सदस्य चर्चा:Sankalpdravid/जुनी चर्चा ३
विकिचित्रे
संपादन- आपल्या सुचनां व मदतीसाठी धन्यवाद.
- मागे मी मौज व राजहंस प्रकाशनांना विकिचित्रांच्या वापरासंबधी ईमे्ल पाठवला होता. मात्र अजुन त्यास उत्तर आलेले नाही. सध्यातरी मी चढवलेली, प्रताधिकारित चित्रे त्या त्या लेखांतुन काढुन टाकत आहे. परवानगी मिळाल्यावर ती पुन्हा बहाल करता येतील. किंवा...
- ...किंवा; ’वरील प्रताधिकारित चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल परवानग्या मिळवण्याचे काम चालू आहे’ असाही साचा तयार करणे शक्य आहे काय.?
- विकिचित्रांच्या वापरासाठी 'Fair Use' या शिर्षकाखाली मला एखादा साचा तयार करुन मिळेल काय.? असा साचा मला तयार करता येऊ शकेल काय.?
अमित य़ादव ०६:१२, १७ जानेवारी २०१० (UTC)
गोउरी देशपाण्डे या लेखातील् चित्रांबद्दल्
संपादनकॄपया मला थोडा वेळ द्याल. मी मोउज् प्रकाशन्, राजहंस् प्रकाशन् यांना विरोप् (ईमेल्) पाठवला आहे. त्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत् आहे. परंतु, त्याआधी आपल्याला वाटत् असल्यास् (नियमबाह्य असल्यास) आपण् चित्रे आढुन् टाकु शकता. परवानगी मिळाल्यावर् ती पुन्हा चढव्ण्यात् येतील्.
अमित य़ादव ०८:२४, २९ डिसेंबर २००९ (UTC)
विकिनिद्रा?
संपादनसंकल्प,
बरेच दिवसांनी दिसलात...विकिनिद्रेत होता?
अभय नातू ०२:२३, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
सहाय्य:विस्तार:पृथकककारके
संपादननमस्कार Sankalpdravid/जुनी चर्चा ३,
सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.
धन्यवाद Mahitgar ०६:२४, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)
खाद्यपदार्थ
संपादनकाय योगायोग आहे पहा.एकाच वेळी खाद्यपदार्थातील चित्रे टाकण्याची (सु)बुद्धी झाली. दिवाळीच्या शुभेच्छा.मी आपले काम disturb तर नाही केले ना? तसे असल्यास माफी मागतो.
अल्पमती १७:३२, १८ ऑक्टोबर २००९ (UTC)
मी आपल्या संदेशाची नोंद घेतली आहे.असाच सल्ला मला माहीतगार यांनी दिला होता.परंतु तेथे संचिका चढविणे माझ्या तांत्रिक ज्ञाना अभावी कि काय,थोडे त्रासदायक वाटते.मी एकदा प्रयत्न केला होता,तो निष्फळ झाला.असो. त्यावेळेस मला विशेष अनुभव नव्हता.आता पुन्हा एकदा प्रयत्न करेन.आपण सुचविल्याप्रमाणे माझ्या जुन्या संचिकांची वर्गवारी केली आहे.आपण दाखविलेल्या आत्मियतेबद्दल धन्यवाद.
आपण त्यादिवशी दिवाळीनिमित्य विकिफराळ करविला याबद्दलपण धन्यवाद.
अल्पमती ०२:४३, २० ऑक्टोबर २००९ (UTC)
नमस्कार
संपादनबरेच दिवसांनी आलात! नमस्कार.
अल्पमती ०६:०६, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
स्वागत
संपादन- तुमचा संदेश आला तेव्हा डोके स्वागत साचातील त्रूटी शोधण्यात लागले होते. त्यामुळे त्रोटक उत्तर लिहिले (ते काम झाले स्वागत साचात बरेच बदल आढळतील) . तुमच्या संपर्काची निश्चितच वाट पहात आहे. माझ्या कडे असलेला तुमचा जुना इमेल व क्रमांक अन ऑपरेशनल झालेले दिसतात. ते मला sms करू शकाल तर संपर्क करणे सोपे होईल.माहितगार ०७:२९, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
टेस्टींग
संपादनकेवळ मराठी टायपिंगचे (वगवेगळ्या नामविश्व ठिकाणी) टेस्टींग करतो आहे. तुमच्या चर्चा पानावरील disturbance करिता क्षमस्व
साचा:चौकट
संपादन- साचा चौकट न्याहाळला असता त्यात काही सिंपल पाईप कॅरेक्टर | एवजी बराहातील । हे कॅरेक्टर वापरले गेले असे दिसते आहे. साचा क्लिष्ट असल्यामुळे मी स्वत: त्यात बदल करणे टाळले.आपल्याला ते find and replace ने सहज बदलता येईल असे वाटते. धन्यवाद माहितगार ०५:११, ११ डिसेंबर २००९ (UTC)
- तशी घाई नाही कालौघात् js आणि css अपडेट करण्याचा वेगळा प्रकल्प बनवता येईल काय ? मराठी सहप्रकल्पांना हे प्रश्न अधिक जाणवतात. बाकी सध्याच्या कामांना शुभेच्छा.
विकिवरील खाते बंद करण्यासंबंधी
संपादनगेले काही दिवस मी मराठी विकिपीडियावर भारतीय राजकारण या विषयावर माझे योगदान द्यायचा जाणीवपूर्वक आणि प्रामाणिक प्रयत्न करत होतो.गेले काही दिवस सकाळी उठल्यानंतर पहिले काम विकि बघणे असे.
पण गेल्या काही तासांत घडलेल्या घडामोडींमुळे माझा मराठी विकिवरील विश्वास उडाला आहे. मी लिहिलेले लेख परिपूर्ण नक्कीच नाहीत. पण त्यात बदल काय करावा याविषयी कोणताही रचनात्मक सल्ला न देता केवळ "या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी." असा शेरा मारला आहे. संबंधीची चर्चा चर्चापानावर असणे तर सोडाच तर चर्चापान तयारच नाही.
मराठी वेबदुनियेत इतर अनेक दर्जेदार संकेतस्थळे आहेत. मला वाटते मी माझे योगदान त्या संकेतस्थळांवर देऊ शकेन. माहितीचा स्त्रोत म्हणून कोणीही मराठी विकिपीडिया बघायला जात नाही. कारण महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीविषयी मराठी विकिपीडियापेक्षा अधिक माहिती इंग्रजी विकिपीडियावर उपलब्ध आहे.तेव्हा मराठी विकिपीडियापेक्षा मला इतर मराठी संकेतस्थळांवर लेखन करायला आवडेल.
सबब माझे मराठी विकिपीडियावरील खाते बंद करण्यात यावे ही विनंती. खाते बंद करता येत नसेल तरीही ’संभाजीराजे’ या नावाने मराठी विकिवर यापुढे एकही लेख दिसणार नाही.
संभाजीराजे ०२:१०, १२ डिसेंबर २००९ (UTC)
शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण.......
संपादनPlease consider following approaches to make it sound less intimidating and discouraging....
1. Avoid putting that message for the articles which already have { { विस्तार } } message.
2. Notify the member what exactly needs to be corrected so he/she doesn't repeat those mistakes.
Thank you.
--दीप देवेंद्र नरसे ०४:३३, १२ डिसेंबर २००९ (UTC)
- तुम्हा दोघांची चर्चा कोणत्या विशीष्ट लेखाच्या संदर्भाने चालू असल्यास कल्पना नाही, परंतु साचांमध्ये सुधारणांची आवश्यकता आहे याबाबत सहमत आहे.
- अजून सुधारणा विषयक सूचना लावलेल्या बहूसंख्य साचांचा उद्देश त्या लेखाचे संबधीत लेखाचे सुधारणा घडवून आणणार्या विशीष्ट प्रक्ल्पा संबधीत वर्गीकरणाचा असतो. या सुधारणा काळाच्या ओघात होणे अपेक्षीत असते आणि हे सहसा सार्वत्रिक सहयोगाचे अवाहन असते. पण बर्याचदा खासकरून नवीन सदस्य या सूचना साचे व्यक्तिगत टिपण्णी वाटत असावेत असे मला आढळून आले आहे. असा गैरसमज होऊ नये याकरिता काही तरी करावयास हवे पण नेमके काय करता येईल ते ठरवता येत नाही आहेत. काही सूचना असतील तर त्या कळवाव्यात.
- विस्तार साचात काहितरी तांत्रीक अडचण आहे कि ज्यामुळे तो बर्याचदा तुटल्या सारखा दिसतो.
- लेखांवर साचे लावण्याचे कारण बर्याचदा त्याचे आपोआप ज्या प्रकारची सुधारणाहवी आहे त्या वर्गात आणि प्रक्ल्पात वर्गीकरण होते.लेख पानावंर साचांची गर्दी होऊ नये म्हणून लेख प्रकल्पान्वये चर्चा पान साचे असावयास हवेत. पण हे सर्व करण्यास पुरेसे संपादन (सक्रीय सदस्य) बळ हवे या मुद्द्यावर गाडी येऊन अडते खरी.
- व्यक्तिगत प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू/मार्गदर्शक प्रकल्पाची योजना आखली आहे पाहू कसा काय रिस्पॉन्स मिळतो ते.
- शुद्धलेखन विषयक बर्याच साचांची मी रचना केली आहे ते संबधीत प्रकल्पात पाहून सुधारता येतील पण खास करून विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका साचात योगदान आणि त्याचा वापर सदस्यांकडून चर्चा पानावर वाढवून हवा आहे . तो कसा वाढवता येईल याबद्दलही प्रतिसादाची अपेक्षा आहे.माहितगार ०७:३०, १२ डिसेंबर २००९ (UTC)
माहिती चौकट साचे समजून घेण्यातील नवागतांच्या अडचणी
संपादन- रामनारायण_रुईया_महाविद्यालय लेखातील हा बदल अभ्यासल्यास नवागत सदस्यांना माहिती चौकट साचे समजून घेण्यात अडचनी येत आहेत असे दिसते.
- आपण याच विश्लेषण केल तर नवागताने विकि लेखात इतरत्र कोणतातरी माहिती चौकट साचा पाहिलेला असण्याची शक्यता दिसते.पण महोदय अजून ट्रायल ऍंड एरर वर आहेत. त्यामुळेच कदाचित बरोबरची चिन्हे वापरली आहेत.
- हे माहिती साचे खासकरून त्यातील डावी कडील व्हॆल्यूज इतरत्र कुठून ट्रान्सक्लूड होतात याचा नवागतांना अंदाजा येत नाही तसेच मूळ साचात बदल केल्या शिवाय डावीकडील व्हॅल्यूचे नाव बदलता येत नाही हे बहूतेक लोकांच्या लक्षात येत नाही.
