इंतरनाझियोनाले मिलानो किंवा इंटर मिलान (इटालियन: Calcio Catania) हा इटली देशामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०८ साली लोंबार्दिया प्रदेशामधील मिलान शहरात स्थापन झालेला हा क्लब इटलीमधील सेरी आ ह्या सर्वोच्च फुटबॉल श्रेणीच्या लीगमधून खेळतो. स्थापनेपासूनचे सारे हंगाम सेरी आ मध्येच खेळणारा इंटर हा इटलीमधील व जगातील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. इंटरने आजवर १८ वेळा सेरी आ चे, ३वेळा युएफा चॅंपियन्स लीगचे व ३ वेळा युएफा युरोपा लीगचे अजिंक्यपद मिळवले आहे. सध्या चाहत्यांच्या संख्येनुसार इंटरचा इटलीमध्ये दुसरा तर युरोपात आठवा क्रमांक आहे.

इंटर मिलान
पूर्ण नाव Football Club Internazionale Milano S.p.A.
टोपणनाव नेरज्ज़ुर्री (the Black-Blues)
ला बेनेअमाता (the Cherished)
Il बिस्सिओने (the Big Grass Snake)
स्थापना मार्च ९, १९०८
मैदान ज्युझेप्पे मेआत्सा स्टेडियम,
मिलान, इटली
(आसनक्षमता: ८५,७००)
लीग सेरी आ
२०११-१२ ६ वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे संपादन