विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १८

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चाPlease vote on meta

संपादन

Meta has a poll going here. If you are a registered meta user, express your opinion.

If you do not have a meta login, you can not vote, but do take this opportunity to create a login there so you can make your opinion count in future polls/votes/elections.

अभय नातू १५:१४, १८ जुलै २००८ (UTC)

वर्ग:इ.स. १९९७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट

संपादन

वर्ग:इ.स. १९९७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट या वर्गाएवजी वर्ग:इ.स. १९९७ मधील मराठी चित्रपट असे वर्गीकरण करावे. कखगमधील चछजमधील टठड हे उगीचच लांबलचक वाटते. दुसर्‍या मधीलने अधिक माहिती जोडली जात नाही.

अभय नातू १६:२८, २६ जुलै २००८ (UTC)

संकल्प यांचे याबाबतचे विचार
सुभाष, तुम्ही ’वर्ग:इ.स. २००३ मधील इंग्लिश चित्रपट’ अशा नावांचे वर्ग तयार करत आहात असे दिसले. ते कृपया ’वर्ग:इ.स. २००३ मधील इंग्लिश भाषेमधील चित्रपट’असे लिहाल काय? कारण ’इंग्लिश चित्रपट’, ’हंगेरियन चित्रपट’ यातून चित्रपटाची निर्मिती हंगेरीतली/इंग्लंडमधली की भाषा हंगेरियन/इंग्लिश म्हणून तो इंग्लिश चित्रपट ते कळत नाही. म्हणून ’भाषेनुसार चित्रप” या वर्गात ’वर्ग:इंग्लिश भाषेमधील चित्रपट’, ’वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट’असे वर्ग तयार केलेत. त्यामुळे इसवी सन व भाषेनुसार नवीन वर्ग तयार करताना ’वर्ग:इ.स. २००३ मधील अबक भाषेमधील चित्रपट’ असे वर्ग तयार करावेत अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा) १२:११, २६ जून २००८ (UTC)
-सुभाष राऊत १६:४६, २६ जुलै २००८ (UTC)

मला वाटते येथे भाषेनुसार वर्गवारी असल्यामुळे एखादा चित्रपट कोठे निर्माण झाला ही माहिती गौण आहे. इ.स. २००३ मधील इंग्लिश चित्रपट हे कोठेही निर्मित असले तरी ते इंग्लिश चित्रपटच आहेत. जर त्यांची अजून वर्गवारी करायची असल्यास इ.स. २००३ मधील हंगेरीत निर्मित इंग्लिश चित्रपट असा उपवर्ग करावा.

अभय नातू १९:३५, २६ जुलै २००८ (UTC)

लेख शोध प्रक्रिया

संपादन

सद्ध्याच्या प्रणालीनुसार लेख शोध करतांना त्या लेखाचे नाव मराठीमधून (unicode) द्यावे लागते. अनेक लोक unicode चा वापर करत नाहीत. अनेकांना unicode बद्दल काही माहितीच नाही आहे. यामुळे माझ्या मते जर इंग्रजीमधून लेख शोधता आले तर ते अत्यंत उपयोगी ठरू शकेल. मी विकिपीडिया वर नवीन आहे, पण माझ्यामते ही सुविधा खालिलप्रकारे देता येऊ शकते.

  1. dummy[मराठी शब्द सुचवा]रिक्त लेख बनवणे ज्याचे नाव इंग्रजीमध्ये असेल.
  2. त्या पानावरून मूळ मराठी पानावर रीनिर्देषित (redirect) करणे

माझ्या मते लेख हे पूर्णपणे मराठीमध्येच असावेत. पण ही सु्विधा दिली तर अनेक naive [मराठी शब्द सुचवा] व्यक्ती मराठी विकिपीडिया वापरू शकतील.
Padalkar.kshitij १९:२१, २६ जुलै २००८ (UTC)

मला हा मुद्दा पटतो. पण शंका अशी आहे की इंग्लिश शुद्धलेखन व मराठी शुद्धलेखन यांतील फरकामुळे याचा कितपत उपयोग होईल. उदा. कवठे-महाकांळ शोधण्यास Kavathe-Mahankal पुनर्निर्देशित करावे कि Kawathe-Mahankal, कि Kavthe-Mahankal, कि Kawthe-Mahankal, कि सगळे, कि इतर अनेक variations[मराठी शब्द सुचवा]?
तथापि नेहमीच्या वापरातील शुद्धलेखन पुनर्निर्देशित केल्यास उपयोग होईलच.
अभय नातू १९:४०, २६ जुलै २००८ (UTC)
माझा स्वत:चा अनुभव थोडा वेगळा आहे. मला Infosys चे पान शोधायचे होते. मी अनेक प्रयत्न केले. ईंफोसिस , इंफोसिस ... पण ते शेवटी इन्फोसिस निघाले.
यावरून कोणी असा पण निष्कर्ष काढू शकेल की इंग्रजी मूळ असणाऱ्या शब्दांसाठीच हे उपयोगी ठरू शकेल, पण माझा मुद्दा तो नाही आहे. अनेक जणांना ’कवठे-महाकांळ’ unicode मध्ये कसे लिहायचे हेच माहित नसेल. अनेकांच्या संगणकामध्ये unicode support सुद्धा नसतो.
variations बद्दल एक प्रश्न - विकिपीडिया google प्रमाणे variations detect[मराठी शब्द सुचवा] होत नाहीत का?
द्विस्तरीय शोध प्रणाली जिथे..."we will not guarantee the false negatives when you search in English, but will guarantee the results when searched in Marathi"...English can be an additional option while searching.
आपले मत काय आहे याबाबत?
Padalkar.kshitij २०:१०, २६ जुलै २००८ (UTC)

variations बद्दल एक प्रश्न - विकिपीडिया google प्रमाणे variations detect[मराठी शब्द सुचवा] होत नाहीत का?

थोड्या प्रमाणात होते पण गूगलची मराठी शोधप्रणाली (विकिपीडियावर गूगलचीच शोधप्रणाली वापरली जाते) पुरेशी पुढारलेली नसल्याने सापडलेले दुवे सर्वंकष नसतात.

युनिकोडच्या संदर्भात तुमची सूचना बरोबरच आहे व ती वापरण्यात मला दोष दिसत नाहीत. माझे म्हणणे होते की याने सगळे शोध बरोबर उत्तरे आणतीलच याची खात्री नाही.

द्विस्तरीय शोध प्रणाली जिथे..."we will not guarantee the false negatives when you search in English, but will guarantee the results when searched in Marathi"...English can be an additional option while searching.

वर म्हणल्याप्रमाणे False positive पेक्षा अपूर्ण शोध येण्याची शक्यता जास्त आहे. त्यातूनही जर गूगलने अशा पुनर्निर्देशनांना proximity search index (Kawathe is near Kawthe is near Kavathe is near Kavthe) लागू केला तर सध्या असलेल्या प्रणालीपेक्षा ही उत्तरे जास्त उपयोगी असतील असेच वाटते.

इतर सदस्यांचे यावर म्हणणे काय आहे हे पाहून मग आपली सूचना अंमलात आणावी.

अभय नातू २१:१५, २६ जुलै २००८ (UTC)


Dummy - देखावी, दर्शनमात्री. सर्वात चांगला मायावी. Variations -- लेखनभेद, लिखाणबदल. कवठे महांकाळचे एकच स्पेलिंग संभवते Kavthe Mahankal. वेगळे स्पेलिंग मराठी माणसाच्या मनातही येणार नाही. W चा वापर वामन, वागळे, वाडा, वाकडे(वाडी), वाकड अशा निवडक शब्दांतच होतो. इथे V ने स्पेलिंग केले तर वमन, वगळे, वडा असे उच्चार होतील.

Naive साठी 'सीधासाधा. इंफॉसिस चा उच्चार इम्‌फॉसिस होईल म्हणून तसे लिहिणे अयोग्य. शब्दातला फ़ दन्त्यौष्ठ्य आहे, म्हणून फ च्या अगोदर दन्त्य अनुनासिक-न. इन्फॉसिस हेच एकमेव योग्य लिखाण. -J-- J १७:४८, ३१ जुलै २००८ (UTC)

Let us wait and discuss more before introducing such strategy.I feel concerned regarding such policy change.I need more no of days to express my concerns in detail.