- असे माहिती चौकट साचे कसे बनवायचे, मुळ साचात बदल कसे घडवायचे हे समजावून देण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे. उदाहरणार्थ नरसिकरजींना साचे संकलपना मी व्यवस्थित समजावून देऊ शकलो नाही आहे. त्या प्रमाणेच विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पावर काम करत असलेल्या *सदस्य:Prajakta pathare, चर्चा, योगदान||वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ यांच्याकरिताही मी भरपूर प्रयत्न केले पण साचा:जीवचौकट तसेच बरेच पर्यायी साचे देण्याचे प्रयत्न केले .पण एकुण साचा त्यांना हवा तसा बनत नाही आणि गाडी अडकलेली रहाते.
- एक एक साचा आपण या मंडळींना बनवूबन देऊही पण एकुणच माहितीचसाचांची निर्मिती आणि त्यातील बदल याकरिता काही सुलभ साधनांची गरज जाणवते.
- माहितगार ०७:१३, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- सदस्य अमीत तेंडूलकरांनी ते मराठी विकिवर नवीन असतानाच्या काळातील गोपाळ गणेश आगरकर मध्ये माहिती चौकटी एवजी HTML ने बनवलेला टेबल अजूनही आहे असे दिसले.माहितगार ०८:०१, १६ डिसेंबर २००९ (UTC)
विशेष:कार्यरतसदस्य
संपादन- आजकाल विशेष:कार्यरतसदस्य येथे सक्रीय सदस्यांची यादी उपलब्ध होतेमाहितगार १३:३५, १६ डिसेंबर २००९ (UTC)
बोधवाक्ये
संपादन- सुविचार प्रकल्पाच्या माध्य्मातून काही चिंतनीय बोधवाक्ये जी विकिपीडिया संकल्पना अधीक स्पष्ट करतील अशी सेंट्रल नोटीस च्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा मनोदय आहे.
- एक सुचलेल वाक्य देत आहे , त्यात काही सुधारणा किंवा दोन भागात सुचवता अले तर कळवावे. माहितगार १३:३५, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- चित्र कस बघायच ते दर्शकाला ठरवू द्या, चित्रे सर्व विषयांवरची काढा, त्यांचे स्वरूप वास्तवदर्शी ठेवा ,वेगवेगळे रंग आणि छटा सांभाळा, प्रताधिकारीत चित्रांची नक्कल टाळा
- इंग्रजी विकिपीडियातील प्रकल्पात वास्तवदर्शी सारखा शब्द आलातर त्याला एखाद्या सुयोग्य विकिपीडिया सहाय्य पानाचा दुवा दिला जातो माहितगार १३:३९, १६ डिसेंबर २००९ (UTC)
- चित्र कसे बघायचे ते दर्शकाला ठरवू द्या, सर्व विषयांवर चित्रे काढा, त्यांचे स्वरूप वास्तवदर्शी ठेवा ,वेगवेगळे रंग आणि छटा सांभाळा, प्रताधिकारीत चित्रांची नक्कल टाळा
वि. नरसीकर (चर्चा) ०७:०६, १७ डिसेंबर २००९ (UTC) हे शुद्धलेखन आहे. वरील आणि हे पडताळा. अचानक काम आल्यामुळे पुढे काही लिहु शकलो नाही.थोडक्यात आटोपते घेतले.माफी तर मी मागायला हवी. जसा जसा थोडका वेळ मिळेल तेंव्हा विकिवर येत असतो. येथे (नागपूरला) सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यात प्रश्न उपस्थित होतात. त्याचे कधी कधी फारच तातडिने उत्तर पाठवावे लागते.त्यामुळे अचानक गाशा गुंडाळावा लागला. पुन्हा एकवार माफी मागतो. वि. नरसीकर (चर्चा) ०८:३२, १७ डिसेंबर २००९ (UTC)
डेटेड पॅरामीटर टाकण्यात सहाय्य हवे
संपादन- कीर्तन लेखात आगामी किर्तनाचा कार्यक्रम देऊन मोबाईल नंबर दिले होते ती माहिती काढताना इरंग्रजी विकिपीडियातील en:Template:Contact info प्रमाणे साचा:संपर्क माहिती बनवून वापरला जो खालील प्रमाणे दिसतो
- संपर्क माहिती वगळली (पहा विकिपीडिया परिघात आंतरभूत न करता येणार्या माहितीसंबधी संकेत आणि मार्गदर्शन )..
- इंग्रजी विकिपीडिया यात पुढे डेटेड पॅरामीटर वापरते तसे करून देऊ शकल्यास बघावे माहितगार १३:४१, १७ डिसेंबर २००९ (UTC)
वसंतगड हा किल्ल्याबद्द्लचा लेख महाराष्ट्रातील किल्ले या संकिर्णात का दाखवत नाही.?
संपादनउत्तर देणे.
नक्की लक्ष ठेवेन
संपादनमाहितगार १५:०६, १७ डिसेंबर २००९ (UTC)
संपादन गती
संपादनसंकल्प,
अनेक दिवसांनी परतल्यावर तुम्ही येथील संपादनांचा जो झपाटा लावला आहे तो पाहून आनंद झाला. असे अनेक संपादक आपल्याला नवीन (ग्रेगरीय) वर्षात लाभो ही इच्छा/आशा.
अभय नातू १६:४८, १७ डिसेंबर २००९ (UTC)
सदर कॉपीराइटविषयक माहिती
संपादनमूळ छायाचित्रकार- माझे मित्र-पराग रेडिज व अजित साटम
स्रोत-कॅनॅन कंपनीचा कॅमेरा प्रताधिकारहक्क कुणाच्या आधीन नाहीत.
तसेच दाभोळ्करांचा फोटो हा त्याच्या संकेतस्थळावरुन घेतला आहे.
क.लो.अ.
हेक्टर
संपादनमला वाटते आपण 'आर'(हेक्टरपेक्षा मुल्याने कमी असलेले एकक) व 'एकर' या दोन terms मध्ये confuse झाले आहात. वस्तुतः २.४७ एकर = १ हेक्टर. एकर हा ब्रिटीश परीमाणातला आहे. ४४००० चौरस फुट = १ एकर. त्यानुसार दुरुस्ती करावी ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:३५, १८ डिसेंबर २००९ (UTC)
मला वेळ मिळेल तसे हे काम मी करीतच असतो.चुका /उत्पात त्यावर तातडिने कार्यवाही करतो. किमानपक्षी, निदर्शनास आणतो. त्यावर सर्वानुमते मग निर्णय करीता येतो. ज्या माहितीबद्दल मी confirm आहे त्यावरच लिहितो. अन्यथा, पूर्ण खात्री नसल्यास/अंधूक माहिती असल्यास 'मला वाटते ....' अशी शब्दरचना करतो. आपला विकिपीडिया बिनचुक रहावा ही त्यामागील भावना.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:१०, १८ डिसेंबर २००९ (UTC
1⁄12000 यास मराठीत कसे लिहावे? कृपया मार्गदर्शन करा. वि. नरसीकर (चर्चा) ०९:२९, १८ डिसेंबर २००९ (UTC) मॅथ मध्ये प्रयत्न केला पण 'पृथक्करणात अयशस्वी (लेक्झींग(कोशीय?)त्रूटी): १/१२०००' असे उत्तर येते. वि. नरसीकर (चर्चा) ०९:३५, १८ डिसेंबर २००९ (UTC)
टपालतिकिटावरील चित्रे
संपादनसंकल्प,
माझ्या माहितीनुसार भारतीय टपालखात्याच्या तिकिटांवरील चित्रे प्रताधिकारमुक्त असतात.
तसेच, काही प्रकारच्या प्रताधिकारीच चित्रांचेही (सिनेमा पोस्टर, तैलचित्रे, इ.) वानगीदाखल किंवा वर्णन करण्यासाठी कमी resolution मध्ये पुनर्चित्रण केले असता तो प्रताधिकारभंग ठरत नाही अशी विकिपीडियाची भूमिका आहे. याबद्दलची विस्तृत माहिती विकिकॉमन्स आणि विकिमीडियाच्या संकेतस्थळांवर आहे.
अभय नातू १७:०६, १८ डिसेंबर २००९ (UTC) मला १/१२००० असे साधे टाइप करण्यात अडचण नाही. पण त्याने 1⁄12000 नी जो effect मिळतो तो मिळत नाही.तसेच साचा:val पण करुन देउ शकत असलात तर हवा आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३१, १९ डिसेंबर २००९ (UTC) वि. नरसीकर (चर्चा) ०५:३१, १९ डिसेंबर २००९ (UTC)
मदत हवी
संपादनसाचे बनविण्यासाठी मदत हवी.
साचे बनविण्यासाठी मदत हवी.
संपादनइंग्रजी विकीपिडियातून लेख हे भाषांतरीत करायचे आहेत.जी एम आर टि चा लेख जमला नाहि.
- मला वाटते त्यांनी जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप लेखात इंग्लिश विकिपीडिया लेखात (en:Giant Metrewave Radio Telescope वापरलेल्या en:Template:Infobox Telescope मराठीत आणून लागणार आहे . सध्या त्यांनी चूकीचा माहिती चौकट साचा साचा:माहितीचौकट विमान वापरल्याने काम होत नसावे. साचा इम्पोर्ट आणि कस्टमाईज करून देताही येईल पण कंसेप्ट लेव्हलवर स्वतःचे स्वः बनवण्यास कसे सांगावे यात मी कुठे तरी कमी पडतो आहे.कारण ही अडचण इतर नवागतांनाही भेडसावते आहे. माहितगार ०५:२७, २२ डिसेंबर २००९ (UTC)
माहितीचौकट साचा बनवून हवा
संपादनवरील बटनाचा इनपूट बॉक्स <inputbox> type=comment editintro=विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/सहाय्य preload=विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/preload default=विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले साचे buttonlabel=*माहितीचौकट साचा बनवून हवा hidden=yes </inputbox>
- विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले साचे येथे जतन होईल. विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/preload मध्ये खालील प्रकारचा साचा बनवून हवा आहे जी माहिती साचा बनवून देणार्या सद्दस्यांना उपयूक्त ठरेल अशी माहिती प्रश्न साचा:हवा असलेला माहितीचौकट साचा मधे विचारावेत
{{हवा असलेला माहितीचौकट साचा |- | प्रश्न = काय हवे त्याचे उत्तर बरोबर चिन्हा नंतर लिहा | माहितीचौकट साचा नवीन हवा आहे का ? इतर विकिपीडीयातून आयात करून हवा आहे = | साचाचे नाव काय असावे ? = | साचात माहिती असणार्या ओळी किती असाव्यात = | त्या ओळींची नावे काय हवीत= | त्यातील कोणत्या ओळींची नावे नेहमी दिसून हवीत = | त्यातील कोणत्या ओळी माहिती नसेल तर दिसू नयेत = }}
हा साचा साचा बनवणे सोपे जाणार्या सदस्यांनी अद्ययावत करत जावा तसेच विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले साचे मध्ये नोंदवले जाणारे साचे बनवून द्यावेत. हे साचे बनवून देण्याचेही काही आराखडे बनवता आल्यास हे काम अधीक वेगाने आणि सोपे होईल असे वाटते . तर एकुण वर प्रमाणे मला साचा:हवा असलेला माहितीचौकट साचा बनवू देऊ शकाल काय.
