसराई पट्टा
  • मुघलसराई-गया पट्टा
  • गया-आसनसोल पट्टा
  • आसनसोल-बर्धमान पट्टा
  • बर्धमान-हावडा पट्टा

दिल्ली व कोलकाता दरम्यान धावणाऱ्या सियालदाह राजधानी एक्सप्रेस, पश्चिम बंगाल संपर्क क्रांती एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.