सेरी आ (इटालियन: Serie A) ही इटली देशामधील सर्वोत्तम श्रेणीची फुटबॉल लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची सेरी बे ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.

सेरी आ
देश इटली ध्वज इटली
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९२९
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी सेरी बे
राष्ट्रीय चषक कोप्पा इटालिया
सुपरकोप्पा इटालियाना
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते युव्हेन्तुस
(२०१३-१४)
सर्वाधिक अजिंक्यपदे युव्हेन्तुस (३० विजेतेपदे)
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

इ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून युव्हेन्तुस ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. युएफाच्या क्रमवारीपद्धतीनुसार युरोपामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आचा चौथा क्रमांक लागतो (प्रीमियर लीग, ला लीगाफुसबॉल-बुंडेसलीगा खालोखाल). युव्हेन्तुस, इंटर मिलानए.सी. मिलान हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.

सद्य क्लब

संपादन

सेरी आच्या २०१३-१४ हंगामामध्ये खालील २० संघांनी भाग घेतला.

क्लब
२०११-१२ मधील
अंतिम क्रम
अतालांता बी.सी. १२वा
बोलोन्या एफ.सी. १९०९ ९वा
काग्लियारी काल्सियो १५वा
काल्सियो कातानिया ११वा
ए.सी. क्येव्होव्हेरोना १०वा
ए.सी.एफ. फियोरेंतिना १३वा
जेनोवा सी.एफ.सी. १७वा
इंटर मिलान ६वा
युव्हेन्तुस एफ.सी. विजेते
एस.एस. लाझियो ४था
ए.सी. मिलान उप-विजेते
एस.एस.सी. नापोली ३रा
यू.एस. पालेर्मो १६वा
पार्मा एफ.सी. ८वा
पेस्कारा सेरी बे विजेते
ए.एस. रोमा ५वा
यू.सी. संपदोरिया सेरी बे ६वा
ए.सी. सियेना १४वा
तोरिनो एफ.सी. सेरी बे उपविजेते
उदिनेस काल्सियो ३रा


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: