धनबाद
धनबाद (संताली: ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १४६ किमी ईशान्येस व कोलकात्याच्या २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनबादची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख होती.
धनबाद ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ |
|
भारतामधील शहर | |
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे झारखंडमधील स्थान |
|
ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽचे भारतमधील स्थान |
|
देश | भारत |
राज्य | झारखंड |
जिल्हा | धनबाद जिल्हा |
क्षेत्रफळ | ५७७ चौ. किमी (२२३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७२८ फूट (२२२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ११,६२,४७२ |
- महानगर | ११,९६,२१४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे भारताची कोळसा राजधानी असा खिताब धनबादला देण्यात येतो.
वाहतूक
संपादनधनबाद रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-गया-हावडा ह्या प्रमुख लोहमार्गावर स्थित असून येथे दररोज सुमारे १०० गाड्या थांबतात. धनबाद येथे पूर्व मध्य रेल्वेच्या धनबाद विभागाचे मुख्यालय देखील आहे. दिल्ली-कोलकातादरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग २ धनबादमधूनच जातो. सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३२ धनबादला जमशेदपूरसोबत जोडतो.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- संकेतस्थळ Archived 2009-02-23 at the Wayback Machine.