Besides I feel serious effort at en wiki to introduce Marathi Wikipedia page inter wiki linking will take care of the people who want to reach Marathi pages. For internet user time required to reach from en wiki page to mr wiki page through inter wiki linking will not be very high.
Thanks and regards Mahitgar १६:०५, २७ जुलै २००८ (UTC)

नवीन प्रकल्प

संपादन

मराठी विकिपीडियावर प्रकल्प:लोकसभा हा नवीन प्रकल्प सुरू झालेला आहे. या पानाला भेट देउन तेथे आवश्यक ते बदल करा.

अभय नातू ०२:२१, २९ जुलै २००८ (UTC)

मुखपृष्ठावर ऑलिंपिक पदतालिका

संपादन

सद्ध्या ऑलिंपिकचे वारे चालू आहे आणि त्यानुसार मराठी विकिवरपण त्याच वेगाने माहिती टाकण्यात येत आहे याबद्दल Maihudon आणि अभय यांचे आभार.
या काळात रोज जर मुखपृष्ठावर ऑलिंपिक पदतालिका टाकण्यात आली तर ते उपयुक्त आणि आकर्षक ठरू शकेल.
पदतालिकेमधील पहिल्या तीन देशांची नावे मुखपृष्ठावर टाकून नंतर मुख्य लेखावर redirect करावे...
Padalkar.kshitij ०४:२९, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

यासाठी ही माहिती घातलेला एक साचा लागेल. साचा तयार केल्यास मुखपृष्ठावर मी तो टाकेन.
अभय नातू ०६:१३, ११ ऑगस्ट २००८ (UTC)


अभय,
मी हा मुखपृष्ठ ऑलिंपिक पदक तक्ता साचा तयार केला आहे.
उदा. माझ्या धूळपाटीवर आहे
काही बदल आवश्यक असल्यास सुचवावे.
Padalkar.kshitij २०:३७, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

साचा चांगला झाला आहे. मुखपृष्ठावर टाकला आहे. अभय नातू २२:५८, ११ ऑगस्ट २००८ (UTC)

Translation Help

संपादन

I am working on template:convert which is helpful for conversion of units. Please help me in translating the english unit names to marathi. You can find the list at सदस्य:Maihudon/temp1

Maihudon ०९:०९, १३ ऑगस्ट २००८ (UTC)

dhanyavad wikipedia

संपादन

tumhi chagla upakram chalavla aahe marathi mansan sathi...........

Namaskar sagalya Maharastrian lokana.....

संपादन

Namaskar sagalya Maharastrian lokana.....

साचा:देश माहिती ब्रुनेई

संपादन

'BRN' short form is used for Bahrain on the official olympics site
But on Marathi wiki in साचा:देश माहिती ब्रुनेई BRN is used for Brunei.
For Bahrain, on marathi wiki, the short form used is BHR
In fact Brunei is disqualified from Summer Olympics 2008, see this
What is the internationally accepted short forms for these countries?
Padalkar.kshitij १६:०९, २१ ऑगस्ट २००८ (UTC)

There are different codes available for countries, like FIFA, olympic and ISO.

Since when compared with english wikipedia we dont have too much resources , we use the country data templates for this. And the errors you had mentioned have tobe manually corrected.

Regarding you query on ब्रुनेई, please see the english wikipedia country template on ब्रुनेई and it uses the simillar shortname. en wiki

Maihudon ०९:२४, २५ ऑगस्ट २००८ (UTC)

आपले म्हणणे बरोबर आहे, मी ब्रुनेईसाठी manually change करतो.
Padalkar.kshitij १२:१९, २५ ऑगस्ट २००८ (UTC)

Tell_us_about_Marathi_Wikipedia

संपादन
Please contribute a little info at Tell_us_about_Marathi_Wikipedia at meta page. Mahitgar ११:०४, ३ सप्टेंबर २००८ (UTC)

