विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/लॉ कॉलेज नमुना पत्र
- मुख्य प्रकल्प पान
- सदस्य
- नमुना लेखकांना प्रताधिकार मुक्ती विनंती प्रत्र
- प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा
- वर्गीकरण आणि साचे
- लॉ कॉलेज नमुना पत्र
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- नित्योपयोगी
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
लॉ कॉलेज नमुना पत्र
संपादनप्रति,
वैजयंती जोशी
प्राचार्या
आय.एल.एस.लॉ कॉलेज
चिपळूणकर रस्ता,
पुणे
विषय: इंटरनेटावरील 'मराठी विकिपीडिया' (मुक्त ज्ञानकोश) प्रकल्पासंदर्भात समस्त मराठी भाषिक कायदा-अभ्यासकांना आवाहन .
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
'मराठी विकिपीडिया' हे इंटरनेटावरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि रचनात्मक सामायिक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पांत स्वयंसेवी आणि सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते. विकिपीडियासारखी नवीन वेब-२ पिढीतली संकेतस्थळे कायदा विषयाच्या अभ्यासकांना विविध मार्गांनी सहाय्यक ठरू शकतात. या संदर्भाने खाली एक टिपण जोडत आहे.
प्रताधिकार, बौद्धिक संपदा यांविषयीचे कायदे, अपवाद, प्रताधिकारमुक्तता, माहिती आणि तंत्रज्ञान/इंटरनेट इत्यादींच्या संदर्भांत लागू होणार्या कायद्यांबद्दल इंटरनेटावरील मराठी समुदायाला विश्वासार्ह आणि मोफत माहितीची खूप गरज आहे. मराठी समाजाची ही गरज मराठी विकिपीडियाच्या अंतर्गत विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून भागावी अशी आमची मनीषा आहे.
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा-अभ्यासकांचा आणि विद्यार्थ्यांचा http://mr.wikipedia.org/ येथे लेखन-सहयोग लाभला, तर मराठी भाषेचे 'ज्ञानभाषा' म्हणून संवर्धन करणारे हे दालन अधिकाधिक समृद्ध होण्यात मोठाच हातभार लागेल.
पत्र आणि सोबत जोडलेले आवाहन विभागप्रमुख या नात्याने आपण आपल्या परिचयातील सर्व मराठी भाषिक कायदा-अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठवावे; तसेच विभागांच्या आणि ग्रंथालयाच्या सूचनाफलकांवर लावावे, असे नम्र निवेदन व विनंती आहे.
तसेच या संदर्भात आपली वेळ घेऊन भेटता आले तर विकिपीडिया संदर्भातेखादे प्रेझेंटेशन अरेंजकरण्या बद्दल चर्चा करता येईल.
आपला विनम्र,
आ.न.ए.विकिकर
टिपण
संपादनPotential Benefits from wikipedia and its sister sites to students and faculty of Law :
- Indian Law students are coming from various lingustic educational background, and in the first year of proffessional courses, many students find coping suddenly with english language terminologies quite defficult; Wikipedia is a multilingual project available in all world languages and having information in Indian Languages, will make task of first year law students easy.
- Practitioners of law may need to have knowledge and exposure to various fields of knowledge and Wikipedia helps them as an encyclopedia.
- New generation law students and practitioners do have opportunities from overseas, simillerly they may expect competion from overseas too, wikipedia and its sister projects would be interested to work out how it can benefit Indian legal community in this respect.
- Those law people, who practice within India, for them, their profession is much like doctors where in as a professional, they need to have knowledge of english to practice in court of law and local language to communicate with their clients both the languges and wikipedia and its sister projects will be helpfull to them in this respect
- General awarness about legal issues is too poor in India , this brings stress on legal fraternity from ill informed clients having nonpractical expectation and many times it would be very deficult to convince the client and the way patiant goes from one doctor to other the client makes unnecessary trips to more lawyer this will get avoided if law students will collaborate and make contribute thier knowledge to free resources like wikipedia. Besides many other academic desciplenes found that, such activities on part of student help them to clear and crystlise thier concepts.
- Web2 based Wikimedia CMS software can benefit legal fraternity in larger socio political intrest in things like new law making with inputs from legal fraternity and public at large.
- What we expect law students is to help upgrade online wiktionary a dictionary with english- marathi legal terminology
- Update Indian law related articles on english as well as Indian languge wikipedias that inludes Marathi languge wikipedia.
तळटीप : हे पत्र एकापेक्षा अधिक व्यक्तींनी मराठी विकिपीडियावर संकेतस्थळावर सामायिकरित्या तयार केले असून स्वयंसेवी कार्यकर्त्यांपैकी कुणीतरी ते आपल्याकडे पोचवले असण्याचा संभव आहे. या पत्राची मूळ प्रत मराठी विकिपीडियावरील खालील दुव्यातून खाली नोंदवलेल्या वेळी घेण्यात आली.