माहिती चौकट साचे कसे बनवावेत याचे सहाय्य विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/सहाय्य पानावर लावल्यास साचा बनवून हवा विनंती करणार्यांच्या नजरेस संपादनाच्या वेळी पडेल.
माहितगार ०६:१३, २२ डिसेंबर २००९ (UTC)
- साचा छान झाला आहे. नसरसिकरजींना वापरून पहाण्यास सांगतो. सहाय्य पान माझ्याकडून इनम्पूट् बॉक्स मध्ये राहिलेल्या त्रूटी मुळे दिसत नव्हते आता दिसू लागेल.
- थँक्स अ लॉट माहितगार ०५:२३, २३ डिसेंबर २००९ (UTC)
syntax
संपादनprobably you are looking following syntax for preload page ?माहितगार १४:४५, २३ डिसेंबर २००९ (UTC)
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली जतन करणे लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद --> :धन्यवाद! :माझे सदस्य नाव/टोपण नाव: :{{{1|<includeonly>~~</includeonly>~~<noinclude><nowiki>~~}}}</nowiki>
उत्तर भारतीय नावे
संपादनसंकल्प,
तुम्ही अनेक पानांचे मथळे बदललेले पाहिले - लक्ष्मी निवास मित्तल, जगदीश चंद्र बोस, गुरदेव सिंग खुश, इ.
ही नावे होती तशीच (पहिली नावे दोन शब्दांत) बरोबर आहेत. उत्तर भारतीय लोक आपल्या नावाचा प्रत्यय वेगळा शब्द म्हणून लिहितात, व इंग्लिशमध्ये नावे लिहिताना ते सुस्पष्ट होते. एल.एन. मित्तल हे लक्ष्मी निवास मित्तल या नावाचे छोटे रूप आहे. जगदीश चंद्र बोस आपले नाव जे.सी. बोस लिहित, बंगाली विकिपीडियावरही त्यांच्या बद्दलचा लेख জগদীশ চন্দ্র বসু या मथळ्याने आहे.
तरी अशा व्यक्तींबद्दलच्या लेखांचे मथळे होते तसेच असू द्यावे.
अभय नातू १६:०५, २३ डिसेंबर २००९ (UTC)
- याखेरीज हिंदू उत्तर भारतीय पहिल्या नावांमध्येही घटक शब्द तोडून लिहिले जातात; पण त्यांचे मराठीतील लेखन सलगच असते. उदा.: हिंदीत 'अटल बिहारी वाजपेयी' आणि मराठीत 'अटलबिहारी वाजपेयी'.
- मराठी नावे लिहिण्याच्या संकेताबद्दल तुम्ही लिहिलेले बरोबरच आहे, पण व्यक्तिनावे लिहिताना स्वतः त्या व्यक्ती जसे नाव लिहितात किंवा उच्चारतात, तसेच लिहिणे बरोबर. एखाद्याच्या नावाची मोडतोड (किंवा जोड :-})करणे बरोबर नाही. मला वाटते याविषयी पूर्वी झालेल्या चर्चेत तुम्हीही सहभागी होतात (सदस्य J यांच्याशी मुख्यत्वे ही चर्चा झाली होती) त्यानुसार नावे जशीच्या तशीच ठेवावी. याला अपवाद म्हणजे देवनागरीत ज्याला मूळाक्षरेच नाहीत (Xhosa भाषेत याची अनेक उदाहरणे आहेत.)
- अभय नातू ००:२७, २४ डिसेंबर २००९ (UTC)
- ता.क. जोडलेल्या नावांकडून पुनर्निर्देशने असावीत.
खालील लेख/पान जानेवारी अखेर पर्यंत अद्ययावत होण्यात सहकार्य हवे
संपादन- एक निमित्त असेकी फेब्रूवारीत मराठी आठवडा नावाच्या कार्यक्रमाचे काही आयोजन होत आहे तसेच खालील पाने/विषय शालेय अभ्यासक्र्मात समावेश करावा असे आवाहन करावयाचे आहे. आणि मास ईमेल फॉर्वर्डींग सुद्धा करावयाचे आहे.
’उसाचा गवताळवाढ रोग’ या लेखातील चित्रे
संपादन’उसाचा गवताळवाढ रोग’ या लेखामधील चित्रांसंबधिचा तुमचा मेसेज वाचला. तुम्हाला जर शक्य असेल तर Please restore images under the Creative Commons Attribution ShareAlike 3.0 license. सदर् लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे माझी स्वतःची आहेत. माझ्या याच विषयावरच्या (en: SCGS) English Wikipedia वरच्या लेखासंबधीही हीच विचारणा मला झाली होती. मला स्वतःला हे करणं शक्य आहे का? चढवलेल्या संचिकेचे वरीलप्रमाणे license कसे बदलता येईल.? कृपया मर्गदर्शन करावे. English Wikipedia वरच्या लेखासंबधीही ही माहिती मला उपयोगी पडेल. मधन्यवाद.
Amit Yadav ०९:१५, २४ डिसेंबर २००९ (UTC)
- सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस यांनी त्यांच्या सदस्य पानावर {{क्रिकॉमन्स}} असा साचा लावला आहे Amit Yadav यांची requirement similler lines वर आहे असे वाटते. license चे डितेल मलाखूपसे माहित नाहीत या बाबत आपण स्वत: सहयोग दिल्यास बरे पडेल. माहितगार ०५:२९, २५ डिसेंबर २००९ (UTC)
- {{क्रिकॉमन्स}} सध्या खालील प्रमाणे दिसतो.
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना | ||
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवाना व अनेक परवाने संबंधीची पाने पहा. |
मी टाकलेली चित्रे
संपादनमी बाहेरगावी जातांना कॅमेरा बरोबर असतो.चांगली व विकिपीडिया च्या दृष्टीने उपयुक्त वाटली ती चित्रे काढतो व तेथे टाकतो.मला पूर्ण कल्पना आहे कि ती चित्रे विकिपीडियाच्या मानकांप्रमाणे नाहीत.कारण माझेपाशी असलेल्या कॅमेर्याची क्षमता पुरेपूर नाही.तरीही, केवळ नुसता लेखांचा मथळा असेल त्यापेक्षा ओबडधोबड कां होइना,चित्र असले तर तेथे भेट देणार्यास काही ना काही तरी कळेल या हेतूपोटी मी चित्रे टाकत असतो.पहा-कोयताकोणासही, (विकिपीडियाच्या नीतीप्रमाणे) ती वगळण्याचा/बदलण्याचा हक्क आहेच.काही वनस्पतींची चित्रे, कोणी ती वनस्पती ओळखुन त्याचे चित्र काढुन ती येथे टाकेल, अशी शक्यता मलातरी कमीच वाटते. मी टाकलेल्या चित्रांपेक्षा चांगली चित्रे टाकणार्यांचे नेहमी स्वागतच आहे. सहज मनात विचार आला म्हणुन लिहीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०४:५३, २६ डिसेंबर २००९ (UTC)
किल्ल्याविषयक चित्रे टाकायची आहेत
संपादनहरिश्चंद्रगड | |
चित्र:Harishchandragadtemple.JPG | |
नाव | हरिश्चंद्रगड |
उंची | ४००० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नगर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | पाचनई,खिरेश्वर |
डोंगररांग | माळशेज |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
अशा विविध प्रकारच्या संचिकेत किल्ल्याविषयक चित्रे टाकायची आहेत.मदत हवी जेणेकरुन महाराष्ट्रातील एकही किल्ला विकिपिडियावर फोटोशिवाय असणार नाही.
कर्हाडे १८:२७, २८ डिसेंबर २००९ (UTC)
प्रोत्साहनाबद्दल व माहितीबद्दल मी आपला आभारी आहे.फोटोशॉप हे सॉफ्टवेअर पण टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याने चित्रांची प्रतवारी अधिक सुधरेल. धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) ०३:४०, २९ डिसेंबर २००९ (UTC)
Dictionary (disambiguation)
संपादन- सहमत आहे परंतु en:Dictionary (disambiguation) असे पान इंग्रजी विकिपीडियात आहे.मुलतः शब्दकोश पान इंग्रजी विकिपीडियातून भाषांतरासाठी घेतल्यामुळे पुढे मागे नि:संदिग्धीकरण पान लागेलच या अंदाजाने ते निर्माण केले,अर्थात en:Dictionary (disambiguation) त नमुदकेलेली पाने अजुन आपल्या कडे नाहीत. माहितगार ०६:५१, २९ डिसेंबर २००९ (UTC)
'वर्गःकडधान्ये' बनविणे बरोबर होईल काय? की 'द्विदल धान्ये' असा वर्ग हवा? वि. नरसीकर (चर्चा) १०:३९, २९ डिसेंबर २००९ (UTC) 'कडधान्ये' हा बोलण्याच्या भाषेतला शब्द आहे आणि 'द्विदल धान्ये' हा लिखित भाषेतला शास्त्रिय शब्द. पण जास्त परीचित 'कडधान्ये' हाच आहे. प्रत्येक कडधान्य हे द्विदल बी असते परंतु प्रत्येक द्विदल बी हे कडधान्य असु शकत नाही.कडधान्ये ही फक्त खाण्यासाठीच वापरली जातात. यात व्यापकता येण्यासाठी 'द्विदल बिया' हेच बरोबर राहील असे माझे मत आहे. नातु आणि माहितगार यांचे काय मत आहे? वि. नरसीकर (चर्चा) १३:२५, २९ डिसेंबर २००९ (UTC)
- प्रथमतः सहमत पण वनस्पती विषयातील संशोधक अमीत यादव सध्या बर्या पैकी ऍक्टीव्ह आहेत त्याची या विषयावर मते पाहिल्यास अधीक चांगले
शुद्ध लेखन सहाय्य हवे
संपादन- मराठी विकिपीडिया संदर्भातील काही प्रश्न ऑफलाईन फील्डवर्कने लॉजीकल कन्लक्ल्यूजन ला न्यावयाचे आहेत. त्या दृष्टीने लॉ कॉलेज नमुना पत्र अपडेट करून एक नवीन टिपणही जोडले आहे त्यात शुद्धलेखन आणि इतर काही बदल सुयोग्य वाटल्यास करावेत हि विनंती माहितगार ०७:११, ३० डिसेंबर २००९ (UTC)
बार्नस्टार
संपादनमी आपला आणि समस्त विकिकरांचा आभारी आहे. आपण सर्व धन्यवादास खचितच पात्र आहात. खरे तर, बार्नस्टार मिळविण्यासाठी कोणीच काम करीत नाही, काम करतात ते एका विशिष्ट ध्येयासाठी,असा माझा प्रामाणिक समज आहे. तरीही, आपण मोठ्या मनाने बार्नस्टार दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०६:५८, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
सदस्य:Dryogita यांनी नुकतीच टाकलेली विविध आसनांवरील चित्रे कृपया तपासावीत. वि. नरसीकर (चर्चा) ०७:४२, ३१ डिसेंबर २००९ (UTC) धन्यवाद.उगीच भानगड नको म्हणुन मी सुचविले.कसे तपासावयाचे याची मला जाण नाही म्हणुन.वि. नरसीकर (चर्चा) ०९:४२, ३१ डिसेंबर २००९ (UTC)
इमेल कँपेनच्या दृष्टीने तांत्रीक सहाय्य हवे
संपादन- काही इंटरनेट मित्रांकरवी email marathi font list कँपेन करवण्याचा मानस आहे. email marathi font list पानातील दाखवा-लपवा आणि विकिपीडिया धूळपाटीवर मराठीत टायपींग करून पहा बटन हे ईमेलवर जाऊ शकेल असे तांत्रीक सहाय्य हवे आहे.
माहितगार ११:०६, १ जानेवारी २०१० (UTC)
विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे
संपादन- सवडी नुसार विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पाचे मुल्यांकन करावे. माहितगार ०६:०२, २ जानेवारी २०१० (UTC)
प्रकल्पःबावन्नकशी २०१०
संपादनमराठी विकिपीडिया मध्ये २०१० या वर्षात सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी एक प्रयोग म्हणून प्रकल्पःबावन्नकशी २०१० हा प्रकल्प कसा राहील. आपले मत, सुचना व दुरुस्त्या हव्या आहेत. गणेश धामोडकर ०४:५०, ५ जानेवारी २०१० (UTC)
- आपण मांडलेल्या आठवड्याचा उदयोन्मुख लेख या संकल्पनेला हा प्रकल्प पुरकच ठरेल. या प्रकल्पाअंतर्गत आपण आठवड्याला किमान ५ बावन्नकशी लेख जरी निर्माण किंवा पुनर्लिखित करू शकलो तर त्यापैकी एक सर्वोत्कृष्ट लेख आठवड्याचा उदयोन्मुख लेख म्हणून promote करता येईल.
- शिवाय मासिक सदरासाठी जो लेख निवडला जातो त्याचा दर्जा तुलनेत अतिशय उच्च असावा अशी मान्यता आहे. उदयोन्मुख लेखासाठी इतके high standards ठेवण्याची गरज नसावी. तसेच मुखपृष्ठावरील आपणांस माहित आहे का? हे सदर आळसावून पडले आहे, त्या सदरासाठीही या प्रकल्पातील लेख निवडता येतील.
- या सदरामुळे सदस्यांमध्ये चांगले लेख लिहिण्याची चुरस निर्माण होऊन मराठी विकिपिडीयाला अधिकाधीक सक्षम बनवता येईल. शिवाय नविन सदस्यांना या प्रकल्पाद्वारे चांगले लिखाण करण्याची प्रेरणा मिळून आपल्यास अपुरे पडणारे मनुष्यबळ निर्माण करता येईल.
- आपली मते आवश्यक. गणेश धामोडकर ०३:५८, ६ जानेवारी २०१० (UTC)
हे चित्र माझ्या संग्रहातील आहे.त्याचा स्त्रोत मला नक्की आठवत नाही.सापडल्यास तो लगेच टाकतो. वि. नरसीकर (चर्चा) १५:२६, ७ जानेवारी २०१० (UTC)
global sysops proposal
संपादनयाचे भाषांतर करावयाचे आहे काय? कृपया कळविणे. वि. नरसीकर (चर्चा) ११:०७, ८ जानेवारी २०१० (UTC)
माहितीचौकट साहित्यिक
संपादनसआदत हसन मंटो या लेखात माहितीचौकट साहित्यिक वापरून बदल केल्याबद्दल धन्यवाद. मी लेख निर्माण करतांनाच हा साचा वापरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मला तो मिळू शकला नाही. मग मी रविंद्रनाथ टागोर या लेखातून साचा घेऊन तो धूळपाटीवर वापरून पाहिला तरीही जमले नाही, शेवटी नाईलाजाने मला तत्त्वज्ञ हा साचा वापरावा लागला. धन्यवाद. ता.क. इथे 'ज्ञ' कसा लिहावा, मला खालच्या चौकटीतून उचलून छापावा लागला. गणेश धामोडकर ०८:५९, ९ जानेवारी २०१० (UTC)
While in Rome, be a Roman. विकिपीडियावर काम करतेवेळी तेथले नियम पाळावयासच हवेत ना.प्रताधिकाराबाबत माझी वैयक्तिक मते वेगळी असु शकतात. पण येथे काम करतांना येथील नियम व कायदे मला लागु आहेत.नियमांचे उल्लंघन १,००,००० पैकी एखादेवेळेस अजाणतेपणी होउ शकते.जाणिवपूर्वक या प्रताधिकार कायद्याचे वा विकिपीडियाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची मी खात्री देतो.याच कारणास्तव मी माझीच चित्रे टाकत असतो.उगाच शंकेस वाव नको म्हणुन. तुर्तास,या बाबत निर्णय होईपर्यंत ती संचिका मी काढत आहे.मुळ स्त्रोतातुनही हे चित्र काढावे ही विनंती.कागदपत्रे मिळाल्यावर ते पुन्हा टाकता येईल.तुकडोजी महाराजांची जयंती होती म्हणुन ही संचिका तातडिने टाकली होती.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:४३, १० जानेवारी २०१० (UTC)
साचे कसे इत्यंभूत करावेत.
संपादनइंग्रजी विकि वरील लेख मराठी विकि वर आणताना मूळ इंग्रजी साचे मराठीत कसे आणावेत ? टिनटिन लेखात प्रयत्न फसलाय ,मदत हवी.
विनोद रकटे १८:३५, १० जानेवारी २०१० (UTC)
मला साचा आयता करुन नकोय पण पध्द्त काय?
विनोद रकटे ०७:५१, ११ जानेवारी २०१० (UTC)
कृपया मला गुलाब मध्ये gallery करुन देण्यास मदत करा. वि. नरसीकर (चर्चा) १६:४७, १२ जानेवारी २०१० (UTC)
काम झाले.
वि. नरसीकर (चर्चा) १७:१७, १२ जानेवारी २०१० (UTC)
साचा:प्रताधिकारसूचना
संपादनसदस्य चर्चा पानावर लावण्यासाठी {{पर्याय:प्रताधिकारसूचना}} बनवला आहे. . हा साचा अद्ययावत करण्यास सवडीनुसार सहाय्य करावे.माहितगार ०८:१९, १३ जानेवारी २०१० (UTC)
श्री द्रवीड साहेब,
स.न.वि.वि.,
मी लिहिलेला सद्गुरु तत्व् हा लेखाची सुरुवात केली होती. तो वगळला गेल्याचे दिसले. कारण अविश्र्वकोशिय मजकूर असे नमूद केलेले आहे. मी विकीपिडिया वर नवीन आहे. मला जरा समजावून् सांगितलेत तर की असा लेख वगळला गेला त्याची नक्की काय काय कारणे असतात आणि त्यामधील कोणत्या कारणाने हा लेख वगळला गेला तर मी आपला आभारी होईन.
कळावे,
आपला विश्र्वासू, Khagesh_2005
वेद विभागात
संपादनवेद विभागात वर्ग:ब्राह्मणे असा आहे.खरं म्हणजे ब्राह्मणके वा ब्राम्हणके असा वर्ग असावा.
कळावे. विनोद रकटे १०:०७, १५ जानेवारी २०१० (UTC)
वर्गःनक्षत्रे
संपादन'वर्गःनक्षत्र' असा वर्ग पूर्वीच उपलब्ध होता. तोच वर्ग, मी, न लिहिलेल्या नक्षत्रांचे लेख लिहुन तेथे लावला. तथापि, आपण सुचविले ते बरोबर आहे. तसा योग्य बदल लवकरच करील. सुचनेबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) १७:१३, १७ जानेवारी २०१० (UTC)
नाही हो. क्षमा कसची? विकिपीडिया चांगला दिसावा, बिनचुक रहावा यासाठीच तर आपण सर्व झटत असतो. माहितीगारांना एक मुद्दा अनायासे मिळाला.लेखात टाकायला. असो. वि. नरसीकर (चर्चा) १७:२०, १७ जानेवारी २०१० (UTC)
>'वर्गःनक्षत्र' असा वर्ग पूर्वीच उपलब्ध होता.< या ऍवजी वरील संदेशात कृपया >काही लेखात 'वर्गःनक्षत्र' असे वर्गीकरण पूर्वीच उपलब्ध होते.< असे वाचाचे.(विचारांच्या प्रगटीकरणातली त्रुटी)
(परंतु,त्याचा 'वर्गः' निर्माण केल्या गेला नव्हता.तो मी केला.व तसेच वर्गीकरण पुढे चालविले.) असे मला म्हणायचे होते. (कृतिचे पारदर्शीकरण) वि. नरसीकर (चर्चा) ०६:०६, १८ जानेवारी २०१० (UTC)
एम.जी.रांगणेकर
संपादनकृपया संगीत नाटक अकादमी पुरस्कार#नाट्यलेखन(अनुक्रम १.३.३) या अंतर्गत मराठी बघा.मी ते नाव लाल व ठळक केले आहे.ते व हे रांगणेकर वेगळे आहेत काय? कृपया कळवावे ही विनंती.माझा गैरसमजास वाव आहे म्हणुन विचारत आहे.
वि. नरसीकर (चर्चा) १६:१०, १८ जानेवारी २०१० (UTC)
प्रा.सोनकांबळे यांचे चित्र हे सकाळ मधून लेखातून घेतले असल्याने ते प्रताधिकारीत असू शकते. आपण त
संपादनविनोद रकटे १७:४१, १८ जानेवारी २०१० (UTC)
चित्रे.
संपादनरामायणातील सांस्कृतिक संघर्ष व माज्या जन्माची चित्तरकथा या लेखाचे फोटो हे विकिपिडिया सद्स्य अधांतर यांनी लिहिलेल्या अरुण कांबळे या लेखात दिलेल्या दुव्यातून घेतली आहेत.अरुण कांबळे यांच्या पश्चात त्याचे साहित्य अधिकार आपसूक त्याच्या मुलाकडे येतात.त्यांनीच वर दर्शवलेली पुस्तके संपूर्ण स्कॅन करून esnips वर टाकली आहेत.त्यामुळे मी ते वापरले आहे.काही हरकत असेल तर आपण त्या संचिका हटवू शकता. विनोद रकटे ०२:२१, २० जानेवारी २०१० (UTC)
या लेखात काहीतरी बहुतेक चुकलेले दिसते.जन्मतारिख किंवा नाव.कारण इंग्रजी विकिपिडियावर हि याबद्दल महिती नाही.