मराठी विकिपीडिया विपत्र प्रचार

संपादन

अनेक मराठी व्यक्तींना अजूनही मराठी विकिपीडियावद्दल काहीच माहित नाही आहे. माझ्या मते त्यांना या मुक्तकोशाबद्दल माहिती झाल्यास अनेक नवीन सदस्य नोंदणी करतील, तसेच संपादनांमध्येही हातभार लावतील. आज जगभरात मराठी व्यक्ती पोहोचल्या आहेत. अनेक मराठी विद्यार्थी, अभियांत्रिक अमेरिका-युरोप मध्ये आहेत, त्यांची पण मदत होऊ शकते. यासाठी आपल्या मित्रांमध्ये विकिपीडियाचा प्रचार करणे आवश्यक आहे. orkut/facebook सारख्या social networking sites सुद्धा यासाठी उपयुक्त ठरू शकतील. खाली मी विपत्राचा कच्चा आराखडा दिला आहे, यामध्ये नवीन सदस्य म्हणून मला स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही यात बदल करू शकता. इतर विकिपीडिया सदस्य, प्रबंधक यांचे याबाबत काय मत आहे, हे कळवावे.

नमस्कार,
तुम्हाला माहित असेलच की विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प आहे. हे लोकांनी लोकांसाठी तयार केलेले मुक्त ज्ञानाचे भांडार आहे.
सर्व भाषांमध्ये ज्ञानकोश उपलब्ध व्हावा म्हणून जगातील अनेक भाषांमधील विकिपीडियाची सुरुवात झाली आहे. मराठी विकिपीडिया हा याच प्रकल्पाचा एक भाग आहे. 
मराठी विकिपीडिया सध्या अर्भक अवस्थेत आहे. सद्ध्या यामध्ये सुमारे १९,७०० लेख आहेत. या तुलनेत इंग्रजी विकिपीडिया मध्ये सुमारे २५,६०,००० लेख आहेत. 
अनेक शाळेत जाणारी मुले तसेच इंग्रजी न जाणणार्‍या व्यक्ती भाषेच्या कारणामुळे या ज्ञानापासून वंचित राहत आहेत. तसेच याचा उपयोग अभ्यासकांनासुद्धा होतो. 
याचसाठी मराठी विकिपीडियाला आपली मदत हवी आहे.
मला माहिती आहे तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील...जसे...

१. मराठीत typing करणे खूप अवघड असते....मला जमेल का?
मराठीत typing करणे आधी खूप अवघड होते. पण आता unicode मुळे हे एकदम सोपे झाले आहे. 
बराहा नावाचे software हे काम एकदम सोपे करते. उदा. आपण chatting करतांना जसे 'kasaa aahes?' लिहितो, तेच बराहा install केल्यावर 'कसा आहेस?' असे बनते. 
आणि सर्व browsers unicode support करतात. बराहा शिवाय पण अनेक सोपे पर्याय उपलब्ध आहेत.

२. मराठी व्याकरण...बाप रे...
व्याकरणात चुका सुरुवातीला होतील. पण अनेक विकिपीडियन मंडळी नवीन झालेले बदल बघत असतात. ते त्या चुका दूर करतील. हळुहळू तुमच्या चुकापण कमी होत जातील.

३. विकिपीडिया मध्ये लिहायचे म्हणजे General Knowledge एकदम जबरदस्त हवा, त्या विषयाची पूर्ण माहिती हवी...मला ते जमेल का?
विकिपीडियामध्ये एकच माणूस पूर्ण लेख लिहित नाही, तर तो लेख सर्वांच्या मदतीने थोडा थोडा करत बनत जातो. 
लेखाचा अपूर्ण भाग बघून आणि त्याबद्दल माहिती गोळा करून तुम्ही तिथे भरू शकता.
ते पण अवघड वाटत असेल तर एक इंग्रजी विकिपीडियामधील लेख घ्या आणि त्याचे भाषांतर करायला चालू करा.
ते पण अवघड वाटत असेल तर तुम्हाला जो लेख विकिपीडियामध्ये असावा असे वाटते त्या लेखाचे पान तयार करून इतर विकिपीडियन मंडळींना त्या लेखाच्या 
विस्तारासाठी विनंती करा. तसेच लेखांची विविध वर्गांमध्ये विभागणी करा. तसेच इतरांच्या बदलांचे वाचन करा आणि त्यात काही चूक असेल तर त्या सांगा/बदला.

४. सध्या विकिपीडियामध्ये काय चालू आहे?
विकिपीडियामध्ये सध्या लोकसभा प्रकल्प चालू आहे. तिथे मदत हवी आहे.
तसेच ऑलिंपिक २००८ चा प्रकल्प पण जोरात चालू आहे.
पण याच प्रकल्पांमध्ये मदत करणे अनिवार्य नाही, तुम्हाला जो विषय चांगला वाटतो तिथे मदत करा.

५. पण विकिपीडियावर लिखाण कसे करायचे?
विकिपीडियावर नवीन मंडळींसाठी अनेक मदत पाने आहेत. 'मराठी typing',लेख लिहिणे etc, सर्व बाबतीत तिथे मदत मिळेल. आणि अजून काही असले तर इतर मंडळींना चावडीवर विचारा.

ती रामायणातील खार आठवते ना...
आपण पण खारीचा वाटा दिला तर हा विकिपीडियाचा प्रकल्प खूप वाढीस लागू शकतो...तुम्ही तुमची एखादी खूण तुमच्या मदतीद्वारे ज्ञानकोशामध्ये अमर करू शकता.

विकिपीडियामध्ये नोंदणी करा...आणि हातभार लावा.

आपला,

यामध्ये external links नाही आहेत. विपत्र पाठवण्याआधी त्या links टाकाव्यात. linksसहित विपत्राची प्रत मी yahoo groups वर टाकू शकतो.
Padalkar.kshitij १३:५०, ४ सप्टेंबर २००८ (UTC)

I do agree with Padalkar.kshitij , I have done such effort previously, and as Kshitij says many more people need to start sending such emails to our friends and recomond them to use Marathi language wikipedia.Mahitgar १६:३८, ६ सप्टेंबर २००८ (UTC)

सुचवण्या

संपादन

वॉल्टर रीड नामक अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ देखील आहे आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू देखील आहे, तरी आवश्यक बदल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे वाद्यातील मॅंडोलिन हा शब्द मेंडोलिन असा करण्यात यावा. वाद्यांमधील वर्गवारी बरीच विस्कळीत आहे. सर्व वाद्यांचा वर्ग:वाद्ये मध्ये समावेश करावा तसेच व्हायोलिनवादक, पखवाजवादक यांप्रमाणे नवीन वर्ग देखील सर्व वाद्यांबाबत बनवावेत, जेणेकरुन वर्गवारी एकाच ठिकाणी पाहता येईल आणि वर्गीकरण करणे सोपे होईल. धन्यवाद. सौरभदा ०५:१३, १३ सप्टेंबर २००८ (UTC)

Redtigerxyzis now GA en:Vithoba for FAC. I would like suggestions to improve the article to FA status. Also, i request some copyeditor to go through the article to polish the language, if needed.

from [[:en:Wikipedia talk:Noticeboard for India-related topics ]] Mahitgar ०७:२९, १४ सप्टेंबर २००८ (UTC)

एखाद्या व्यक्तीचे नाव लिहताना आद्याक्षरे कशी लिहावीत? एम.एस.सुब्बलक्ष्मी असे लिहून दुवा तयार केला तर आधीच उपलब्ध असलेले एम.एस.(स्पेस)सुब्बलक्ष्मी हे पान दिसत नाही व नवीन पान तयार करण्याबाबत सूचना मिळते. कृपया सदस्यांनी नावे लिहताना आद्यांक्षरांमध्ये (स्पेस) जागा सोडावी. जसे की ना. धों. महानोर ( ना.धों.महानोर ऐवजी). याबाबत एकवाक्यता असणे गरजेचे आहे. आधी झालेल्या चुका दुरुस्त करण्यात याव्यात.सौरभदा ०५:०४, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

मराठी विकिपीडियावर व्यक्तीचे नाव अ.ब. आडनाव असे लिहिण्याचा प्रघात आहे. आद्याक्षरांमध्ये जागा सोडू नये व सगळ्या आद्याक्षरांनंतर एक जागा सोडून आडनाव लिहावे - अ.ब.क.ड. आडनाव. आडनाव दोन (किंवा अधिक) शब्दांचे असल्यास मध्ये जागा सोडावी. मूळ नावात आडनावातील दोन (किंवा अधिक) शब्दांमध्ये हायफन (-) असेल तरच ते घालावे - Sirleaf-Jones => सर्लिफ-जोन्स पण Narasimha Burri Reddy => नरसिंह बुर्री रेड्डी.
इतर प्रकारच्या शुद्धलेखनांकडून मूळ लेखाकडे पुनर्निर्देशन करावे - ना. धों. महानोर हे पान ना.धों. महानोर कडे.
जे नाव रूढ असेल त्या शुद्धलेखनाने लेख तयार करुन इतर नावांचे पुनर्निर्देशन त्याकडे करावे - विनायक नरहरी भावे => विनोबा भावे.
शक्यतो मूळ भाषेतील नावानेच पान तयार करावे व इंग्लिश/भारतीय भाषांमधील रूढ नावांची पुनर्निर्देशने करावी - व्हिसेंते फॉक्स लेख करुन त्याकडे व्हिसेंटे फॉक्स पुनर्निर्देशित करावे.
त्रुटी दिसल्या तर त्या सुधाराव्यात :-)
अभय नातू ०५:१५, १६ सप्टेंबर २००८ (UTC)

