प्रिमेरा दिव्हिजियोन (स्पॅनिश: Primera División) म्हणजेच ला लीगा ही स्पेनमधील व्यावसायिक फुटबॉल साखळी स्पर्धा आहे. स्पेनमधील सर्वोच्च पातळीवरील ही लीग जगातील सर्वोत्तम फुटबॉल स्पर्धांपैकी एक समजली जाते. दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या ह्या स्पर्धेमध्ये स्पेनमधील २० सर्वोत्तम क्लब भाग घेतात. हंगाम संपल्यानंतर क्रमवारीमधील सर्वात खालच्या ३ क्लबांची हकालपट्टी सेगुंदा दिव्हिजियोन ह्या दुय्यम पातळीवरील लीगमध्ये होते तर सेगुंदा दिव्हिजियोनमधील सर्वोत्तम ३ संघांनाला लीगामध्ये बढती मिळते.

ला लीगा
देश स्पेन ध्वज स्पेन
मंडळ युएफा
स्थापना इ.स. १९२९
संघांची संख्या २०
देशामधील पातळी सर्वोच्च
खालील पातळी सेगुंदा दिव्हिजियोन
राष्ट्रीय चषक कोपा देल रे
सुपरकोपा दे एस्पान्या
आंतरराष्ट्रीय चषक युएफा चँपियन्स लीग
युएफा युरोपा लीग
सद्य विजेते एफ.सी. बार्सेलोना (२७वे विजेतेपद)
(२०१२-१३)
सर्वाधिक अजिंक्यपदे रेआल माद्रिद (३५ विजेतेपदे)
संकेतस्थळ lfp.es
२०१३-१४

१९२९ सालापासून खेळवल्या जात असलेल्याला लीगामध्ये आजवर ५९ स्पॅनिश क्लबांनी भाग घेतला असून रेआल माद्रिदने आजवर ३६ तर एफ.सी. बार्सेलोनाने २६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

सद्य संघ संपादन

संघ शहर स्टेडियम क्षमता
अ‍ॅथलेटिक बिल्बाओ बिल्बाओ San Mamés 53,332
ॲटलेटिको माद्रिद माद्रिद Vicente Calderón स्टेडियम 54,960
एफ.सी. बार्सेलोना बार्सिलोना कँप नोउ 99,786
रेआल बेटीस सेव्हिया Estadio Benito Villamarín 52,745
सेल्ता दे व्हिगो व्हिगो Balaídos 31,800
यू.डी. आल्मेरिया आल्मेरिया Estadio de los Juegos Mediterráneos 22,000
आर.सी.डी. एस्पान्यॉल बार्सिलोना Estadi Cornellà-El Prat 40,500
गेटाफे सी.एफ. गेताफे Coliseum Alfonso Pérez 17,700
ग्रानादा सी.एफ. ग्रानादा Estadio Nuevo Los Cármenes 22,524
लेव्हांते यू.डी. वालेन्सिया Estadi Ciutat de València 25,534
मालागा सी.एफ. मालागा Estadio La Rosaleda 30,044
एल्के सी.एफ. एल्के Estadio Manuel Martínez Valero 38,750
सी.ए. ओसासूना पाम्पलोना El Sadar स्टेडियम 19,553
रायो व्हायेकानो माद्रिद Campo de Fútbol de Vallecas 15,489
रेआल माद्रिद माद्रिद सान्तियागो बेर्नाबेऊ स्टेडियम 85,454
रेआल सोसियेदाद सान सेबास्तियन Anoeta स्टेडियम 32,076
सेव्हिया एफ.सी. सेव्हिया Estadio Ramón Sánchez Pizjuán 45,500
वालेन्सिया सी.एफ. वालेन्सिया Mestalla स्टेडियम 55,000
रेआल बायादोलिद वायादोलिद Estadio Nuevo José Zorrilla 26,512
व्हियारेआल सी.एफ. व्हियारेआल El Madrigal 24,890

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत