मँचेस्टर युनायटेड एफ.सी.

(मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)


मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. हा इंग्लंडमधील मॅंचेस्टर या शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड या ठिकाणी असलेला व्यावसाइक फुटबॉल संघ आहे.१८७८ मधे न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने स्थापित झाला,१९०२ मधे या संधाने मॅंचेस्टर युनायटेड असे नामांतरण करून हा संघ १९१० रोजी ओल्ड ट्रॅफोर्ड येथे स्थलांतरित झाला.

मॅंचेस्टर युनायटेड
Manchester United's emblem
पूर्ण नाव मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब
टोपणनाव द रेड्स, द रेड डेव्हिल्स, मॅन युनायटेड, मॅन यु
स्थापना १३७ वर्षा पूर्वी १८७८ रोजी ,

(न्यूटन हीथ एल & वाय आर एफ.सी. या नावाने)

मैदान ओल्ड ट्रफोर्ड
(आसनक्षमता: ७५,६४३)
मालक मॅंचेस्टर युनायटेड पब्लिक लिमीटेड कंपनी (एन.वाय.एस.ई.MANU)
व्यवस्थापक नेदरलँड्स एरिक टेन हॅग
लीग प्रीमियर लीग
२०१५/१६ प्रीमियर लीग, ५
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

म्मूनिच विमान अपघाताच्या १० वर्षांनंतर, १९६८ रोजी सर मॅट बस्बी यांचा व्यवस्थअपनाखाली यूरोपियन कप जीकणारा मॅंचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश संघ बनला. नोव्हेंबर १९८६ला व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर २६ प्रमुख विजेतेपद मिळवल्यामुळे सर ॲलेक्स फर्ग्युसन हे संधाचे सर्वोत्तम व्यवस्थापक आहेत.

१९९८/९९ या एकाच वर्षी एफ.ए. प्रीमियर लीग, एफ. ए. चषक व यूएफा चॅम्पियनस लीग जिंकल्यमूळे तिहेरी विजेतेपद मिळवलेला हा ऐक अद्वितिय संघ बनला. १८ एफ.ए. प्रीमियर लीग कप, ४ लीग कप आणि ११ फ.ए. कप जिंकल्यामूळे इंग्लिश फुटबॉल इतिहासातील लिव्हरपूल बरोबरचा हा एक अद्वितीय क्लब आहे.

गेल्या दशकातील कामगीरी मुळे तसेच इंग्लिश फुटबॉलला असलेले वलय यामुळे हा क्लब जगातील सर्वाधिक श्रीमंत व सर्वाधिक चाहते असणारा क्लब बनला आहे[]. याचे जगभर ६० कोटी पेक्षाही अधिक चाहते असून, अशिया खंडातील कित्येक देशात या क्लबचा प्रभाव आहे. या क्लबची मालमता £१.१९ अब्ज इतकी असल्यमुळे हा जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.

क्लबचा इतिहास

संपादन

स्थापना व सुरुवातीची वर्षे (१८७८-१९४५)

संपादन
 
१८९२-९३ मध्ये न्यूटन हीथ ह्या नावाने भाग घेतल्या पासून २००७-०८ च्या प्रिमीयर हंगामापर्यंतची मँचेस्टर युनायटेड संघाची प्रगती दाखवणारा तक्ता.

हा क्लब १८७८ मध्ये न्यूटन हीथ एल अँड वाय आर एफ.सी. म्हणून स्थापन झाला. प्रामुख्याने याचे सदस्य लॅंकेशायर रेल्वे डेपोचे कामगार होते. काही काळानंतर क्लबने १८९२ मध्ये फुटबॉल लीगमध्ये प्रवेश केला. याच दरम्यान क्लबला आर्थिक नुकसान झाले व कोर्टाद्वारे क्लब बंद पाडण्यात आला. त्याच वेळेस क्लबला लक्षाधीश जॉन डेव्हिस याच्याकडून भरघोस मदत मिळाली व क्लब तरला. त्यामुळे श्री जॉन डेव्हिस हे क्लबचे आद्य मालक मानले जातात. क्लबने नव्याने सुरुवात करण्यात यावी असे ठरले व २६ एप्रिल १९०२ला मँचेस्टर युनायटेड असे नामकरण करण्यात आले. यावेळी लाल व पांढरे हे क्लबचे अधिकृत रंग म्हणून निवडण्यात आले.

या दरम्यान क्लब अजूनही तळातील लीगमध्ये खेळत होता व पहिल्या दर्ज्याच्या लीगमध्ये बढती मिळवणे हे क्लबचे पहिले लक्ष्य होते. क्लबने अनेक नवीन फुटबॉलपटूंशी भरघोस रक्कम देउन करार केला व त्याचा परिणाम १९०४ मध्ये दिसला. क्लब लीग मध्ये तिसऱ्या स्थानावर आला. १९०६ मध्ये क्लबने द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये दुसरा क्रमांक मिळवला व प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश केला. १९०८ मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबने पहिल्यांदा प्रीमियर लीग जिंकली. पुढील हंगामाची सुरुवात त्याने चॅरिटी शील्डच्या विजयाने तर शेवट फ.ए. कप विजयाने केला. मँचेस्टर युनायटेडने प्रथम दर्जाची लीग दुसऱ्यांदा १९११ साली जिंकली परंतु १९१२ मध्ये क्लबचे सचिव मॅग्नालने रामराम ठोकला आणि तो मँचेस्टर युनायटेडचा पट्टीच्या प्रतीस्पर्धी मँचेस्टर सिटी याचा पदभार सांभाळण्यास गेला.

प्रथम महायुद्धाच्या नंतर जेव्हा फुटबॉलचा पुन्हारंभ झाला तेव्हा मँचेस्टर युनायटेडचा द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये फेकला गेला, १९२५ पऱ्यंत प्रथम दर्जाच्या लीगमध्ये पुनःप्रवेश मिळवेपर्यंत हा क्लब द्वितीय दर्जाच्या लीगमध्येच खेळत होता. तो परत १९३१ रोजी द्वितीय दर्जाच्या लीगमध्ये गेला. १९३४ मध्ये मात्र आजतगायतचा नीचांक म्हणजेच २० पर्यत खाली घसरला. क्लबच्या प्रमुख उपकारकर्ता जे.एच. डेव्हिस यांचा मृत्युनंतर क्लबचा आर्थिक डोलारा घसरला आणि क्लब जवळ जवळ कर्जबाजारी झाला. परंतु जेम्स.डब्ल्यु. गिब्सन यांनी £२,००० गुंतवून क्लबचा अधिभार सांभाळला. १९३८-३९चा हंगाम हा द्वितीय महायुद्धा आधीचा शेवटचा हंगाम होता. ह्या हंगामात मॅन युने चौदावे स्थान पटकावले.

बस्बी कालखंड (१९४५ ते १९६९)

संपादन
 
डेन्मार्क येथे द बस्बी बेबस १९०५

१९४५ ते १९६९ हा क्लबच्या इतिहासात बस्बी कालखंड (द बस्बी इयर्स) असे म्हणले जाते. १९४५ मध्ये मॅट बस्बी यांची क्लबचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्यांनी न भूतो न भविष्यति अशाप्रकारे संघनिवडीची सूत्रे, इतर क्लबांशी खेळाडूंचे आदानप्रदान ही सुत्रे आपल्याकडे ठेवली. बस्बी प्रशिक्षणादरम्यान मैदानावर हजर असे. बस्बीच्या अश्या काही नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे काही वर्षातच क्लबला पुन्हा एकदा बरे दिवस पुन्हा चालू झाले. क्लबने १९४७,४८ व ४९ मध्ये सलग तीन वर्षे प्रथम दर्जाच्या लीगमध्ये दुसरे स्थान पटकावले व १९४८ मध्ये एफ.ए. कपचे विजेतेपद मिळवले. १९५२ मध्ये आपल्या अस्तित्वाच्या ४१व्या वर्षात अखेर क्लबने लीगचे विजेतेपद मिळवले. १९५६ मध्ये एकापाठोपाठ विजेतेपद मिळवणाऱ्या संघास प्रसार माध्यमांनी बस्बी बेब्स असे टोपण नाव ठेवले कारण त्यांचे सरासरी वय २२ होते (बेब्स ह्मणजे तरुण मुली). हे सर बस्बी यांचा तरुण खेळाडूंवरील विश्वासाचे द्योतक होते. फुटबॉल असोसिएशनची आडकाठी असतानाही १९५७ मध्ये युरोपियन कप खेळणारा पहिला इंग्लिश संघ ठरला. फुटबॉल असोसिएशने आदल्या वर्षी चेल्सी क्लबला या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला होता. या स्पर्धेत ते उपांत्य फेरीत पोहोचले जेथे त्यांचा रेआल माद्रिदकडून त्याने पराभव पत्करला. पण त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात त्यांनी बेल्जियन विजेता क्लब आंदरलेच याला १०-० ह्या फरकाने पराभूत केले जो त्यांचा आजवरचा युरोपियन स्पर्धेतील सगळ्यात मोठा विजय आहे.