शंका(नेहमीप्रमाणे)

संपादन

लालगुडी जयरामन ऐयर याऐवजी अय्यर असे असावे असे वाटते. ऐयर ऐवजी अय्यर जास्त रुळलेले आहे बहुधा! ;-) सौरभदा ०४:५३, १७ सप्टेंबर २००८ (UTC)

बरोबर. तुम्ही योग्य ते स्थानांतर करू शकता.
--संकल्प द्रविड (चर्चा) १५:३४, १७ सप्टेंबर २००८ (UTC)

२०,००० लेखांचा टप्पा

संपादन

मराठी विकिपीडिया लवकरच २०,००० लेखांचा टप्पा पार करेल.
For that we can display some counter on the Front page
Following is something I tried

२०,००० चा टप्पा

संपादन

मराठी विकिपीडियाला २०,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त −७७,१८१ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.

Padalkar.kshitij ०८:४९, १७ सप्टेंबर २००८ (UTC)

शंका:-(

संपादन

एखाद्या माहिती असलेल्या परंतु चुकीचे (अशुद्ध) नाव असलेल्या पानाचे नाव परत कसे बदलावे. उदा. श्रीहरीकोटा ऐवजी श्रीहरिकोटा असे हवे असेल तर काय करावे?सौरभदा ११:११, २० सप्टेंबर २००८ (UTC)

अशा पानांचे स्थानांतरण करावे. यासाठी पानाच्या वरच्या भागात संपादन, इतिहास, इ. दुव्यांशेजारच्या स्थानांतरण या दुव्यावर टिचकी मारावी.
अभय नातू १२:५९, २० सप्टेंबर २००८ (UTC)

units of information

संपादन

याला मराठी शब्द काय असेल? , "माहिती मापनाची एकके", "माहितीची एकके" ?
Padalkar.kshitij १४:५८, २० सप्टेंबर २००८ (UTC)

२०,००० लेख!!!

संपादन

मराठी विकिपीडियाने आज (सप्टेंबर २२, २००८ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) रोजी २०,००० लेखांचा टप्पा गाठला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा २०,०००वा लेख आहे. या लेखात भर घालून तो परिपूर्ण करावा ही विनंती.

अभय नातू ०१:३४, २२ सप्टेंबर २००८ (UTC)