कळावे. विनोद रकटे ०२:२०, २० जानेवारी २०१० (UTC)
प्रताधिकार?
संपादननमस्कार,
प्रताधिकार बद्दलची माहिती माझ्या लक्षात आणून दिल्या बद्द्ल धन्यवाद. मी त्या संचिका इंग्लिश विकिपीडीया वरुन आणले आहेत. मला काय करावे लगेल? तेथे ती संचिका वापरण्यास अनूमती आहे व त्यांनी तेथे बर्याच परवानग्या लिहिल्या आहेत, तर मी त्या परवानग्या मराठी विकिपीडिया मध्ये टाकु का?
क्रुपया सहकार्य करावे!
--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १५:१८, २० जानेवारी २०१० (UTC)
बाबा कदम
संपादनमराठीमाती या संकेतस्थळावरील फोटो तुम्ही अप्लोड का केला नाही? संचिका जरी प्रताधिकारीत अस्ली तरी संकेतस्थळाचा उल्लेख करून तीचे वर्गीकरण प्रताधिकारीत संचिकेत करू शाकता ना?
धन्यवाद
संपादननमस्कार, साचा कसा असावा याबद्दल माझ्या मनात स्पष्ट कल्पना नाही. पण माहीतगार यांनी तयार केलेल्या साच्यात बदल करून काम चालू शकेल असे वाटते. इंग्रजी विकि सारखा पक्षी साचा तयार केला तरी चालेल. त्या साच्यात भारतीय इतर भाषातील नावे टाकता आली तर उत्तमच. तशी सोय असावी असा आग्रह मात्र नाही. किंबहुना तशी नावे असावीत की नाही याबद्दलही संभ्रम आहे. आत्ता वापरत असलेला साचा जास्त रुंद वाटतो आणि बॅकग्राऊण्ड कलर डार्क आहेत. संपूर्ण जीवसृष्टीसाठी एकच साचा तयार करता येईल का? तसे झाल्यास सारखेपणा येईल. Gypsypkd १०:२४, २३ जानेवारी २०१० (UTC)
पान काढा
संपादनखर तर माझा गोंधळ झाला.
माफी असावी.माझ्याच सांगण्यावरून माहितगारांनी कर्हाड लेख तयार केला. विनोद रकटे १७:३५, २३ जानेवारी २०१० (UTC)
वर्गीकरण
संपादनमी काल व आज लिहीलेल्या काही लेखात मला अपेक्षित नविन वर्गीकरणे केलेली आहेत.ती कृपया तपासुन त्यात काही बदल करावयाचे असल्यास ते करावेत म्हणजे Finally त्याचे 'वर्ग:....' तयार करता येतील. आपले काही वेगळे मत असल्यास ते ही कृपया कळवावे.पूर्वीच धन्यवाद देतो. वि. नरसीकर (चर्चा) १४:३४, २५ जानेवारी २०१० (UTC)
धन्यवाद
संपादननम्स्कार,
माझ्या चूका सुधारल्या बद्दल खुप खुप धन्यवाद!!
--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १३:४८, २७ जानेवारी २०१० (UTC)
- नम्स्कार
- तुम्ही सांगितलेला शब्द सुधारला आहे. एक प्रश्न आहे. बर्याच लेखात मी उदाहरणार्थ "नि" चे "नी" करुन टाकले होते, जे नंतर सुधारण्यास आले. पण मला वाटते की तो जुना लेख वागळायला हवा! उदाहरण "कारडॅसीयन" हे पान "कारडॅसियन" म्हणून तुम्ही सुधारले. आता जुने पान "कारडॅसीयन" वागळायला हवे. मी जुन्या पानाला जोडलेले सर्व दुवे काडुन टाकीन व मग पान काढा संदेश टाकीन. तुम्हाला का वाटते?
- --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १४:११, २७ जानेवारी २०१० (UTC)
स्टाइनबेक
संपादनसंकल्प,
जॉन स्टाइनबेक जर्मनवंशीय असले तरी त्यांचे जीवन व काम पूर्णपणे अमेरिकेतच होते. त्यामुळे त्यांचे नाव त्यांनी वापरलेल्या अमेरिकन उच्चारानुसार स्टाइनबेक असेच लिहिले पाहिजे. एखाद्या जर्मन स्टाइनबेकचे नाव श्टाइनबेक लिहिणे उचित. अमेरिकेत स्वतःच्या नावांमध्ये उच्चारात बदल करुन वापरणे कॉमन (मराठी शब्द?) आहे.
अभय नातू १४:१३, २७ जानेवारी २०१० (UTC)
शब्दोच्चारण
संपादननमस्कार,
तुमचा अमुल्य वेळ वापरुन, तुम्ही नेहमी माझ्या चुका सुधारता. या बद्दल हार्दिक धन्यवाद. तुम्हाला परत परत काम नको म्हणुन वाटले की शब्दांचे उच्चार तुम्हालाच विचारतो. क्रुपया खालील शब्द सुधारण्यास मदत करावी. ही यादी सुधारण्यास अभय नातु यांनी पहिली मदत केलेली आहे, पण वाटले दुसर्यांदा पुन्हा तुम्हाला विचारुन घेतो. ज्यामुळे चुका कमी होतील.
- नाइट = Night
- ड्रोन = Drone
- एक्स्ट्रीम रिस्क = Extreme Risk
- इन द फ्लेश = In the Flesh
- वन्स अपॉन अ टाइम = Once Upon a Time
- टाइमलेस = Timeless
- इनफायनाइट रिग्रेस= Infinite Regress
- नथिंग ह्युमन = Nothing Human
- थर्टी डेझ = Thirty Days
- काउंटरपॉइंट = Counterpoint
- लेटंट इमेज = Latent Image
- ब्राइड ऑफ केओटिका = Bride of Chaotica!
- ग्रॅव्हिटी = Gravity
- ब्लिस = Bliss
- डार्क फ्रंटियर = Dark Frontier
- द डिसीझ = The Disease
- कोर्स:ऑब्लिव्हियन = Course: Oblivion
- द फाइट= The Fight
- थिंक टँक = Think Tank
- जगरनॉट = Juggernaut
- समवन टु वॉच ओव्हर मी = Someone to Watch Over Me
- रिलेटिव्हिटी = Relativity
- वॉरहेड = Warhead
- इक्विनॉक्स = Equinox
- सर्व्हायव्हल इंस्टिंक्ट = Survival Instinct
- बार्ज ऑफ द डेड = Barge of the Dead
- टिंकर, टेनर, डॉक्टर, स्पाय = Tinker, Tenor, Doctor, Spy
- ऍलिस = Alice
- रिडल्स = Riddles
- ड्रॅगन्स टीथ = Dragon's Teeth
- वन स्मॉल स्टेप = One Small Step
- द व्हॉयेजर कॉन्स्पिरसी = The Voyager Conspiracy
- पाथफाइंडर = Pathfinder
- फेयर हेवन = Fair Haven
- ब्लिंक ऑफ ऍन आय = Blink of an Eye
- व्हर्च्युओसो = Virtuoso
- मेमोरियल = Memorial
- कलेक्टिव्ह = Collective
- स्पिरिट फोक = Spirit Folk
- ऍशेस टु ऍशेस = Ashes to Ashes
- चाइल्ड्स प्ले = Child's Play
- गुड शेफर्ड = Good Shepherd
- लिव फास्ट अँड प्रॉस्पर = Live Fast and Prosper
- म्यूझ = Muse -
- फ्युरी = Fury
- लाइफ लाइन = Life Line -
- द हाँटिंग ऑफ डेक ट्वेल्व = The Haunting of Deck Twelve -
- युनिमॅट्रिक्स झिरो = Unimatrix Zero -
मदतीसाठी खुप खुप आभारी व तसदी बद्दल क्षमस्व.
--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) ०६:०६, २८ जानेवारी २०१० (UTC)
शब्दोच्चार व लेखन
संपादननमस्कार,
तुमचा संदेश मला समजला नाही?
--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १४:२५, २८ जानेवारी २०१० (UTC)
अनुवादण्याजोगे लेख
संपादन- काही विशीष्ट लेख मराठी विकिपीडियात इंग्रजी विकिपीडीयातून घेण्याचेही काही व्यूहात्मलक फायदे मराठी भाषेस आणि मराठी विकिपीडियास फायदे होतील असे वाटते त्या शिवाय इंग्रजी लेख मोकळा उपलब्ध ठेवण्याने सुयोग्य आणि चपखल शब्दांच्या शोधात अधीक सहकार्य मिळू शकते आणि इतरही काही फायदे नजरे आड होऊ नयेत असे वाटते.
- त्यातही भाषांतर प्रकल्पाच्या दृष्टीने एक विशीष्ट पद्धत अवलंबण्याचा प्रयत्न करत आहे.
- थोडा बिझी आहे माझा सविस्तर दृष्टीकोण आणि फायदे एक दोन दिवसात मांडेन.
- माहितगार ०८:२१, ३० जानेवारी २०१० (UTC)
नमस्कार! गेल्या काही आठवड्यांत तुम्ही इंग्लिश विकिपीडियावरून काही लेख अनुवादण्यासाठी मराठी विकिपीडियावर हलवत आहात. याबाबत एक विनंतीपर सूचना मांडावीशी वाटते - शक्य असेल तितक्या मजकुराचा अनुवाद लिहून तेवढाच मजकूर विकिपीडियावर चढवावा. अन्य मजकूर कॉमेंट करून अदृश्य ठेवावा. याचे कारण असे, की असे बरेच लेख अनुवादाविना तसेच काही आठवडे/ काही महिने पडून राहण्याचा अनुभव येतो. दरम्यान, मराठी विकिपीडियावर जे वाचक येत असतील, ते मराठीतून माहिती वाचायला येत असणार; त्यांना इंग्लिश/ चिनी/ थाई भाषांमध्ये लिहिलेला मजकूर वाचायला मिळू लागला, तर मराठी विकिपीडियाच्या दर्जाबद्दल त्यांच्या मनांत गैरप्रतिमा बनण्याची शक्यता आहे. या गोष्टींचा विचार करून एतत्संदर्भात आपले धोरण राबवावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५४, २९ जानेवारी २०१० (UTC)
गौरव
संपादनअविरत संपादक पदक | ||
जानेवारी, २०१० महिन्यात मराठी विकिपीडियावर १,००० पेक्षा जास्त संपादने केल्याबद्दल. |
रोडरोलर
संपादनरोडरोलर ला काय नाव द्यावे- रस्ता(रोड) ढकलदंड(रोलर) कि सरळच खडी दाबण्याचे यंत्र? वि. नरसीकर (चर्चा) १३:३४, २ फेब्रुवारी २०१० (UTC) आभारी आहे. वि. नरसीकर (चर्चा) १५:२९, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
वर्ग :साम्राज्य
संपादननमस्कार,
संक्षिप्त सूची मधील इतिहास या वर्गात साम्राज्य विभागात आपणास नेमके काय अपेक्षित आहे.