आवाहन : मराठीप्रेमी लेखक पाहिजेत!
संपादन'मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध विषयांवर लेखन करणारे लेखक पाहिजेत!' अशा आशयाची जाहिरात कुठे येईल, असे वाटते? नाही ना? पण इंटरनेटावरील मराठी विकिपिडियावर (http://mr.wikipedia.org) या आशयाचे आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज तब्बल सव्वाचार हजारांहून अधिक लेख या मुक्त ज्ञानकोशावर वाचता येतात, हे त्याचेच द्योतक.
'विकिपीडिया' ही आज इंटरनेटावर 'गूगल'खालोखाल लोकप्रिय होत असलेली साइट आहे. जगभरातल्या २२९ भाषांमध्ये सुरू असलेल्या या प्रकल्पात आजवर एकूण ४६ लाखांहून अधिक लेख लिहिण्यात आले आहेत. इंग्रजीतील विकिपीडिया तर तुफान लोकप्रिय झाला असून तिथल्या लेखांची संख्या साडेबारा लाखांच्या आसपास आहे. त्या तुलनेत मराठी विकिपिडियाच्या विस्ताराची गती मंद वाटत असली, तरीही मराठी घरांमधील कंप्युटर आणि इंटरनेट यांच्या प्रसाराची धिमी गती पाहता ती कमी आहे, असेही म्हणता येत नाही!
मुळातच एखादी माहिती हवी असेल, तर कोश धुंडाळण्याची सवय आपण विसरून गेलो आहोत. मराठीत विश्वकोश, साहित्यकोश, संस्कृतिकोश, वाङ्मयकोशांची परंपरा असली, तरीही ते अद्ययावत करण्यात सातत्य दिसत नाही. त्यातील विश्वकोशाचा आताच सुरू झालेला प्रयत्न वगळता, दुर्दैवाने अन्य प्रकारांतील कोश इंटरनेटावर सहज उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर विकिपीडियाचा हा प्रयत्न विशेष उल्लेखनीय असून त्यात माहिती शोधत फिरणे हा रोचक अनुभव आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा कोश सर्वांसाठी खुला असून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या विषयावर लिहिण्याची मुभा आहे. सध्यातरी अभियांत्रिकी, इतिहास, कला, क्रीडा, गणित, तंत्रज्ञान, धर्म, निसर्ग, भूगोल, विज्ञान, समाज, कंप्युटर, संस्कृती असे सर्वसाधारण तर भारत आणि महाराष्ट्र हे विशेष विभाग आहेत. या मुख्य विभागांमध्ये अन्य पोटविभाग करण्यात आले असून त्यांत विषयवार लेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विकिपीडिया समूहाचा भाग असणार्या 'विक्शनरी', 'विकिबुक्स', 'विकिकोट्स' आदी वेबपेजेसच्या लिंक्सही मराठी विकिपीडियाच्या होमपेजवर क्लिक करता येतात. 'विक्शनरी'मध्ये ऑनलाइन शब्दकोश पाहता येतो, तर 'विकिबुक्स' या संकेतस्थळावर 'ज्ञानेश्वरी', 'गीताई' इत्यादीही वाचता येतात. 'विकिकोट्स' या संकेतस्थळावर विचार, सुविचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा संग्रह करण्यात आला आहे.
मराठी भाषेतील या अभिनव प्रकल्पात प्रत्येकाने योगदान द्यावे, हे अपेक्षित असले, तरीही 'कसे लिहावे' हे अनेकांना माहीत नसते. त्यासाठी संपूर्ण मदत करणारा लेखही विकिपीडियाच्या होमपेजवर ठेवण्यात आला आहे. यात फाँट, अपलोडिंग, दुरुस्ती अशा अनेक प्रकारच्या कामांविषयी विस्तृतपणे लिहिलेले आढळते. तसेच या संदर्भात काही चर्चा अपेक्षित असेल, तर ती करण्यासाठी 'विकिपीडिया चावडी'चा पर्याय उपलब्ध आहेच.
आजकाल ब्लॉग लिहिणे हा ट्रेंड मराठीत रुजतो आहे. यामुळे इंटरनेटावर लिहिणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या ब्लॉगलेखकांनी आपली ही आवड विकिपीडियासारख्या मुक्तकोशाच्या योगदानासाठी वापरली, तर मराठीचे हे दालन अधिकाधिक समृद्ध होईल.
- नील वेबर (सौजन्य महाराष्ट्र टाइम्स दिनांक २७ जुलै २००६.)
ता.क. : मराठी विकिपीडियावरील लेखांच्या संख्येचा आलेख सतत वाढता आहे आणि तो लौकरच ३०,००० लेखांची मजल गाठेल, असा विश्वास आहे. त्यामुळे दैनिक म.टा.तील बातमीत नोंदवलेल्या लेखसंख्येपेक्षा सध्याची लेखसंख्या अधिक आहे.