मराठी विकिपीडियाचे अभिनंदन! २०,००० लेखांचा टप्पा गाठणे ही कुठल्याही विकिपीडियाकरता अभिनंदनीय बाब असते. हे कौतुक,अभिनंदन करताना मला काहीशी अतृप्तीदेखील वाटते (दुधात मिठाचा खडा लागल्यामुळे, आता शिव्या खाव्या लागणार!). अतृप्ती या गोष्टीची की मराठी विकिपीडिया अजूनही आशय, मांडणी, भाषिक दर्जाबाबत क्षीण वाटतो. आताच मी १०-१२ ’अवि्शिष्ट पाने’ चाळून पाहिली, त्यातही याला दुजोरा मिळाला; एखाद-दोन पाने वगळता बहुसंख्य लेख अपूर्ण होते. किंबहुना कित्येक लेख तर फक्त शीर्षक, वर्गीकरण आणि ’विस्तार विनंती’ साचा आणि झालंच तर आंतरविकि दुवे डकवलेलेच दिसतात. मराठी विकिपीडियाने इथून पुढे आशय, मांडणी, भाषिक दर्जा अशा तिन्ही अंगांनी गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे वाटते. केवळ संख्येची शिखरे ओलांडण्यात धन्यता मानू नये; अन्यथा मराठी विकिपीडिया हा केवळ बहुसंख्य शीर्षकमात्र लेखांचा ढिगारा ठरण्याचा धोका उद्भवतो.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:१०, २३ सप्टेंबर २००८ (UTC)
संकल्प यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कोणत्याही विश्वकोशाला दर्जा तर पाहिजेच.
याचबरोबर येथे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा विचार केला तर महिन्याला ३-४ दर्जेदार लेख तयार होतील आणि चार-पाच वर्षात मराठी विकिपीडिया २०० चांगल्या लेखांचा संग्रह होईल. सर्वसाधारण वाचकाला सगळ्यांविषयांबद्दल थोडी तरी आणि थोड्या विषयांबद्दल सगळी माहिती देणारा संदर्भ असा हा विश्वकोश सुरुवातीस तरी झाला पाहिजे असे मला वाटते.
माझ्या मते १५० चांगले लेख आणि १९,८५० अपूर्ण लेख असले तर मराठी विकिपीडियाला मिळणारी प्रसिद्धी ही २-५०० चांगल्या लेखांमुळे मिळणार्‍या प्रसिद्धीच्या अनेकपट आहे/असेल. यात व्यक्तिगत प्रसिद्धीमागे लागण्याचा उद्देश नसून त्याद्वारे अधिकाधिक वाचक/लेखकांबद्दल पोचण्याचा अट्टाहास आहे.
विकिपीडियाच्या नियमावलीत राहून लेख वाढविण्यात काहीही गैर नाही. त्याचबरोबर नुसतेच टाकाऊ लेखही असू नयेत.
अभय नातू १३:०७, २३ सप्टेंबर २००८ (UTC)
ता.क. आणि शीर्षकमात्र लेख असले तर ते मोठे करू नयेत असा नियम नाहीच!!! आपल्यांपैकी अनेक लेखक हा उद्योगही करीतच आहेत. त्यांनाही धन्यवाद.
सर्वप्रथम २०००० लेख पूर्ण केल्याबद्दल मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन! बरेच लेख एकदोन ओळींचेच असतात असे असले तरी हा आकडा देखील काही कमी नाही. ( हिंदी विकीला मागे टाकण्यासाठी जरा वेग वाढवावा लागेल. ;-)आणि तेलुगू तर खूपच पुढे निघून गेले आहेत. :-( असो. मला वाटतं सदस्य प्रवेश हा दुवा बर्‍याच जणांना दिसत नसावा. ;-) सदस्य प्रवेशाची मुखपृष्ठावर अगदी कोपर्‍यात दिसणारी जागा खाली कुठे आणता येईल का? बरेच जण अगदी कुठेही (विकीपीडिया प्रबंधक किंवा लेख संपादन स्पर्धा या पानात) संपादन करुन त्यांचं म्हणणं मांडत असतात. सदस्यत्व घेणे आणि सदस्यत्वाचे फायदे याबाबत मुखपृष्ठावर लक्षवेधक असे काही करता येईल का? शिवाय मुखपृष्ठावरच्या स्वागताच्या ओळींमध्ये 'तुमचे प्रश्न अथवा शंका (डाव्या समासात असलेल्या)चावडीवर विचारा' अशी ओळ टाकण्याची सूचना करावी वाटते.सौरभदा १३:२८, २३ सप्टेंबर २००८ (UTC)
सर्वप्रथम विकिजनांचे मनःपूर्वक अभिनंदन !
मराठी विकिपीडियाने २०,००० लेखांचा टप्पा ओलांडणे ही खचितच एक महत्वपूर्ण बाब आहे आणि विशेषतः विकिजनांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली झालेली ही वाटचाल आहे.
पुढे हेच ओझे आपली शिदोरी ठरेल ही माझी आशा आहे.
आता विकिपीडियाच्या संरचनेबद्दलच्या चर्चेसंदर्भात माझे दोन आणे !
विकिपीडिया हा मुक्तकोश (मुक्त + विश्वकोश) आहे. सर्व प्रकारची (*अगदी सर्व प्रकारची*) माहिती या कोशात असणे अभिप्रेत आहे.
प्रश्न केवळ माहितीच्या प्रतीचा (quality) आहे. जो काही विकिपीडियाचा भाग आहे, तो सर्व अचूक आणि शुद्ध असावा.
संकल्पने ही सूचना या आधीच केलेली आहे.
प्रत्येकाचा वाटा खारी एवढा असला तरी देखील मराठी विकिपीडिया संपन्न बनेल यात शंका नसावी.
Harshalhayat १८:२५, २३ सप्टेंबर २००८ (UTC)