मराठा साम्राज्य मुघल साम्राज्य इंका साम्राज्य गुप्त साम्राज्य ब्रिटिश साम्राज्य रोमन साम्राज्य रशियन साम्राज्य
हि साम्राज्य वर्गवारीत मोडू शकत नाही का? हि त्या वर्गवारीत येऊ शकत नाहीत का ?
कळावे...विनोद रकटे ०४:४४, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
वर्गःसाम्राज्ये
संपादनधन्यवाद.खरं म्हणजे संपूर्ण मराठी विकीपिडियावर हा वर्ग अस्तित्वात नसल्याने गैरसोय झाली होती.तसेच हा एकच भाग लाल रंगात दिसत होता.
पुन्हा एकदा धन्यवाद
विनोद रकटे ०५:३१, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
कॅमेरा या सदरा विषयी ...
संपादननमस्कार,
आपले योगदान पाहिले. शुद्धलेखनाच्या चुका सुधारल्याबद्दल धन्यवाद. परंतु एका गोष्टीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो की, संकलन चालू असलेल्या सदराशी निगडीत एखादे सदर इंग्रजी विकीपेडीयावर उपलब्ध असेल तर त्या इंग्रजी सदराकडे निर्देशित करणारा दुवा मराठीत संकलन चालू असलेला सदरावर मुदामून ":en:" असे wiki-interlinking वापरून नमूद करून ठेवतो. उदाहरण, कॅमेरा या सदरातील 'कॅमेरा ऑब्स्क्युरा' संज्ञा. मी तिथे :en:Camera Obscura असे अंतरविकिनिर्देशन वापरले होते जे आपण काढून टाकले आहेत. उचार कसा करावा हे नमूद करण्याचा या मागचा उद्देश नसून, अधिक माहीतीसाठी इंग्रजी मधे उपलब्ध असेलल्या सदराकडे लक्ष वेधण्याचा प्रयास होता. असे अंतरविकिर्देशन करण्यात काही गैर नसावे असं मी मानतो. शिवाय विकि माध्यमानेचं ही सोय मुद्दामून उपलब्द करून दिली आहे तिचा वापर करण्यास हरकत नसावी. उदाहरण द्यायचेचं झाले तर हल्ली शाळेतील मुले विकिपेडीयाचा आधार घेऊन प्रोजेक्ट रिपोर्ट (आत्ता पटकन मला मराठी शब्दा आठवतं नाही त्या बद्दल क्षमस्व) लिहीतात. ते करत असता, असे अंतरविकीनिर्देशन (:en:Camera Obscura) वापरून त्यानां आधिकं माहिती उपलब्ध होते! तसे न केल्यास उलटं उपलब्ध असलेल्या माहितीपासून वाचक वंचित रहातात. अर्थात जर कोणी मुद्दामून इंग्रजी विकि मधे जाऊन इंग्रजी शब्दच्या स्पेलिंगवरून ते इंग्रजी सदर शोधले तर गोष्ट वेगळी पण आपण जर उत्स्फूर्तपणे तिचं महिती उपलब्दकरून दिली तर फायदा होईल असे मला वाटते! आपले मत नक्की कळवावे.
धन्यवाद, मंदार
- मंदारशी मी काहीसा सहमत आहे, दुसरी एक अडचण एखाद्या मराठी शब्दाला इंग्रजीतील दोन पूर्ण भिन्न अर्थाचे शब्द असतात तेव्हाही किमान लेख उदयोन्मूख अवस्थेत असताना प्रस्तूत शब्द किंवा शीर्षक नाव कोणत्या इंग्रजी संज्ञेने अभिप्रेत होते ते इंग्रजीत नमूदकरणे बरे पडते,आणि वाचकालाही तो दुसरी गोष्ट शोधत आला असल्यास योग्य पानावर अधीक वेगाने जाता येते. जसे सभ्यता हा शब्द मराठीत decency आणि civilisation या दोन्ही अर्थाने वापरला जातो लेखन् आणि वाचन करताना हे दोन्ही अर्थ बर्यापैकी वेगळे पडतात केवळ context ने लेक्षात येतात पण शब्द गरजेनुसार इंग्रजीत नमूद केला तर वाचकाला लेखात पुढे काय आहे याचा अदमास अधीक चांगला येऊ शकेल असे वाटते.माहितगार ०५:५२, ४ फेब्रुवारी २०१० (UTC)
नमस्कार. मी काही दिवस कार्यालयाच्या कामात असल्यामुळे आपण सर्वांचे अभिप्राय वाचू शकलो नाही. त्या बद्दल क्षमस्व. आपण आणि माहितगार, दोघांशी मी सहमत आहे. नको तेवढे परभाषिक शब्द म्हणजे खाताना दाताखाली आलेला गणंगासमान असतो या आपल्या मताशी मी सहमत आहे. मी आपण सर्वांनी दिलेले अभिप्राय नक्की लक्षात ठेवीन... धन्यवाद, मंदार
धन्यवाद
संपादनमी काल संपादन केलेल्या लेखात चूक झाली होती. तुम्ही काळजीपूर्वक लेख वाचून चूक दुरूस्त केल्याबद्दल मी आभारी आहे. Gypsypkd ०५:००, ५ फेब्रुवारी २०१० (UTC)
साचा:महानगर क्षेत्र विस्तार पान काढा.
संपादननमस्कार, मुंबई महानगर क्षेत्र यामध्ये हा साचा अंतर्भूत केला आहे.वरील साचासाठी वेगळे पान नसावे असे मला वाट्ते.
वर्गीकरण
संपादनयात मी फारच कच्चा आहे. मला चुक उमगली आहे व त्यानुसार मी यापुढील लेखात दुरुस्त करील. सुरुवात सुरण रताळे पासुन केली आहे. मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) ०४:४६, १३ फेब्रुवारी २०१० (UTC)
अशुद्धलेखन
संपादनमाझ्या अशुद्धलेखनामुळे आपणास बराच त्रास होतो. मी त्याबद्दल कायम आपला क्षमाप्रार्थी आहे. वि. नरसीकर (चर्चा) १६:१९, १५ फेब्रुवारी २०१० (UTC)
येथे मी आतापर्यंत चढविलेल्या संचिकांसमोर Tags या रकान्यात untagged असा शेरा आहे.याबद्दल खुलासा करु शकाल काय? हा शेरा काढण्यासा ठी काय करावे. वि. नरसीकर (चर्चा) १५:४९, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)
सदस्यःVargenau हा फ्रेंच विकिपेडियावरील सदस्य आंतरविकिदुवे कां काढत आहे?
वि. नरसीकर (चर्चा) ०९:०४, १९ फेब्रुवारी २०१० (UTC)
मार्गदर्शनपर सूचना हव्या.
संपादनकृपया माझ्या लेखाबद्दल तो पूर्ण होण्यापुर्वी काही सूचना असतील तर अवश्य कळवाव्या धन्यवाद, कळावे.
स्थानांतरण
संपादनह्या खुलाशाबद्दल धन्यवाद. प्रबंधकांच्या हेतूबद्दल मला अजिबात शंका नाही. मराठी विकिपीडिया अद्ययावत राहावा ह्यासाठीच आपण सर्व जण झटत आहोत. आपला चिनी लिपीमध्ये अभ्यास आहे त्यामुळे आपण केलेले बदल रास्त आहेत हे पटले. अभिजीत साठे ०२:४६, २५ फेब्रुवारी २०१० (UTC)
Please delete a copyrighted image
संपादनDear Administrator,
Please delete the following copyrighted image from the Marathi wikipedia. The image is http://mr.wikipedia.org/wiki/चित्र:Girish.jpg
Thanks
मी काही चित्रांची वर्गीकरणे आज केलेली आहेत.कृपया ते तपासुन योग्य वा अयोग्य ते कळवावे व चुक असल्यास आवश्यक तो बदल सुचवावा, ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:५२, १० मार्च २०१० (UTC)
सूचना:
उदयोन्मुख लेख
संपादनमाझा क्लोद मोने ला पाठिंबा आहे.
अजयबिडवे ०९:२९, १४ मार्च २०१० (UTC)
भाषांतर
संपादनविकिपीडिया:चावडी/प्रगती येथे टाकलेल्या आवाहनाच्या उतार्याचे भाषांतर केले आहे. कृपया तपासावे व आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:१५, १८ मार्च २०१० (UTC)
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
संपादननमस्कार संकल्प द्रविड, आपण माझ्या कार्याची दखल घेऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद.क.लो.अ. Pra.K. ०३:२९, २२ मार्च २०१० (UTC)
कोकीळ
संपादनमी कोकिळेचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.तो (.wav) या sound file च्या format मध्ये आहे. मला तो कोकीळ या लेखात आवाजाची फाईल टाकायची आहे. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. मी एक प्रयत्न केला होता पण तो फसला. वि. नरसीकर (चर्चा) १०:५४, २ एप्रिल २०१० (UTC)
काम झाले. वि. नरसीकर (चर्चा) १४:५८, २ एप्रिल २०१० (UTC)
विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/३ एप्रिल २०१०
संपादनसंकल्प,
उदयोन्मुख लेख बदलला आहे.
अभय नातू ०२:५६, ३ एप्रिल २०१० (UTC)
नमस्कार
संपादनकाय महाराज ! कुठे आहात? दिसत नाहीत ते. वि. नरसीकर (चर्चा) ०९:४१, २७ एप्रिल २०१० (UTC)
नमस्कार, या लेखाची अज्ञात व्यक्तीची आजची आवृत्ती मी परतावली आहे. या आधीही तुम्ही अशीच परताविल्याचे दिसते. लेखाकडे लक्ष ठेवावे लागेल. Gypsypkd ११:०१, २७ एप्रिल २०१० (UTC)
महाराष्ट्रच्या जिल्हा
संपादनThere is a very good collection of articles related to the districts of Maharashtra in Marathi at DES website. The files in pdf can be converted using webdunia conversion tool to convert CDAC (DVB TT Surekh) to unicode. I think these are very good reference materials to elaborate articles about the districts of Maharashta. --Eukesh १३:३६, ५ मे २०१० (UTC)
भास्कराचार्य
संपादनया लीलावतीकार भास्कराचार्याअगोदर सुमारे ६०० वर्षे आणखी एक भास्कराचार्य होउन गेलेत.त्याबाबत निःसंदिग्ध्ता रहावी म्हणुन (लीलावतीकार) असे वेगळे नाव दिले होते.
वि. नरसीकर (चर्चा) ०५:००, ९ मे २०१० (UTC)
नमस्कार जरा या भागाकडे पण पहा.विनोद रकटे ०१:०७, ११ मे २०१० (UTC)
येथे मला मदत हवी .विनोद रकटे ०१:४८, ११ मे २०१० (UTC)
नमस्कार
संपादनकाही नाही. फक्त नमस्कार. वि. नरसीकर (चर्चा) १४:२६, ११ मे २०१० (UTC)
जोडाक्षरे
संपादनअचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:१५, २३ मे २०१० (UTC)
काम झाले.तसदीबद्दल क्षमस्व.
वि. नरसीकर (चर्चा) ०८:४६, २३ मे २०१० (UTC)
धन्यवाद
संपादननमस्कार संकल्प द्रविड, आपला संदेश वाचुन संतोष झाला,आपल्या प्रोत्साहनामुळे लिखाणकार्यास अधिक उर्जा मिळाली असे मी मानतो, ह्या पुढिल लिखाणात अधिक सुटसुटित (वर्गीकरण करुन) पणा आणि साचेबद्धता आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन,गम्मत अशी आहे कि माझ्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या आहे,त्यामुळे जमेल तसे लिखाण करीत असतो,त्यामुळे त्यात ईच्छा असुन आवश्यक ते बदल करावयाचे राहुन जातात.आपले लक्ष आहेच,जमल्यास अधुन मधुन सूचनांद्वारे मार्गदर्शन (काय हवे-नको ते) करावे हि विनंती,क.लो.अ.Pra.K. १२:१७, १ जून २०१० (UTC)
- आपल्या सूचनेप्रमाणे आवश्यक ते बदल केले आहेत.आधीचे वर्ग साचे काढण्यास हरकत नाही.क.लो.अ.मार्गदर्शनाबद्दल आभारी.चे.प्रसन्नकुमार ०४:२३, १३ जून २०१० (UTC)
आज विकिवर माझे एक वर्ष पूर्ण झाले.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहे. आज/उद्या तो पूर्ण होईल. दररोज सुमारे १९.०१९ संपादनांच्या सरासरीने या ३६५ दिवसात संपादने पूर्ण केली आहेत.आपले,माहितगार व अभय यांचे वारंवार मार्गदर्शन लाभले त्यानेच हे शक्य झाले. साचा प्रकारात पारंगतता नव्हती. ते काम नुकतेच सुरु केले आहे. जमेल काही दिवसांनी. वेळोवेळी केलेल्या सहाय्याबद्दल व माझ्याप्रती दाखविलेल्या सदिच्छेबदल आपणा सर्व विकिकरांना मनःपूर्वक धन्यवाद.
वि. नरसीकर (चर्चा) ०६:३०, ९ जून २०१० (UTC)
फुटबॉल खेळाडू
संपादननमस्कार संकल्प,
लेख ज्या प्रमाणे स्थानांतरीत करता येतात तसे वर्गाच्या बाबतीत दिसत नाही.वर्ग स्थानांतरीत करण्यासाठी काही करता येइल का?
Maihudon ०४:२३, १५ जून २०१० (UTC)
तृश्शूर विषयी
संपादननमस्कार, त्रिश्शूर,थ्रिसुर,त्रिशुर,तृशुर इ. ह्या नावाविषयी बरेच गोंधळ आहेत आणि त्यामुळे अनवधानाने चुकून दोन तीन प्रकारचा नामोल्लेख आढळतो,कृपया योग्य ते नामकरण असलेला लेख ठेवाव आणि इतर लेखांना त्या लेखाकडे वळवावे हि (प्रबंधकांना) विनंतीवजा सूचना.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०५:१३, १५ जून २०१० (UTC) तृश्शूर हे नाव अधिक योग्य वाटते असे माझे मत आहे
तृश्शूर विषयी
संपादननमस्कार, त्रिश्शूर,थ्रिसुर,त्रिशुर,तृशुर इ. ह्या नावाविषयी बरेच गोंधळ आहेत आणि त्यामुळे अनवधानाने चुकून दोन तीन प्रकारचा नामोल्लेख आढळतो,कृपया योग्य ते नामकरण असलेला लेख ठेवाव आणि इतर लेखांना त्या लेखाकडे वळवावे हि (प्रबंधकांना) विनंतीवजा सूचना.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०५:१३, १५ जून २०१० (UTC) तृश्शूर हे नाव अधिक योग्य वाटते असे माझे मत आहे
विमानतळांवरील लेख
संपादनमाहितीचौकट इंग्रजी विकीवरुन त्यातील माहितीसकट कॉपी करुन तेथे आणत आहे. त्यासमवेतच (पुन्हा पुन्हा तो लेख उघडुन त्यातील मज्कुर आणावा लागु नये म्हणुन-duplication of work) इतरही मसुदा आणत आहे. नजिकच्या भविष्यात त्याचे भाषांतर करीलच याची खात्री देतो.ते लेख परिपूर्ण होतीलच. फक्त थोडा वेळ लागेल एव्हढेच. यावरही आपण म्हणत असाल तर तसे करणे बंद करतो. कृपया कळवावे. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५२, १६ जून २०१० (UTC)
ताजा कलमःपुढील काम थांबवुन भाषांतराचे काम सुरु केले आहे. वि. नरसीकर (चर्चा) १०:३५, १६ जून २०१० (UTC)
बेगमपेट विमानतळ हा लेख कृपया बघावा. असेच अपेक्षित आहे काय?
वि. नरसीकर (चर्चा) ०७:२८, १७ जून २०१० (UTC)
चर्चापान लहान करा नं राव. खाली जाण्यास किती रोल करावे लागते.
वि. नरसीकर (चर्चा) ०७:२८, १७ जून २०१० (UTC)
भाषांतराचे लेख
संपादनआपल्या सुचनेप्रमाणे ४-५ लेख वगळिता मी सुरू केलेल्या सर्व लेखांचे एकतर भाषांतर केले अन्यथा इंग्रजी मजकुर 'शेरा'(comment) मध्ये लावला.
वि. नरसीकर (चर्चा) ०९:४३, १९ जून २०१० (UTC)
नमस्कार संकल्प, आपला संदेश मिळाला,त्यानुसार लेख तयार करण्याचा नक्कीच (अगदी १००%)प्रयत्न करेन,बाकी लेखांमध्ये(आधीच्या) कमेंट करून बघतो.बाकी सर्व ठिक.चे.प्रसन्नकुमार १७:२६, १९ जून २०१० (UTC)
मार्गक्रमण साचे महत्वाचे बदल
संपादननरसीकर यांनी तयार केलेला साचा {{भारतातील विमानतळ}} मध्ये काही errors येत होते. थोडी माहिती घेतल्यास असे दिसले कि
- {{Navbar}}
- {{Navbox}}
- {{Navbox with columns}}
- {{Navbox with collapsible groups}}
ह्या साच्यात केलेले बदल (संदर्भ : इंग्लिश विकि) मराठी विकि वर झाले नव्हते. मी ते सध्या केले आहेत.
काहि formating errors आहेत, माझ्या मते Common.js मध्ये काहि बदल, update जरूरी आहेत.
जर मी केलेले बदल अपेक्षित नसतील तर उलटवावे लागतील.
Maihudon ०९:२७, २१ जून २०१० (UTC)
देउळे/देवळे
संपादनसंकल्प,
मलाही वाटले होते की देवळे हेच बहुवचन आहे, पण त्यावेळी देवळ = चर्च, सिनेगॉग, इ. अर्थ डोक्यात आले व देवळे केले असता हे देवळचे बहुवचन असल्याचे वाटेल असा तर्क चालवून मी देउळे केले. असो, थोडक्यात देउळे वर्गवारीचे मंदिर या वर्गवारीत रुपांतर करतो.
विषयांतर - देउळे=>देवळे यातील व वर आघात नाही, देवळ=>देवळे यात व वर आघात येतो. देवनागरी लिपीत हे दाखवता येत नाही. देवनागरीतील अजून एक (छोटी) क्षती.
अभय नातू ०४:३३, २५ जून २०१० (UTC)
अगदी योग्य म्हणणे आहे.
संपादननमस्कार संकल्प द्रविड, आपला संदेश मिळाला वाचून अजिबात गैरसमज वगैरे झाला नाहीये उलट अगदी मलाही असेच करावेसे वाटत आहे परंतु सध्या मी लेखसंख्येकडे अधिक लक्ष देऊन आहे त्यामुळे ते कसे वाढतील ह्या दृष्टीने नवनविन लेख निर्माण करत होतो... असो.आता हळूहळू पूर्वी निर्माण केलेले परंतु अधिक मजकूर नसलेल्या महत्त्वाच्या विषयावरील लेखांत कमी अधिक प्रमाणात भर टाकण्याचे काम हाती घेत आहे,जमेल तसे काम चालू राहिलच,बाकी सर्व ठिक,क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १७:३२, २७ जून २०१० (UTC)
योग्य लेखनाव
संपादन'भारतातील समुद्री बंदरांची यादी' 'भारतातील बंदरांची यादी' 'भारतातील समुद्री तळांची यादी' यापैकी कोणते नांव लेखास योग्य राहील कृपया कळवावे.माहितगार व अभयलापण हीच पृच्छा करीत आहे.
वि. नरसीकर (चर्चा) ०९:४४, २८ जून २०१० (UTC)
३०,००० चा टप्पा
संपादन- आपण ३०,००० लेखांच्या टप्प्याला पोचण्यास फक्त १५ लेख बाकी आहेत.
- सवड मिळाल्यास येथे आवश्यक तो बदल करावा ही विनंती.
वि. नरसीकर (चर्चा) ११:३७, २ जुलै २०१० (UTC)
३० हजारी अभिनंदन
संपादननमस्कार संकल्प द्रविड, हार्दिक अभिनंदन ३०००० चा आकडा ओलांडला.मराठी विकिपीडिया अशीच उत्तरोत्तर अनेक हजारी टप्पे पार करो आणि पहिल्या दहात आपले स्थान निर्माण करो अशी अपेक्षा आणि शुभेच्छा! अर्थात माझ्यासारख्या खारी आहेतच :)ते साध्य करायला. क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १३:४१, २ जुलै २०१० (UTC)
गाण्यांच्या लेखाविषयी
संपादननमस्कार,आपण मांडलेला मुद्दा योग्यच आहे,प्रताधिकार वगैरे गोष्टी त्यांना लागू होतात परंतु त्यांच्या कक्षेत राहूनच लेख निर्माण केले जाऊ शकतात ,उदाहरण म्हणून आपण जर http://en.wikipedia.org/wiki/Category:Tamil_songs ह्या दूव्यावर जाऊन पाहिले तर आपणास अनेक सुपरहिट तमिळ गाण्यांची यादी दिसेल व इंग्रजी विकिपीडियात ह्या सर्वच गाण्यांची माहिती इत्यंभूत देण्यात आली आहे,मात्र त्यांचे काव्य देण्यात आले नाही तसेच इंग्रजी विकिपीडियावर गाण्यांसाठी अनेक प्रकारचे वर्गीकरण आढळते जे अजून मराठी विकिवर उपलब्ध नाही,त्याचाच एक भाग म्हणून मी तत्संबंधी पुढाकार घेऊन लेख निर्माण करण्यास सुरुवात केली.उदा म्हणून ह्या गाण्यांचे इंग्रजी विकिवरील वर्ग मांडत आहे. Category:Indian songs ,Category:Songs from films,Category:Songs with music by A. R. Rahman, Category:Psychedelic rock songs,Category:Tamil songs,Category:2010 singles,'Category:Songs by language ,Category:Tamil language,Category:Tamil cinema,इत्यादी.मी शक्यतो इंग्रजी विकि वर असणार्या लेखांचेच मराठी विकिकरण करतो कारण त्यात सविस्तर माहिती ,वर्गीकरण,विकिकरण दिलेले असते.तसेच ह्यासंदेशा द्वारे जी वैशिष्ट्यपूर्ण गाणी,किंवा गीते आहेत जसे,आरत्या,राष्ट्रगीत,प्रांतगीत,परिषदेचे अधिकृत गीत वगैरे ह्यांचे देखील वर्गीकरण करण्यात यावे अशी सूचनावजा विनंती आपणास करतो. बाकी काही कमी जास्त असेल तर अवश्य कळवावे,चे.प्रसन्नकुमार ०४:३१, ७ जुलै २०१० (UTC) ता.क.- प्रायव्हेट कंपोझीशन्स,गाणी,चित्रपट सी.डी.,काव्यसंग्रह,अल्बम्स,जॉनर्स(काव्यप्रकार),इ.चा समावेश असलेले साचे आहेत का ते कळवावे.
ज्योतिष्य?चुकिचा?
संपादननमस्कार,मला ज्योतिष्य ह्या शब्दाविषयी तशी शंका नाहीये कारण मी लहानपणापासून ज्योतिष्य असा किंवा फलज्योतिष्य असा शब्दप्रयोग पहात आलो आहे ,पण मुंबई पुण्याकडे आल्यावर कळले कि इकडे लोक जोतिष/ज्योतिष वगैरे हिंदी भाषेप्रमाणे (असे आणि ह्यासारखे अनेक मराठी शब्द ) लिहितात आणि कदाचीत तो योग्यही असेल? किंवा प्रचलीत असेल,कारण मला खात्रीलायक ज्योतिष्य अशा पाट्या पाहिल्याची आठवण आहे,असो,पुण्यामुंबैची प्रचलीत लिपी आणि भाषा विकिवर असल्याकारणाने आपण तसा बदल अवश्य करावा.मी मागे काही शब्दांबद्दल अभय नातू ह्यांच्याशी बोललो होतो पण तेव्हा त्यांनी देखील हेच सांगीतले कि काही शब्द मराठीत वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतांना बर्याचप्रसंगी शब्दाचा वापर लोप पावल्याने किंवा वातावरणातील बदलामुळे नविन शब्द जागा घेऊ पहात आहेत.असो.माझी लेख उडविण्याबद्दल काहीच हरकत नाही. चे.प्रसन्नकुमार १८:४६, ७ जुलै २०१० (UTC) ता.क= आपण भाषाशुद्धीकरण ह्या विषयावर एखादे चर्चासत्र निर्माण करावे का? आपले काय मत आहे ? उदा.रोजच्या वापरात अनेकदा मराठी शब्दाऐवजी परभाषिक शब्द सहजपणे वापरात घेतला जातो तेव्हा ह्या चर्चेमुळे अशा अनेक शब्दांचा वेध घेऊन लेखांमध्ये अधिक प्रमाण भाषा वापरण्याकडे कल वाढेल आणि भाषेचा दर्जा सुधारेल.उदा.(इथे हिंदी किंवा परभाषी शब्द-समानार्थी मराठी)मंजूर-मान्य,मेहनत-परिश्रम/कष्ट. बिल्कुल-अजिबात ,मुश्किल-अवघड,कठिण,जरुर-अवश्य,नक्की,खूष-संतोष/संतुष्ट/समाधान,खास-विशेष,खासियत-वैशिष्ट्य,रियाज-सराव इत्यादी.चे.प्रसन्नकुमार १८:५६, ७ जुलै २०१० (UTC)
दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा
संपादन- मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)
प्रवेशद्वाराविषयी
संपादननमस्कार,मी तंजावूर विषयी माहिती संपादित करत असतांना मला एक नविन दूव्याचा शोध लागला जो मराठी विकिवर माझ्या पाहण्यात नव्हता,तो आपणांस इथे चिकटवून देत आहे कृपया एकदा पहावे आणि मला ह्यावर मार्गदर्शन करावे कि असा लेखप्रकार आपण मराठीवर करू शकतो का? आणि तो कसा निर्माण करावा ते.क.लो.अ.दूवा हिंदी विकिचा आहे चे.प्रसन्नकुमार १४:४०, ९ जुलै २०१० (UTC)
ता.क.-तसेच तंजावूर लेखास भेट देऊन तेथील तसाच एक साचा पहावा तो साचा मराठीत तयार करावयाचा आहे. http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%81
- नमस्कार, मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०४:४३, १२ जुलै २०१० (UTC)
थँक यू !
संपादननमस्कार संकल्प ,आपला संदेश मिळाला ,वाचून बर्याच गोष्टी नव्याने कळाल्या आणि उमगल्या,लेखांतील त्रृटी वेळीच लक्षात आल्या ,आपले म्हणणे अगदी रास्त(बरोबर) आहे, ह्या बारीक बारीक गोष्टींकडे अधिक लक्ष देऊन लेखन केल्यास लेखाचा दर्जा सुधारतो आणि एकंदरीत विकिपीडियाचा दर्जा त्याद्वारे सुधारतो,मला वाटत ह्यासाठी प्रत्येक एका प्रकारच्या लेखांसाठी काही विशेष निर्देश असावेत म्हणजे त्यात नक्की काय अपेक्षीत आहे,कोणत्या प्रकारच्या वाक्यांची मांडणी असावी,असे प्रमाणीकरण असावे.मी नंतर ते सविस्तर कळवतो,पण बरे वाटले आपण मला एका मोठ्या जबाबदारीला सामोरे जाण्यापूर्वी माझ्या कामांची नव्याने जाणीव करुन दिली.खरच हेच मला इतरांना मार्गदर्शन करतांना खूपच उपयोगी पडेल,चला एक मेका सहाय्य करु अवघे धरू सुपंथ..धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार १७:५७, १२ जुलै २०१० (UTC)
जोधा बाई
संपादनजोधाबाई बद्दल आभार.माझ्या अशुद्धलेखनामुळे आपणास सर्वांना बराच त्रास होतो.नीम हकीम खतरे जान.
वि. नरसीकर (चर्चा) १०:४१, १४ जुलै २०१० (UTC)
होय.मी आपण केलेले संपादन बघुनच ते ठरविले होते.यापुढील लेखात तसेच होईल याची खात्री बाळगा.सावकाशीने माझ्या ईतरही लेखात तो बदल करील. वि. नरसीकर (चर्चा) ११:१२, १४ जुलै २०१० (UTC)
संपादनसंख्येचा टप्प्यांनुसार सदस्य मार्गदर्शन
संपादन- सदस्यांना सुचना आणि मार्गदर्शनाचे विवीध स्तर आता उपलब्ध होत आहेत. एकदम सर्व सूचनांची यादी हातात ठेवल्यास पूर्ण वाचन समजेल अथवा अवलंब होईलच असे नाही. त्यामुळे सदस्यांना संपादनसंख्येचा टप्प्यांनुसार सदस्य मार्गदर्शन करता आले तर सदस्यांनाही फायदा होईल व दर्जाही सुधारण्यास हातभार लागेल असे वाटते. त्या दृष्टीने खालील साचे तयार आहेत/प्रस्तावित आहेत.
- साचा:अनामिकाचेस्वागत (खरेतर याकरिता एखादे लघुरूप नाव निवडावयास हवे.)
- साचा:स्वागत
- साचा:दहा संपादने
- साचा:पन्नास संपादने
- साचा:शंभर संपादने
तुमचा वेळ ज्या पद्धतीच्या सुधारणांमध्ये जातो त्याबद्दलच्या सुचना *साचा:दहा संपादने,*साचा:पन्नास संपादने,*साचा:शंभर संपादने येथे अंतर्भूत करता येतील असे वाटते या दृष्टीने या साचांना सुधारण्यात काही योग्दान होऊ शकल्यास पहावे.
माहितगार ११:२१, १५ जुलै २०१० (UTC)
अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी
संपादनअलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच
त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.
नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.
साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.
- माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)
साधनपेटी गायब
संपादनएखादे पान संपादन करण्यासाठी उघडले असता डावीकडील स्तंभ लोगो सोडला तर पूर्णपणे रिकामा दिसत आहे. गेल्या एक-दोन दिवसांतच हे होत आहे. मला वाटते मिडियाविकी नामविश्वातील पानांतील बदलांमुळे हे झाले असावे.
शक्य तितक्या लवकर पूर्वीची साधनपेटी परत दिसू लागेल असे करावे.
अभय नातू १६:१९, १६ जुलै २०१० (UTC)
- इंग्रजी विकिवर पुरेशी स्टेबल असलेली मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars हि दोन नवी पाने इंग्रजी विकिपीडियातून आयात केली होती व मिडियाविकी:Edittools मध्ये इंगीश विकिप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला. मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars मधील कंटेंटवर आता नो विकि लावले आहे. आता बरोबर दिसते का ते कुकीज मुळे मला लगेच लक्षात येणार नाही.या करिता कुक्की वगळून तपासून लगेच संदेश द्यावा. तरी फरक पडला नाही तर या तिन्ही टिकाणच्या बदलांवर द्रूतमाघार घ्यावी लागेलमाहितगार ०५:१८, १७ जुलै २०१० (UTC)
अजय अतुल लेख
संपादनधन्यवाद ! तुमच्या सुचना वर मी जरूर लक्ष देईन.आभार. मदतीची अपेक्षा.
उ:जिमी वेल्स यांच्यासोबत झालेली भेट
संपादनसंकल्प,
जिमी वेल्सशी झालेल्या चर्चेचा तपशील मी येथे लिहिला आहे. चावडीवरही दुवा टाकत आहे.
हलकेच सूचना/संदेश देउन आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद...नाहीतर हे काम अजून काही दिवस रेंगाळले असते.
अभय नातू १७:४२, १९ जुलै २०१० (UTC)
धन्यवाद कसचे?
संपादनते तर आपल्या सर्वांचे कामच आहे असे मी समजतो.वि. नरसीकर (चर्चा) ०७:१९, २० जुलै २०१० (UTC)
वर्ग:Speedy deletion requests
संपादनHello,
It seem there is some work for sysops at वर्ग:Speedy deletion requests ;o)
Regards
--Hercule २३:१७, २२ जुलै २०१० (UTC)