 
म्युनिच एयर डिझास्टर मधील मृत्युमुखी पडलेल्या खेळाडूंची आठवण टेवणारी ओल्ड ट्रॉफोर्ड येथील पाटी.

याच सुमारास मॅंचेस्टर युनायटेड फुटबॉल इतिहासातील अत्यंत धक्कादायक घटनेला सामोरा गेला. ६ फेब्रुवारी १९५८ रोजी रेड स्टार बेल्ग्रेड यांचा वरील उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर परतीचा प्रवासावेळी क्लबचे खेळाडू, अधिकारी आणि पत्रकार यांना घेउन जाणारऱ्या विमानाचा म्युनिच येथुन इंधन भरती केल्यानंतर उड्डाण करताना अपघात झाला. या दुर्घटनेत २३ लोकांचा बळी गेला ज्यात जॉफ बेंट, रॉजर ब्यार्ने, एडी कोलमन, डंकन एडवर्ड्स, मार्क जोन्स, डेविड पेग, टॉमी टेलर आणि बिली व्हेलन हे आठ खेळाड मृत्युमुखी पडले तर इतर अनेक खेळाडू जखमी झाले.

राखीव संघाचे व्यवस्थापक जिमी मर्फी यांनी क्लबची सुत्रे हाती घेतली आणि क्लब फ.ए. कपच्या अंतिम फेरीत पोचला. येथे त्याला बॅल्ट्न वॉडरर्सकडून हार पत्करवी लागली. क्लबची शोककथा लक्षात घेऊन युएफाने त्यांना लीग विजेते वॉलवरहॉंप्टन वॉडरर्स यांचा समवेत १९५८-५९चा युरोपियन कप खेळण्यास बोलावले. फ.एच्या परवानगी नंतरही क्लबच्या अपात्रतेमुळे फुट्बॉल लीगने त्यांना लीग स्पर्धेत भाग घेण्यस नकार दिला. बस्बी यांनी ६० च्या दशकात डेनिस लॉपॅट क्रेरॅंड या सारख्या खेळाडूंना संघात बोलावून आणि जॉर्ज बेस्टयांसारख्या तरुण खेळाडूंच्या पिढीस बरोबर घेऊन संघाची पुनर्बांधणी केली आणि १९६३चा फ.ए कप जिंकला.त्यानंतरच्या हंगामात त्यांनी लीगमधे दुसरे स्थान पटकावले आणि १९६५ व १९६७ च्या हंगामात लीगचे विजेतेपद पटकावले. ६० चे दशक हे इंग्लिश फुटबॉलमध्ये मॅंचेस्टरचे ठरले व यामुळेच बऱ्याच अंशी इंग्लिश फुटबॉलला पण चांगले दिवस मिळाले. इंग्लंडने १९६६ मध्ये विश्वकरंडक जिंकला, या विश्वविजेत्या संघातील अनेक जण मॅंचेस्टरचे खेळाडू होते. १९६८ यावर्षी क्लबने युरोपियन कप जिंकणारा पहिला इंग्लिश फुटबॉल क्लब बनण्याचा मान पटकावला. बेनफिकाला ४-१ असे हरवून मॅंचेस्टर युरोपियन कप विजेता झाला. या संघात युरोपियन फुटबॉलर ऑफ द इयर-बॉबी चालटन, डेनीस लॉ, जॉर्ज बेस्ट ह्या सारख्या खेळाडूंचा समावेश होता.१९६९ मध्ये २४ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीनंतर बस्बी यांनी व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला व मॅंचेस्टरला सुवर्णकाळ देण्याऱ्या बस्बी कालखंडाचा विराम झाला. क्लबचे व्यवस्थापन राखीव संघाचे व्यवस्थापक विल्फ मॅकगिनीस ह्यांचा कडे देण्यात आले.

१९६९ ते १९८६

संपादन
 
ब्रायन रॉबसन हा मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा,इतर कुठल्याही खेळाडूपेक्षा अधिक काळ, १२ वर्श कप्तान होता .[]

१९६९-७० मोसमातील आठवे स्थान आणि १९७०-७१ च्या मोसमाची खराब झालेली सुरुवात ह्यामुळे बस्बी यांना पुन्हा आमंत्रण देण्यात आले व काही काळ त्यांनी पुन्हा व्यवस्थापक म्हणून काम केले, परंतु यावेळेस त्यांनी क्लबला कायमचा रामराम ठोकला.जुन १९७१ मध्ये फ्रँक ओफारेल यांची व्यवस्थअपक म्हणून नेमणूक करण्यात आली पण ते फक्त १८ महिने कार्यभार सांभाळू शकले आणि डिसेंबर १९७२ मध्ये त्यांची जागा टॉमी डॉकर्थी यांनी घेतली. डॉकर्थी यांनी क्लबला द्वितीय दर्जाच्या लीग मधे जाण्यापासून वाचवले पण पुढिल मोसमत क्लब द्वितीय दर्जाच्या लीग मधे फेकला गेला यात भरीस भर म्हणून क्लबचे तीनही महान खेळाडू बेस्ट, चार्लटनलॉ यांनीदेखील क्लबला रामराम ठोकला. ७३-७४ च्या मोसमात लॉ ने मॅंचेस्टर सिटी संघाकडून खेळताना युनायटेड विरुद्ध गोल केला व मॅंचेस्टरला लीगमधील अधोगती( रेलीगेशनचा) सामना करावा लागला. प्रथम दर्जाच्या लीगमध्ये प्रवेश मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात क्लब यशस्वि ठरला आणि १९७६ च्या फ. ए. कपच्या अंतिम फेरितही पोहोचला परंतु अंतिम फेरित तो साउद्मप्टनकदून १-० ह्या फरकाने हरला. १९७७ मध्ये क्लब पुन्हा अंतिम फेरित पोहोचल आणि ह्या वेलेस लीव्हर्पूलला २-१ ने हरवून अंतिम फेरित जिंकला.फिजीओथेरपीस्टच्या पत्नी बरोबर असलेल्या प्रेमसंबंधांमुळे त्याला व्यवस्थापकाचे पद सोडावेलागले. डेव सेक्स्टन ह्यांनी १९७७ च्या उन्हाळ्यात व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळला.जोइ जॉर्डन, गॅर्डन मॅक् क्विन, गॉरी बेली आणि रे विल्किंस ह्या सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना क्लब मधे आणूनही उत्तम निकाल देण्यास संघ अपयशी ठरला, क्लबने १९७९-८० च्या मोसमात लीग मधे दुसरे स्थान पटकावले आनणि १९७९ च्या फ.ए. कप अंतिम फेरित आरस्नेल कडून ३-२ अशी हार पत्करली. डेव सेक्स्टन यांचा मार्गदर्शनाखाली शेवटचे सात सामने जिंकुनही त्यांना व्यवस्थापक पदावरून काढले गेले. १९८१ मध्ये रॉय अटकिनसन यांची नेमणूक व्यवस्थापक पदावर नेमणुक झाली. लगेचच रॉय अटकिनसन यांनी खेळाडू बदनलीचा ब्रिटिश विक्रम मोडित काढला आणि ब्रायन रॅबसन या खेळाडूला वेस्ट ब्रुमविच अलबियॉन कडून विकत घेतले.

फर्ग्युसन कालखंड १९८६ ते १९९८

संपादन

अ‍ॅटकिनसन यांच्या सुमार कामगीरीमुळे हकालपट्टी झाल्यानंतर ॲलेक्स फर्ग्युसन यांची नियुक्ती झाली व संघाला घवघवीत नाही तरी अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढले. पुढील वर्षीच १९८८ मध्ये दुसऱ्या क्रमांकापर्यंत युनायटेडने प्रगती केली मात्र पुढिल वर्षीचा मोसमात युनायटेड परत ११व्या स्थानावर फेकला गेला.फर्ग्युसन देखिल हकालपट्टीच्या मार्गावर होते, परंतु १९९० च्या फ.ए.कपच्या अंतिम फेरितील क्रिस्टल पॅलेसच्या विजयाने(३-३ पूर्ण वेळेत)फर्ग्युसन बचावला असे सांगण्यात येते.पुढिल मोसमात क्लबने प्रथमव कप विनर्स कपच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि युरोपियन कप विजेते रेड स्टार बेलग्रेड यांना ओल्ड ट्रॅफरड येथे १-० ने हरवून १९९१ चे युएफा सुपर कपचे विजेतेपद पटकावले. त्यानंतरव्या लगेचच्या मोसमात क्लबने लीग कपव्या अंतीम फेरित दाखल झाला आणि एव्हढेच नाही तर नॉटिंघम फॉरेस्ट १-० ने हरवून विजेतेपदही पटकावले.१९९३ मधे क्लबने १९६७ नंतर प्रथमच लीगचे विजेतेपद पटकावले आणि पुढिल वर्षी लीग विजेतेपदा बरोबर फ.ए. कप जिंकुन क्लबच्या इतिहसात पहिल्यांदा दुहेरी विजेतेपद मिळवण्याची कामगिरी बजावली.

१९९२ मध्ये एरिक कॅंटोनाचे क्लबमध्ये आगमन झाले, कॅंटोना क्लबसाठी चांगलाच फलदायी ठरला. तसेच पॉल इन्स, डेनिस अरविन, पीटर श्मायकेल या सारख्या खेळांडूनी युनायटेडच्या यशात मोठा वाटा दिला. क्लबच्या ज्युनिअर संघाकडील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले. डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कोल्स, गॅरी नेव्हिल, फिल नेव्हिल इत्यादी. या खेळाडूंनी राष्ट्रीय संघात चांगली कामगीरी केली व इंग्लडच्या संघाला दरारा मिळवून दिला. १९९५ ९६ च्या मोसमात भरीव कामगीरी करत एफ्.ए.कप व लीगचे दुहेरी विजेते पद मिळवले. एरिक कॅंटोनाने १९९६-९७ च्या मोसमात निवृती जाहीर केली त्याच वर्षी ९७ची लीग युनायटेडने जिंकली व ९८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

१९९८-९९चा मोसम युनायटेडसाठी भलताच यशस्वि ठरला. क्लबने प्रिमीयर लीग, फ.एअ. कप आणि युएफा चॅम्पियन्स लीग जिंकुन तिहेरी विजेतेपद मिळवले आणि इंग्लिश क्लब फुटबॉल मध्ये इतिहास घदवला.१९९९ च्या युएफा चॅम्पियन्स लीग मध्ये इंजुरि टाइम मध्ये १-० असे हरत असतान टेडि शेरिंघम आणि ओले गुनर सोल्कयार यांनी अंतीम क्षणी गोल मारून बायर्न म्युनिचवर नाट्यमय विजय मिळवला.हा सामना आजवरच्या सर्वाधिक उत्कंठावर्धक सामन्यांमध्ये गणला जातो[]. या मोसमात युनायटेडचा संघ कित्येक वेळा पिछाडीवरून येत जिंकला होता व त्यासाठी मॅंचेस्टरच्या खेळाडूंनी दाखवलेली मैदानावरील विजीगीषु वृती ही आजही फुटबॉल जगतात स्मरणीय आहे.क्लबने पालमिरेसया संघाल तोक्यो येथे १-० ने हरवुन इटरकॉन्टिनेनटल कपवे विजेतेपदही मिळवले.फर्ग्युसन यांना त्यांचा फुटबॉल मधील भरिव कामगिरी बद्दल सरहि पदवी बाहाल करण्यात आली.

सन २००० मधे, क्लबने ब्राझिल येथे झालेल्या पहिल्याच फिफा क्लब वर्ल्ड कप मधे भाग घेतेला आणि १९९९-२०००,२०००-०१ च्या लीग कपचे विजेतेपद मिळवले. संघाला २००१-०२ च्या मोसमात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले मात्र २००२-०३ च्या मोसमात संघाने लीगचे पुन्हः विजेतेपद पटकावले. मिलेनीयम मैदन कार्डिफ येथे मिलवॉलला ३-० ने मात देउन २००३-०४ च्या फ.ए. कपचे विजेतेपद मिळवले.मॅंचेस्टर युनायटेड दशक भरात पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची प्रथम फेरी पार करू शकला नाही परंतु लीग मधे द्वितीय स्थान आणि २००६ च्या फुटबॉल लीग कप मधील विगन अ‍ॅथलेटिक् वरिल विजयाने मोसमावी सांगता झाली. क्लबने २००६-०७ आणि २००७-०८ च्या मोसमात पुन्हा लीग विजेतेपद पटकावले आणि २००८ च्या लुझनिकी स्टेडियम मॉस्को येथे झालेल्या युएफा चॅम्पियन्स लीग अंतिम फेरित चेल्सीला पेनल्टित ६-५ ने हरवुन युरोपिय दुहेरि विजेतेपद पटकावले. याच मॅच मधे रायन गिग्सने ७५९ वी मॅच खेळत क्लबचा सर्वाधिक अपियर्नसचा बॉबी वालटन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. २००८ च्या डिसेंबर महिन्यात क्लबने फिफा क्लब वर्ड कप, २००८-०९ फुटबॉल लीग कप आणि सलग तिसरी प्रिमियर लीग पटकावली. याच वर्षी रेड डेवील्स सलग दुसऱ्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरित दाखल झाले. परंतु एकतरफि झालेल्या ह्या सामन्यात क्लबला बार्सेलोनाकडुन २-० ने पराभव पत्करावा लागला. याच उन्हाळ्यात, क्लबचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डोला £८० दशलक्ष ह्या किंमतिस रेआल मद्रिद क्लबला विकण्यात आले, त्याचबरोबर कार्लोस तेवेझ हा खेळादुही क्लबचे पट्टिचे प्रतिस्पर्धी मॅंचेस्टर सिटी यांचा संघात सामिल झाला.२०१० चे साल क्लब साठी बरे नव्हते. लीग कपच्या अंतिम फेरितील अ‍ॅस्टन व्हिला वरिल विजय सोडता क्लबला बाकी कोणतेहि विजेतेपद पटकावता आले नाही.

संघाचे चिन्ह आणि रंग

संपादन

संघाचे चिन्ह मँचेस्टर नगरपालिकेच्या मानचिन्हाचरून घेण्यात आले आहे,परंतु त्यातील आता फक्त पूर्ण उघडलेल्या शिडाचे जहाजच बाकी आहे. क्लबच्या चिंन्हातील राक्षस हा क्लबच्या टोपण नाव "रेड डेवील्स" ह्या ह्यातून घेण्यात आला. १९६० च्या दर्म्यान क्लबचे कार्यक्रमांमधे तर १९७० च्या दर्म्यान क्लबच्या चिंन्हात ह्याचा समावेश करण्यात आला. परंतु क्लबच्या शर्टावर मात्र त्याचा समावेश १९७१ मधे करण्यात आला.

१८९२ मधे काढण्यात आलेल्या फोटोत असे मानण्यात येते की खेळाडूंनी लाल-पांढरा शर्ट आणि निळी पँट घातली आहे. १८९४-९६ मध्ये खेळाडू हिरवा आणि सोनेरी रंगाचा गणवेश घालत असत. तदनंतर १८९६ व्या मोसमात पांढरा शर्ट आणि निळी पँट जर्सी म्हणून वापरण्यात आली. जेव्हा क्लबचे मॅंचेस्टर युनायटेड असे नाम करणकरण्यात आले तेव्हापासून लाल रंगाचा शर्ट, पांढरी पँट आणि काळे मोजे अशीच होम जर्सी मुख्यतः वापरण्यात येते. १९२२ च्या मोसमा पर्यंत क्लबच्य जर्सीत फार कमी बदल करण्यात आले परंतु त्या नंतर १९२७ च्या मोसमा पर्यंत पांढऱ्या जर्सीवर गडद लाल रंगाचा 'V' आकाराचा पट्टा होता, १९०९ च्या फ.ए. कप मधे घालण्यात आलेल्या जर्सीशी ह्या जर्सीचे खूप साधर्म्य होते.