माझ्यातर्फेपण मराठी विकिपीडियाचे मनापासून अभिनंदन! संकल्प यांच्या सूचनेशी मी सहमत आहे. पण त्यात मला थोडी भर घालावी वाटत आहे. मराठी विकिपीडियाचा वाचक हा ’मराठी माणूस’ आहे. त्यामुळॆ कमीत कमी मराठी आणि महाराष्ट्राशी निगडित लेख प्रार्थमिकतेने पूर्ण झाले पाहिजेत. कमीत कमी मराठी सण, साहित्य आणि साहित्यिक, स्थळे, पाककृती, राजकारण, समाजकारण, क्रिडा etc. यांच्यावरच्या लेखांसाठी जर ’साक्षर आणि इंग्रजी जाणणारा’ मराठी माणूस इंग्रजी विकिकडॆ न वळता मराठी विकिकडॆ आला तर ती एक मोठी उपलब्धी ठरेल. Let user go to English wiki for information on "U.S. Elections", पण पु.ल. देशपांडेंबद्दल दर्जेदार माहितीसाठी तो मराठी विकिकडेच वळला पाहिजे. माझ्या मते मराठी विकि सर्वसमावेशक असावाच असा अट्टाहास असणे योग्य नाही. (तो भविष्यात तसा झाला तर उत्तमच).
Padalkar.kshitij १५:१८, २३ सप्टेंबर २००८ (UTC)


हा टप्पा गाठल्यामुळे इंग्रजी विकिच्या मुखपृष्ठावर मराठी विकिचा दुवा आलेला आहे. आता कदाचित इंग्रजी विकिवर भेट देणारे मराठी वाचक/संपादक मराठी विकिकडे वळण्याची शक्यता वाढेल.
--कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:११, ५ ऑक्टोबर २००८ (UTC)
संपादन

me ak vachak aahe mala aapanas ase suchavache aahe ki aapan gelaay varshepramane navratra utsav cha nav idvassache rangapramane aa varshihi rang utsav celebration lihave suman email sonal.shubham@yahoo.co.in

Cut paste of a message typed on wrong page by IP address . 59.182.58.23

write access to everyone.

संपादन

I was checking some pages on marathi wikipedia. I dont see write access to many pages. Is there any specific reasons for denying people to express their views without being monitored? Is it possible to open those pages for everyone to be truthful for what wikipedia stands for?

I can understand the vandalism that might cause. but wikipedia already has such checks and balances coverd under its policy.

Thank you --Layzyak १७:०५, १ ऑक्टोबर २००८ (UTC)

Hello,
Most (>99.5%) of pages on Marathi wikipedia are open to everyone, even anonymous users.
Per Wikimedia policy (not specific to Marathi Wikipedia), newly registered users do not have access to edit certain pages. I believe the wait time is 10-15 days. After than, you will have access to edit most articles.
Some articles/pages are explicitly protected. They are mostly any pages related to front page and articles with a very high rate of vandalism and/or drive-by unreferenced changes.
If you have a particular article where you wish to make a change to but can not do so at this time, you can alway edit the चर्चा page for that article and request an update. Alternately, you can request that change here.
You wrote - Is there any specific reasons for denying people to express their views without being monitored?
More importantly, this site is not for anyone to express their views. This is an encyclopedia. Collection of inter-related, referenced, verifiable facts. There are millions of blog sites where someone can express their views.
I welcome you to Marathi Wikipedia once again and hope that your contribution will make a positive impact.
Please do not hesitate to ask questions, request help or express your views about wikipedia here.
Regards
अभय नातू १७:३४, १ ऑक्टोबर २००८ (UTC)

Anonymous request

संपादन

HALL HAUL MARATHIT KASA LIHAWA

Pls refer to सहाय्य:सहाय्य पृष्ठ
अभय नातू २०:२७, १ ऑक्टोबर २००८ (UTC)