मैदान

संपादन
 
२००६ च्या वाढिव बांधकामा नंतरचा फोटो
ओल्ड ट्रॅफोर्ड
थिएटर ऑफ ड्रिम्स (स्वपनांचा रंगमंच)
स्थळ सर मॅट बस्बी मार्ग,
ओल्ड ट्रॅफोर्ड,
ग्रेटर मॅन्चेस्टर,
इंग्लंड
स्थापना १९०९
सुरवात १९ फेब्रुवारि १९१०
मालक मॅन्चेस्टर युनायटेड
प्रचालक मॅन्चेस्टर युनायटेड
किंमत £९०,००० (१९०९)
वास्तुशास्त्रज्ञ आर्चिबाल्ड लेट्च (१९०९)
आसन क्षमता ७५,९५७ बसलेले[]
इतर यजमान
मॅन्चेस्टर युनायटेड (१९१०–सद्य)

न्युटन हिथ सुरुवातीच्या काळात नोर्थ रोड वरिल एअका मैदानात खेळत असे परंतु फुटबॉल लीग मधे प्रवेश करळ्याची इछा असलेल्या क्लबच्या अधिकाऱ्यांना ही सोय अपुरी वाटत असे.ह्या मैदानत १८८७ मधे काही सुधारणा करण्यात आल्या. न्युटन हिथने १८९१ मध्ये किमान आर्थिक ठेवीचा वापर करून दोन ग्रॅन्ड स्टॅन्ड विकत घेतले.नॉर्थ रोड मधे झालेल्या सुरुवातीच्या सामन्यांची प्रेक्षकांची उपस्थिती गणली जात नसे पण सर्वाधिक लेखी उपस्थिती ही ४ मार्च १८९३ मधे संदरलॅन्डविरुद्ध झालेल्या पथम दर्जाच्या सामन्या दरम्यान १५,००० एव्हढी होती. साधारण एव्हढिच उपस्थिती गॉरटन व्हिला दरम्यानच्या ५ सप्टेंबर १८८९ सामन्यात देखिल होती. जुन १८९३ मध्ये, नोर्थ रोडच्या मालकांनी क्लबला नोर्थ रोडचे मैदान सोडण्यास सांगितले,मॅन्चेस्टरचे डिन आणि कॅनन यांचा मते प्रेक्षकांना मैदानात येन्यासाठी पैसे देण्यास भाग पाडणे अयोग्य होते, क्लबचे सेक्रेटरी ए.एच. अ‍ॅलबट यांनी क्लेटन येथील बँक स्ट्रिट मैदान वापरासाठि मिळवले. सुरुवातिस तेथे बसण्यातठी कोणतेही स्टॅन्ड नव्हते, पण १९९३-९४ च्या मोसमा पऱ्यंत २ स्टॅन्ड बसवण्यात आले, एक मैदानच्या एका बाजुस संपूर्ण मैदानच्या लांबी एव्हढा तर दुसरा गोलच्या मागे 'ब्रॅडफॉर्ड एन्ड' येथे ठेवण्यात आला. ब्रॅडफॉर्ड एन्डच्या समोरच्या बाजुस म्हणजेच 'क्लेटन एन्ड' येथे मैदान बांधण्यात आले. बँक स्ट्रिट येथील न्युटन हिथ ह्या नावाते क्लबची पहिली मॅच १ सप्टेंबर १८९३ रोजी झाली, ज्यावेळेस १०,००० लोकांनी अ‍ॅल्फ फारमनला ३-२ विजयात हॅट्रिक मारताना पहिले. बाकिचे स्टॅन्ड ३ आठवड्या नंतरच्या नॉटिंघम फॉरेस्टच्या सामन्यासाठि पूर्ण करण्यात आले.ऑक्टोबर १८९५ मधे, मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्या आधी क्लबने बॉटन रगबी लीग क्लब कडून २,००० आसन क्षमतेचा स्टॅन्ड विकत घेतला आणि अजून एक स्टॅन्ड 'रिजर्व साइड'(मैदानातील भाग) येथे ठेवण्यात आला. परंतु हवामाना मुळे मॅन्चेस्टर सिटी विरुद्धच्या सामन्याची हजेरी १२,००० एव्हढिच होती.

१९०२ मध्ये जेव्हा बँक स्ट्रिट येथील मैदान तातपुर्ते बंद करण्यात आले तेव्हा, क्लब कप्तान हॅरि स्टॅफोर्ड याने क्लबचा ब्रिस्टॉल सिटी विरुद्धचा पुढिल सामना आणि हारपुर्ह्ये येथील तातपुर्त्या मैदानासाठी पुरतील एव्हढे पैसे गोळा केले.क्लबमधिल आर्थिक गुंतवणुकिनंतर, नवीन अध्यक्ष जे.एच.डेव्हिस यांनी £५०० देवुन १,००० आसन क्षमतेचा नवा स्टॅन्ड उभारला. चार वर्षातच, संपूर्ण मैदानाची आसनक्षमता ५०,००० एव्हढी झाली होती आणि संपूर्ण मैदानास छत होते, त्यातिल काही लोक बघण्या साठीच्या सज्जातुन सामना बघु शकत असत.

मॅन्चेस्टर युनायटेडच्या पहिला लीग चषक आणि एक वर्षा नंतर जिंकलेला पहिला फ.ए. कप मुळे बँक स्ट्रिट येथील मैदान डेव्हिस ह्यांचा महत्त्वाकांक्षेस योग्य नव्हते. फेब्रुवारी १९०९, पहिल्या फ.ए. कपच्या ६ आठवडे आधी ओल्ड ट्रॅफोर्ड हे मॅन्चेस्टर युनायटेडचे अधिक्रुत मैदान म्हणून ठरवण्यात आले.ओल्ड ट्रॅफोर्ड येथील जागा £६०,००० विकत घेतल्यानंतर वास्तुविशारद आर्चिबाल्ड लेट्च ह्यांना £३०,००० नवीन मैदान बांधण्यासाठी एव्हढा जमाखर्च देण्यात आला. मुळ व्यवस्थेनुसार मैदानाची आसनक्षमता १००,००० एवढी ठरवण्यात आली परंतु आर्थिक अडचणींमुळे आसनक्षमता ७७,००० एवढी करण्यात आली.मेसर्स ब्रामेल्ड आणि स्मिथस ऑफ मॅन्चेस्टर यांनी हे मैदान बांधले. मैदानातील विक्रमी हजेरीची नोंद २५ मार्च १९३९ रोजी फ.ए.कपच्या उपांत्यपूर्व फेरितील वॉलवरहॅप्टन वॉन्डरर्स विरुद्ध ग्रिम्सबी टाउन ह्या सामन्यात ७६,९६२ एवढी झाली.

द्वितीय महायुद्धातील बॉम्बफेकित मैदानाचा बराचसा भाग नश्ट झाला, साउथ स्टॅन्ड मधील सेन्ट्रल टनेलसोडता उरवरित भाग नश्ट झाला होता.द्वितीय महायुद्धा पश्चात 'वॉर डॅमेज कमिशनने' क्लबला नुकसानभरपाइ म्हणून £२२,२७८ दिले. मैदानाची दुरुस्ती चालु असताना क्लबचे यजमान सामने मॅन्चेस्टर सिटीचे मैदान 'मेन रोड' येथे खेळवण्यात आले. मॅन्चेस्टर युनायटेडला प्रतिवर्ष £५,००० एव्हढा आकार भरावा लागत असे. त्यानंतरच्या सुधारणांमधे छप्पर लावण्याचे काम झाले, प्रथम 'स्ट्रिटफोर्ड एन्ड' नंतर नॉर्थ आणि साउथ एन्डला छप्पर लावण्यात आले. छप्पर स्तंभांच्या आधारे बसवण्यात आले ज्याचामुळे प्रेक्षकांना सामना बघताना त्रास होत असे. ह्या स्तंभांची जागा कंसाक्रुती(कॅन्टिलीव्हर)रचनेने घेतली. कंसाक्रुती छप्पर सर्वात शेवटी स्ट्रिटफोर्ड एन्डला बसवण्यात आले जे १९९३-९४ व्या मोसमासठी पूर्ण करण्यात आले.२५ मार्च १९५७ रोजी सर्वप्रथम क्रुत्रिम प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला.१८० फुट (५५ मी) उंचीचे ४ बांधण्यासाठी प्रत्येकी £४०,००० एव्हढा खर्च आला.प्रत्येक प्रकाशझोतात ५४ वैयक्तिक दिव्यांचा वापर करण्यात आला. १९८७ मधे हे प्रकाशझोत काढून टाकण्यात आले आणि प्रत्येक स्टॅन्डच्या छपरामधे दिव्यांच्या रोशणाइची सोय करण्यात आली जी आजही कार्यरत आहे.

टेलर रिपोर्टच्या तरतुदिंनुसार 'ऑल सिटर स्टेडियमची' गरज होती. त्यामुळे मैदानाची आसनक्षमता १९९३ मधे ४४,००० एव्हढिच राहिली.१९९५ मधे नॉर्थ स्टॅन्डची पुनर्बांधणी करून तीन स्तरिय स्टॅन्डमधे रूपांतर करण्यात आले त्यामुळे मैदानाची आसनक्षमता ५५,००० एव्हढी झाली. १९९८-९९ च्या शेवटा पर्यंत इस्ट आणि वेस्ट स्टॅन्ड मधे दुसऱ्या स्तर बांधण्यात आला ज्या मुळे मैदानाची आसनक्षमता ६७,००० पर्यंत वाढली आणि जुलै २००५ ते मार्च २००६ दर्म्यान उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पुर्व भागात ८,००० खुर्च्यांचा समावेश करण्यात आला.ह्या भागाचा प्रथम वापर २६ मार्च २००६ला करण्यात आला जेच्हा हजेरि ६९,०७० एव्हढि होती जो एक प्रिमीयर लीग विक्रम होता, विक्रमात हळूहळू वाढ होत तो सर्व कालीन श्रेश्ठ ७६,०९८ पऱ्यंत पोहोचला जेव्हा मॅन्चेस्टर युनायटेडने बॅकबर्न रोव्हर्सचा ३१ मार्च २००७ला ४-१ ह्या फरकाने पराभव केला.ह्या वेळेस (०.१५ टक्के खुर्च्या) म्हणजेच ७६,२१२ पैकी ११४ खुर्च्या रिकाम्या होत्या.२००९ च्या खुर्च्यांच्या अधिक्रुतीकरणामुळे आसनक्षमता २५५ ने कमी होऊन ७५,९५७ एव्हढी झाली.

चाहाते

संपादन

मॅन्चेस्टर युनायटेड हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. क्लबची यजमान सामन्यां मधील सरासरि उपस्तिथी युरोपखंडात सर्वाधिक आहे. किमान २४ देशातील २००हून अधिक अधिक्रुतरित्या मान्यता मिळालेल्या मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टर्स क्लबच्या शाखांमधे मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता वर्ग विखुरलेला आहे. ह्या चाहत्या वर्गाचा फायदा मॅन्चेस्टर युनायटेड प्रतिवषी होणाऱ्या अंतरराष्ट्रिय उन्हाळी दौऱ्यांतुन घेतो. फडणविशी पेढी खेळ उद्योग सल्लागार डेलोइट ह्यांचा भाकिता प्रमाणे मॅन्चेस्टर युनायटेडचे जगभरात ७५ दशलक्ष चाहते आहेत, त्याचप्रमाणे इतर भाकितांप्रमाणे हाच आकडा ३३३ दशलक्षच्या घरात जातो.चाहता वर्गाचे प्रतिनीधित्व दोन स्वतंत्र संस्थांमार्फत होते; इंडिपेन्डंट मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस असोसिएशन,एम.युफ.सी फॅन्स फोरम मार्फत क्लबशी सलोख्याचे संबंध रागुन आहेते आणि मॅन्चेस्टर युनायटेड सपोर्टस ट्रस्ट. २००५ मधे ग्लेझर कुटंबाकडे क्लब हस्तांतरित झाल्या नंतर क्लबच्या एका चाहत्या चर्गाने फ.सी.युनायटेड ओफ मॅन्चेस्टर ह्या फुटिर क्लबची स्थापना केली.ओल्ड ट्रॅफर्डचा पश्चिम स्टॅन्ड -"द स्टिटफोर्ड एन्ड"- हा क्लबच्या निस्सिम चाहत्यांचा परंपारिक भाग मानला जातो.

प्रतिस्पर्धि

संपादन

मॅंचेस्टर युनायटेडच्या सध्याच्या मुख्य प्रतिस्पर्ध्यांमधे लिव्हरपूल एफ.सी., मॅंस्टर सिटी, लीडस युनायटेड यांचा समावेश होतो. मॅंचेस्टर युनायटेड वि. लिव्हरपूल हा सामना इंग्लिश फुटबॉलमधील सर्वात अटीतटीच्या सामन्यांमध्ये गणला जातो. रायन गिग्जच्या मते हा सामना म्हणजे "इंग्लिश फुटबॉल मधील सर्वाधिक लोकप्रिय सामना" आहे, कारण दोन्ही संघांनी इंग्लिश फुटबॉल मधील वेगवेगळ्या कालखंडंवर अधिराज्य गाजवलेले आहे. औद्योगिक कालखंडादरम्या वायव्य इंग्लंडमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी मॅंचेस्टर आणि लिव्हरपूल या दोन्ही शहरांतील स्पर्धा या सामन्याद्वारे प्रकट होत असल्याे मानले जाते. या सामन्याच्यावेळी अनेकदा गुंडगिरी आणि नासधूस झाल्याचे अनेक दाखले आहेत; १९९६ च्या एफ.ए.कप अंतिम सामन्या नंतर मॅन्चेस्टर युनायटेडचा विजयी संघ चषक घेण्यासाठी वेंबली मैदानाच्या पायऱ्या चढत असताना एका अनोळखी व्यक्तीने एरिक कॅन्टोनाला थोबाडीत लगावली तर सर ॲलेक्स फर्ग्युसन यांना बुक्का मारण्याचा प्रयत्न केला. २००६ च्या एफ.ए. कप मॅच दरम्यान अ‍ॅलन स्मिथला घेउन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवर काही लिव्हरपुलच्या चाहत्यांनी हल्ला केला होता.

मॅन्चेस्टर युनायटेड आणि लीडस् युनायटेड मधील चढाओढ रोझेस रायव्हलरी म्हणून अनौपचारिकरित्या ओळखले जाते. ह्या प्रतिस्पर्धित्वाची पाळेमुळे वॉर ओफ रोझेस मध्ये आहेत. हे युद्ध लॅंकेस्टर आणि यॉर्कच्या सरदारांमध्ये लढले गेले होते. मॅन्चेस्टर युनायटेडचे चाहते स्वतःला लॅंकेशायरचे तर लीड्स युनायटेड यॉर्कशायरचे प्रतिनिधी मानतात.

जागतिक ब्रॅन्ड

संपादन

मॅंचेस्टर युनायटेडला एक जागतिक ब्रॅन्ड म्हणून ओळखले जाते; २००९ च्या एका लेखा प्रमाणे क्लबचे व्यापारचिन्ह आणि मालमत्ता ही £ ३२९ दशलक्ष एवढी आहे ज्यामुळे त्याचे ब्रॅन्ड ताकद मापन AAA (अतिशय ताकदवान) आहे. फोर्बस मासिकाने जगातिल सर्चोतम दहा खेळ संघात मॅंचेस्टर युनायटेडला न्युयॉर्क यॅंकिजच्या मगोमाग दुसरे स्थान दिले आहे,मॅंचेस्टर युनायटेडच्या ब्रॅन्डचे मुल्यमापन $२८५ दशलक्ष (क्लबच्या $१.८३५ अब्ज मुल्यमापनाच्या १६ टक्के). डेलॉइट फुटबॉल मनी लीग नुसार क्लब रेआल मद्रिद आणि बार्सेलोनाच्या मगोमाग तिसऱ्या स्थानावर आहे.

मॅंचेस्टर युनायटेडच्या जागतिक ब्रॅन्डचे श्रेय हे सर मॅट बस्बी यांनी म्युनिच एअयर डिझास्टर नंतर केलेल्या संघाची पुनर्बांधणी आणि त्यानंतर मिळालेल्या यशास देण्यात येते. या संघाचा जगभरात उदोउदो करण्यात आला. ह्या संघात बॉबी चालटन,नॉबि स्टाइल्स्(इंग्लंडच्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य) तसेच डेनिस लॉ आणि जॉर्ज बेस्ट यांचा समावेश होता. चढाइदार पद्धतीने खेळणाऱ्या या संघाने इंगलीश जनमानसाच्या मनाचा ताबा घेतला. बचाव पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या इटालीयन फुटबॉलच्या परस्पर विरोधी ह्या पद्धतीने लोकांच्या मनात चांगलेच घर केले.१९६० च्या दशकातील सरकारच्या उद्योगधंधात ढवळाढवळ न करण्याऱ्या उदार धोरणाशी ह्या संघाची सांगड घातली जाऊ लागली. जॉर्ज बेस्ट हा त्याचा केशरचनेमुळे "पाचवा बिटल" म्हणून ओळखला जाऊ लागला आणि मैदाना बाहेर प्रसार मध्यमांमधे प्रसिद्धी मिळालेला पहिला फुटबॉल खेळाडू बनला.

मॅंचेस्टर युनायटेड हा लंडन शेअर बाजारात नोंदणी केला गेलेला पहिला फुटबॉल संघ ठरला ज्यातुन क्लबने मोठ्या प्रमाणात भांडवल गोळा केले आणि त्यातुन क्लबने आपले व्यावहारिक डावपेचांचा अजून विस्तार केला. तीव्र नुकसानाशी सलग्न असलेल्या ह्या फुटबॉल जगतात आपल्या व्यवहारिक आणि खेळजगतातील यशाने क्लबने मोठ्या प्रमाणात फायदा कमावला.मॅंचेस्टर युनायटेड ह्या जागतिक ब्रॅन्डची ताकद ही त्याच्या खेळाडूंना मिळणाऱ्या मैदाना बाहेरील प्रसार मध्यमांच्या प्रसिद्धीमुळे अधिकच वाढत गेली, ह्यामधे सर्वाधिक डेव्हिड बेकहॅमचा समावेश होतो, ज्याने स्वतःचा असा जागतिक ठसा उमटवला. ह्या मैदाना बाहेरील मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे मैदानातील घडामोडिंवर अधिकाधिक लक्ष दिले जाऊ लागले आणि त्यातुन प्रयोजक सुसंधी मिळत गेल्या ज्याच्या किंमतवर दुरदर्शन माध्यमांचा सर्वाधिक परिणाम होतो.

लीग मधील उच्च स्थानामुळे दुरदर्शन हक्कांमधे मोठा वाटा मिळतो म्हणुनच सततच्या यशाने क्लबला अधिकाधिक फायदा होत गेला. प्रिमीयर लीगची सुरुवात झाल्यापासून मॅंचेस्टर युनायटेडला 'बि.स्काय.बि' प्रसारण हक्कातुन मिळालेल्या महसुलाचा सर्वाधिक वाटा मिळालेला आहे.कुठल्याहि इंग्लिश क्लब पेक्षा मॅंचेस्टर युनायटेडने सतत व्यापारविषयक मिळालेल्या उत्पनात अग्रेसर रहिला आहे;२००५-०६ च्या मोसमात क्लबचे व्यावहारिक उत्पन्न £५१ दशलक्ष होते. ह्याची तुलना चेल्सीच्या £४२.५ दशलक्ष, लीव्हरपुलच्या £३९.३ दशलक्ष,आर्सेनलच्या £३४ दशलक्ष आणि न्युकॅसल युनायटेडच्या £२७.९ शी तुलना करता कित्येक पटिने अधिक होते.नाइके ही खेळसाहित्याशी निगडीत कंपनी एक महत्त्वाची प्रायोजक आहे.२००२ मधे केलेल्या १३ वर्षाच्या £३०३ दशलक्ष कराराने ह्या कंपनीने क्लबशी दृढसंबंध प्रस्थापीत केले आहेत.मॅंचेस्टर युनायटेड आर्थिक आणि क्लब सभासदत्व,वन युनायटेड,द्वारे क्लबशी आस्था असलेले लोक क्लबसंबंधीचे सामान आणि योजनांचा लाभ उठवु शकतात.त्याहुनही मॅंचेस्टर युनायटेड निगडीत प्रसार माद्ध्यमांच्या सोयी-ज्याप्रमाणे क्लबसाठि अर्पण केलेला टि.व्ही चॅनल'एम.यु.टि.व्ही'-हे क्लबचा चाहता वर्ग ओल्ड ट्रॅफोर्डच्या बाहेर पसरवण्यास मदत करत आहेत.

प्रायोजक

संपादन
अवधि गणवेश उत्पादक शर्ट प्रयोजक
१९४५–१९७५ उम्ब्रो -
१९७५–१९८० अ‍ॅडमिरल स्पोर्ट्स् वेर
१९८०–१९८२ अ‍ॅडिडास
१९८२–१९९२ शार्प इलेक्ट्रॉनिक्स
१९९२–२००० उम्ब्रो
२०००–२००२ वोडाफोन
२००२–२००६ नायकी
२००६–२०१० ए.आय.जी
२०१०–२०१४ एऑन
२०१४-२०१५ शेवरले
२०१५- अ‍ॅडिडास

१९८२-८३ व्या मोसमाच्या सुरुवातीस प्राथमिक £५००,००० च्या करारानुसार शार्प इलेक्टॉनिक्स हे क्लबचे पहिले शर्ट प्रायोजक झाले. हे संबंध १९९९-२००० च्या मोसमा पर्यंत टिकले जेव्हा वोडाफोनने चार वर्षाचा £३० दशलक्ष मंजुर केला.वोडाफोनने हाच करार चार वर्षां वाढवण्यासाठी £३६ दशलक्ष मोजले परंतु २ वर्षातच चॅम्पियन्स लीग मधील करारावर लक्ष केद्रित करण्यासाठी करार मोडित काढला.

२००६-०७ च्या मोसमाच्या सुरुवातीस, अमेरिकन इंशुरंन्स ग्रुप म्हणजेच 'ए.आय.जि' ने पाच वर्षाचा £५६.५ दशलक्ष करार मंजुर केला आणि हा करार जगातील सर्वात मौल्यवान करार ठरला.२०१०-११ च्या मोसमाच्या सुरुवातीस अमेरिकन पुनर्विमा कंपनी 'एओन' हे क्लबचे मुख्य प्रायोजक ठरले आणि चार वर्षाचा £८० दशलक्ष करार हा फुटबॉल जगतातील सर्वाधिक किफायतशीर करार ठरला.

क्लबचे गणवेश बनवणारी उम्ब्रो ही पहिली कंपनी ठरली. १९७५ मध्ये क्लबने पाच वर्षां करिता अ‍ॅडमिरल स्पोर्ट्सवेरशी करार केला.१९८०ला आदिदासला करार देण्यात आला.१९९२ला उम्ब्रोने आपना क्लब बरोबर दुसरा अध्याय सुरू केला.उम्ब्रोचा हा करार १० वर्षा टिकला. त्यानंतर नायकीने २०१५ पऱ्यंतचा £३०२.९ दशलक्ष विक्रमी करार केला; पहिल्या २२ महिन्यातच क्लबच्या ३.८ दशलक्ष जर्सी विकल्या गेल्या. नायकी आणि एओन बरोबरच, क्लबचे कमी दर्जाचे "प्लॅटिनम" प्रायिजक आहेत ज्यात ऑडि आणि बडवाइझर यांचा समावेश होतो.

क्लबने ३० जुलै २०१२ रोजी, अमेरिकन वाहन उत्पादक 'जनरल मोटर्स' बरोबर सात वर्षाचा शर्ट प्रायोजकतेचा करार केला. ह्या करारा नुसार २०१४-१५ च्या मोसमापासून युनायटेच्या शर्टावर जनरल मोटर्सचा ब्रॅन्ड, 'शेवरले'चे नाव छापन्यात येइल आणि हा जगातील सर्वाधिक मुल्याचा प्रायोजन करार बनेल. ह्या करारा नुसार, जनरल मोटर्स युनायटेला प्रती मोसम $८० मिलियन ह्याप्रमाणे सात वर्षात $५५९ मिलियन देण्याचे कबुल झाले आहे. वाढत्या किंमत्तीमुळे नायकीने २०१४-१५ च्य मोसम नंतर करार न करण्याचे टरवले. २०१५-१६ च्या मोसमापासुनचा करार आडिडासने पटकावला. युनायतेडची जागतिक प्रसिद्धी लकशात घेता, १० वर्षांसाठि अ‍ॅडिडासने  £७५० मिलियन देण्याचे कबुल केले. अर्थातच, हादेखील जगतातील सर्वाधिक मुल्याच करार ठरला.

मालकी हक्क आणि वित्त व्यवस्था

संपादन

सुरुवातीच्या काळात क्लबला लॅकॅशीयर आणि यॅर्कशीयर रेल्वे कंपनी कडून अर्थसहाय्य केले जात असे परंतु १८९२ रोजी क्लब 'मर्यादित' कंपनी झाला आणि आपला समभाग £१ प्रति शेयर या दराने प्रदेशिक चाहत्यांना विकु लागला. क्लबचे भावी अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यां समवेत चार प्रादेशिक व्यापाऱ्यांनी क्लबमधे £५०० गुंतवले आणि क्लबला कर्जबाजारि होण्यापासून वाचवले.१९२७ मध्ये अध्यक्ष जे.एच.डेव्हिस ह्यांच्या मृत्युनंतर क्लबला पुन्हा दिवाळखोरिला सामोरे जावे लागले पण ह्यावेळी £२००० गुंतवुन जेम्स.डब्लु.गिब्सन ह्यांनी क्लबचा कार्यभार सांभाळला.१९४८ रोजी गिब्सन ह्यांनी आपला मुलगा अ‍ॅलन ह्याला क्लबच्या विश्वस्थांनमधे बढती दिली आणि पुढे ३ वर्षांनी त्यांचा मृत्यु झाला.क्लबची मालकी गिब्सन कुटुंबाकडेच राहिली पण क्लबचे अध्यक्ष माजी खेळाडू हॅरॉल्ड हार्डमन झाले.

म्युनीच एर डिझास्टर नंतर काही दिवसातच सर मॅट बस्बी ह्यांचे जवळचे मित्र लुइस एडवर्डस् ह्यांना क्लबच्या विश्वस्थांमधे स्थान मिळाले आणि त्यांनी क्लबचे समभाग विकत घेण्यास सुरूबात केली; £४०,००० च्या मोबदल्यात त्यांनी क्लबचे अंदाजे ५४% समभाग विकत घेतले जानेवारि १९६४ मध्ये क्लबवर ताबा मिळवला.जानेवारि १९७१ मध्ये लिलीयन गिब्सन ह्यांच्या मृत्यु नंतर त्यांचे समभाग अ‍ॅलन गिब्सन ह्यांचाकडे गेले आणि त्यांनी १९७८ मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांचे पुत्र मार्टिन ह्यांना ते विकले;१९८० मध्ये लुइस एडवर्डस् ह्यांच्या मृत्युनंतर मार्टिन एडवर्डस् हे क्लबचे नवे अध्यक्ष झाले.१९८४ मध्य मीडिया टायकुन रॉबर्ट मॅक्सवेल ह्यांनी क्लब विकत घेण्याचा प्रयत्नकेला पण एडवर्डस् ह्यांना हवी असलेली किंमत न मिळाल्याने त्यानी क्लब विकला नाहि. १९८९ मध्ये एडवर्डस ह्यांनी मायकल नायटन ह्यांना क्लब £२० दशलक्षला विकण्याचा प्रयत्न केला पण विक्री पूर्ण होऊ शकली नाही. त्या ऐवजी त्यांचा क्लबच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला.

जुन १९९१ मध्ये मॅंचेस्टर युनायटेडचा शेयर बाजारात समावेश करण्यात आला ज्यामुळे £६.७ दशलक्ष उभरले गेले आणि १९९८ मध्ये अजून एका विक्रि बोलीस सामोरे जावे लागले ह्यावेळेस रुपर्ट मरडॉच ह्यांच्या ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन कडून. ह्यामुळे चाहत्यांनी शेयरहोल्डर्स युनायटेड अगेन्स्ट मरडॉच ह्या संस्थेची स्थापना झाली- आता हिच संस्था मॅंचेस्टर युनायटेड सपोर्टर्स ट्रस्ट म्हणून ओळखली जाते- ह्या संस्थेने क्लबच्या चाहत्यांना क्लबचे समभाग विकत घेऊन क्लबला अयोग्य स्वीकार बोलीपासून वाचवण्यास उत्तेजीत केले.मॅंचेस्टर युनायटेडच्या संचालक मंडळाने £६२३ दशलक्ष बोली स्विकारली पण एप्रिल १९९९ मध्ये बोलीतील शेवटचा अडथळा म्हणजेच 'मोनॉपोलीज अँड मर्जर्स कमिशन' ह्यानी ह्या विक्रीस स्थगिली दिली. काही वर्षातच क्लबचे व्यवस्थापक सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन आणि त्यांचे घोड्यांच्या शरियतीतील मित्र जॉन मॅग्नियर व जे.पि.मॅक्मनुस(ज्यांचा कडे क्लबचे सर्वाधिक समभाग होते) ह्यांचात मतभेद झाले. हे मतभेद हे रॉक ओफ जिब्रालटर ह्या घोद्याच्या मालकीवरून झाले होते.जॉन मॅग्नियर आणि जे.पि.मॅक्मनुस ह्यांनी सर अ‍ॅलेक्ल्स फर्ग्युसन ह्यांना क्लबच्या व्यवस्थापक पदावरून हाकालण्याचा प्रयत्न केला. ह्याला प्रत्युतर म्हणून क्लब व्यवस्थापनाने गुंतवणुकदारांना ह्या दोघांचे समभाग विकत घेण्यास सांगितले आणि ह्या आयरिश माणसांचे बहुमत मोडित काढ्ण्याचा प्रयत्न केला.

२००५ मध्ये मालकम ग्लेझर ह्यांनी मॅग्नियर आणि मॅक्मनुस ह्यांचे २८.७% समभाग विकत घेतले आणि रेड फुटबॉल ह्या संस्थे मार्फत एका उच्च पतीच्या स्वीकार बोली मार्फत क्लब विकत घेतला. ह्यावेळेस क्लबची किंमत £८०० दशलक्ष म्हणजेच $१.५ अब्ज इतकी होती. जुलै २००६ मध्ये क्लबने £६६० दशलक्ष कर्ज परतफेड केल्याचे जाहीर केले, ज्यामुळे क्लबच्या वार्षिक व्याजात ३०% घट होऊन £६२ दशलक्ष झाला. जानेवारी २०१० मध्ये क्लबचे कर्ज £७१६.५ दशलक्ष होते म्हणुनच क्लबने £५०४ दशलक्ष ($१.१७ अब्ज) बॉन्ड इशु विकुन क्लबला तारण्याच प्रयत्न केला. ह्यामुळे त्यांना जागतिक बँकां कडून घेललेल्या बहुत्तंश (£५०९ दशलक्ष) कर्जाची परतफेड करता आली. ह्या बॉन्ड वरिल वार्षिक व्याज दर- जे १ फेब्रुवारि २०१७ला पूर्ण होत आहेत - £४५ दशलक्ष आहे. क्लब वरिल कर्जा मुळे क्लबच्या चाहत्यांनी २५ जानेवारी २०१०ला ओल्ड ट्रॅफोर्ड आणि क्लबच्या सराव मैदाना सम्प्र निदर्शने केली. चाहत्यांच्या एका वर्गाने सामना बघण्यास जाणाऱ्या चाहत्यांना हिरव्या आणि सोनेरि रंगांचे कपडे घालण्यास प्रव्रुत्त केले. हे रंग न्युटन हिथचे आहेते.३० जानेवारीला आलेल्या एका अहवाला नुसार मॅंचेस्टर युनायटेडस् सपोर्टर्स ट्रस्टने क्लबच्या श्रीमंत्त चाहत्यांशी बैठक बोलवुन, ग्लेझर्स कडून क्लब विकत घेण्या संबंधी बोलणी झाली.

खेळाडू

संपादन

प्रथम संघ

संपादन

इ.स २० जानेवारी २०१७ अधिकृत संकेतस्थळ.

क्र. जागा नाव
  गो.र. दाविद दा खेया
  डिफें विक्टर लिनडेलॉफ
  डिफें एरिक बाय्यी
  डिफें फिल जोन्स
  डिफें मार्कोस रोहो
  मि.फी. पॉल लाबिल प्पोग्बा
  फॉर. अलेक्सिस सांचेझ
  मि.फी. हुवान माट्टा
  फॉर. रोमेलु लुकाकु
१०   फॉर. झ्लातान इब्राहिमोविच
११   फॉर. ॲंथनी मार्शियाल
१२   डिफें क्रिस स्मॉलिंग
१४   मि.फी. जेस्से लिंगार्ड
१६   मि.फी. मायकल कॅरिक
क्र. जागा नाव
१७   मि.फी. डेली ब्लिंन्ड
१८   मि.फी. ॲश्ली यंग
१९   फॉर. मारकरस रॅशफर्ड
२०   गो.र. सर्जीओ रोमेरो
२१   मि.फी. अँडर हरेरा
२३   डिफें लुक शॉ
२५   मि.फी. ॲंटोनियो व्हॅलेन्सिया
२७   मि.फी. मॅरोआन फेलेनी
३१   मि.फी. नेमान्या मॅटिच
३६   डिफें माट्टेओ डार्मियान
३८   डिफें ॲक्सेल टाउन्झेबे
३९   डिफें स्कॉट मॅकटॉमिने
४०   गो.र. जोएल कॅस्त्रो परेरा
४३   डिफें कॅमेरुन ब्रोथविक-जॅक्सन

दुसऱ्या क्लबकडे बदली म्हणून गेलेले खेळाडू

संपादन
क्र. जागा नाव
१५   मि.फी. आन्द्रेयास परेरा (वालेन्सिया कडे ३० जून २०१८ पर्यंत)
२४   डिफें टिमथी फॉसु मेन्साह् (क्रिस्टल् पॅलेस कडे ३० जून २०१८ पर्यंत)
२९   फॉर. जेम्स विलसन (शेफ्लिल्ड् युनायटेड कडे ३० जून २०१८ पर्यंत)
३२   गो.र. सॅम जॉन्स्टन (ॲस्टन विला कडे ३० जून २०१८ पर्यंत)

व्यवस्थापन

संपादन
  • मालक-ग्लेझर कुटुंब रेड फुटबॉल शेयर होल्डर या संस्थेमार्फत.
  • माननीय अध्यक्ष- मार्टिन एडवर्डस्.
मॉन्चेस्टर युनायटेड लिमीटेड
  • उपाध्यक्ष-जॉएल ग्लेझर आणि आवारम ग्लेझर.
  • मुख्य कार्यकारि अधिकारी-डेवीड गील.
  • मुख्य कामकाज अधिकारी-मायकेल बोलिंगब्रोके.
  • व्यापारविषयक संचालक-रिचर्ड आरनॉल्ड.
  • कर्मचारी वर्ग अध्यक्ष- एड वुडवर्ड.
  • मुख्य कार्यकारि संचालकां शिवाय- ब्रायन ग्लेझर,केवीन ग्लेझर,एडवर्ड ग्लेझर आणि डार्सी ग्लेझर.
मॉन्चेस्टर युनायटेड फुटबॉल संघ
  • संचालक-डेविड गील, मायकल डॉसन,सर बॉबी चालटन, सर ॲलेक्स फर्ग्युसन.
  • क्लब सचिव- जॉन ऑलेक्झॉडर.
  • जागतिक राजदूत- ब्रायन रॉबसन.
मार्गदर्शक आणि वैद्यकीय वर्ग.
  • मार्गदर्शक- लुइ वॅन हाल .
  • सहाय्यक मार्गदर्शक - रायन गिग्स.
  • मुख्य संघ मार्गदर्शक- रिक्त.
  • गोलरक्षण मार्गदर्शक- फ्रॅक होएक.
  • फिटनेस मार्गदर्शक- टोनी स्ट्रडवीक.

व्यवस्थापक इतिहास

संपादन
मुख्य पान: List of Manchester United F.C. managers
तारखा[] नावे टिप
१८७८–१८९२ माहित नाही
१८९२–१९००   ए. एच. अलबट
१९००–१९०३   जेम्स वेस्ट
१९०३–१९१२   अरनेस्ट मॅग्नेल
१९१२–१९१४   जॉन बेन्टली
१९१४–१९२२   जॅक रोबसन
१९२२–१९२६   जॉन चॅपमॅन इंग्लंड बाहेरिल पहिले व्यवथापक.
१९२६–१९२७   लॅल हिल्डिच
१९२७–१९३१   हर्बट बॉमलेट
१९३१–१९३२   वॉलटर क्रिकमर
१९३२–१९३७   स्कॉट डंकन
१९३७–१९४५   वॉलटर क्रिकमर
१९४५–१९६९   सर मॅट बस्बी
१९६९–१९७०   विल्फ मॅक् गिनिज
१९७०–१९७१   सर मॅट बस्बी
१९७१–१९७२   फॅंक ओफॅरेल युनायटेड किंडम बाहेरिल पहिले व्यवथापक
१९७२–१९७७   टोमी डॉकर्थि
१९७७–१९८१   डेव सेक्स्टन
१९८१–१९८६   रॉन अ‍ॅटकिंसन
१९८६–2013   अ‍ॅलेक्स फर्ग्युसन सर्वाधिक काळ असलेले आणि सर्वाधिक विजेतेपद मिळवलेले मॅन्चेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक[]
२०१३-२०१४   डेविड मोयेस
२०१४   रायन ग्गिग्स
२०१४-२०१६   लुइ वॅन हाल
२०१६-   जोसे मॉरिन्यो

विजेतेपदे

संपादन

मॅन्चेस्टर कप हे मॅन्चेस्टर युनायटेडचे पहिले जेतेपद होय. १८८६ साली क्लबने न्युटन हीथ या नावा खाली हे जेतेपद जिंकले. क्लबने पहिले लीग जेतेपद १९०८ साली जिंकले तर त्याच्या पुढिलच वर्षी फ.ए कपच्या पहिल्या जेतेपदाचा मान पटकावला. १९९० च्या दशकात क्लबने सर्वाधिक जेतेपदे पटकावली ; ५ प्रिमीयर लीग, ४ फ.ए कप, १ लीग कप, ५ चॅरिटी शील्ड (एकात संयुक्त जेतेपद), १ युएफा चॅंपियन्स लीग, १ युएफा कप विनर्स कप, १ इंटरकॉंटिनेंटल कप.

सर्वाधिक प्रथम दर्जाची जेतेपदे (२०), सर्वाधिक फ.ए कप (१२), सर्वाधिक फ.ए कप अंतिम फेरिलील सहभाग (१८) अशा एका हुन एक मानांची नोंद क्लबच्या नावावर आहे. सर्वाधिक २४ पैकि १३ प्रिमीयर लीग जेतेपदे पटकावण्याचा मान देखिल मॅन्चेस्टर युनायटेडचाच आहे. १९६८ रोजी युरोपियन कप जिंकुन युरोपियन स्तरा वरिल जेतेपद पटकावणारा पहिला ईंग्लश क्लब देखिल मॅन्चेस्टर युनायटेडच होता. २०११ चे कम्युनिटी शील्डचे जेतेपद क्लबचे सर्वाधिक अलिकडचे जेतेपद.

युएफा युरोपा लीग हे एअकमेव जेतेपद क्लबने आतापऱ्यंतच्या इतिहासात कधीच पटकावले नाहि परंतु १९८४-८५ साली झलेल्या स्पर्धेते आणि १९६४-६५ साली ह्या स्पर्धेची पूर्वप्रवर्तक स्पर्धा "इंटर सिटीज् फेयर्स" कप ह्या स्पर्धेते उपांत्यपूर्व फेरि पर्यंत क्लबने मजल मारली आहे.

स्थानिक

संपादन

लीग

  • प्रथम दर्जाची लीग(१९९२ पर्यंत) इंग्लिश प्रिमियर लीग : २० (विक्रमी)
  • १९०७-०८, १९१०-११, १९५१-५२, १९५५-५६, १९५६-५७, १९६४-६५, १९६६-६७, १९९२-९३, १९९३-९४, १९९५-९६ , १९९६-९७ ,१९९८-९९, १९९९-२००० , २०००-०१ ,२००२-०३ , २००६-०७ , २००७-०८, २००८-०९, २०१०-११, २०१२-१३
  • दुसरा दर्जाची लीग: २
  • १९३५-३६, १९७४-७५

कप

  • एफ.ए.कप: १२

१९०८-०९, १९४७-४८, १९६२-६३, १९७६-७८, १९८२-८३, १९८४-८५, १९८९-९०, १९९३-९४, १९९५-९६, १९९८-९९, २००३-०४, २०१५-१६

  • लीग कप: ४
  • १९९१-९२, २००५-०६, २००८-०९, २००९-१०
  • कम्युनीटी शील्ड: १८ (१४ प्रथम, ४विभागुन)
  • १९०८, १९११, १९५२, १९५६, १९५७, १९६५*, १९६७*, १९७७*, १९८३*, १९९०,१९९३, १९९४, १९९६, १९९७, २००३, २००७, २००८, २०१०, २०११ (* विभागुन)(विक्रमी)

युरोपीयन स्तरावर

संपादन
  • युरोपीयन कप/ यु.ए.फा. चॅंपीयन्स लीग: ३
  • १९६७-६८, १९९८-९९, २००७-०८
  • यु.ए.फा कप विनर्स कप: १
  • १९९०-९१
  • यु.ए.फा युरोपा कप: १
  • २०१६-१७
  • युरोपीयन सुपर कप: १
  • १९९०-९१
  • यु.ए.फा सुपर कप: १
  • १९९१

जागतिक स्तर

संपादन
  • आंतर खंडीय कप
  • १९९९
  • फिफा क्लब वर्ड कप
  • २००८

एकाच वर्षात दोन किंवा तीन कप

संपादन
  • डबल्स
  • लीग आणि फए कप: २
  • १९९३-९४, १९९५-९६
  • लीग आणि लीग कप: १
  • २००८-०९
  • द ट्रेबल ( लीग, फए कप आणि युरोपीयन कप)
  • १९९८-९९

संदर्भ

संपादन
  1. ^ Manchester 330 million fans Archived 2009-02-13 at the Wayback Machine.*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च १७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. ^ Barnes et al. (2001), p. 110
  3. ^ "Greatest sporting moments of 20th century (British)". 2008-05-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-05-25 रोजी पाहिले.
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; inside_united नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ Barnes et al. (2001), pp. 54–57
  6. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ferguson नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे

संपादन

अधिकृत

संपादन

त्रयस्थ माध्यमे व संकेतस्थळे

संपादन

साचा:BBC Football Info

चाहत्यांची प्रमुख संकेतस्थळे

संपादन

साचा:प्रिमियर लीग फुटबॉल इंग्लंड हंगाम साचा:युएफा चॅंपियन्स लीग २००७-०८


जी-१४ सदस्य

एजॅक्सआर्सेनलबार्सेलोनाबायर लिवरकुसेनबायर्न म्युनिकबोरूस्सीया डोर्टमुंडपी.एस.व्ही. एंडोवनइंटर मिलानयुव्हेन्टसलिव्हरपूलमँचेस्टर युनायटेडए.सी. मिलानलिऑनमार्सेलीपॅरीस सेंट-जर्मनएफ.सी. पोर्टोरेआल माद्रिदव्हॅलेन्सिया