दत्तात्रेय

(दत्तात्रय या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. [] त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकूरानुसार भिन्न आहेत. [] [] [] हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. [] हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे. [] []

दत्तात्रेय

मराठी दत्तात्रेय
संस्कृत दत्तात्रेयः
निवासस्थान श्री क्षेत्र गाणगापूर, माहूर, पांचाळेश्वर
शस्त्र त्रिशूळ, चक्र
वडील अत्री ऋषि
आई अनसूया
पत्नी अनघालक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरे दत्त, अवधूत, गुरुदेव, श्रीपाद, दिगंबर योगीराज परब्रम्ह
या देवतेचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ
या अवताराची मुख्य देवता ब्रह्मा, विष्णू, महेश (शिव)
मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरूदेव दत्त
नामोल्लेख गुरुचरित्र ,नवनाथ भक्तिसार
तीर्थक्षेत्रे औदुंबर, नरसोबाची वाडी, पिठापूर, गाणगापूर, माहूर, गिरनार पर्वत

कालांतराने, दत्तात्रेयांनी शैव, वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली - विशेषतः भारतातील दख्खन प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागांत, जेथे शैव धर्म प्रचलित आहे. [] भक्ती चळवळीतील संत-कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन, सर्वांशी दयाळूपणा, त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि जीवनाचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे.

रिगोपौलोसच्या मते, शैव धर्माच्या नाथ परंपरेत, दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदि-गुरू (प्रथम शिक्षक) म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले "योगाचे स्वामी" आहेत. परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवाचे प्रतिक मानतात. [] [१०] मॅलिन्सनच्या मते, दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे पारंपारिक गुरू नाहीत परंतु नाथ परंपरेने १८ व्या शतकात विष्णु-शिव समक्रमणाचा एक भाग म्हणून गुरू म्हणून त्यांची निवड केली होती. मॅलिन्सन नुसार, याचा पुरावा मराठी ग्रंथ नवनाथभक्तिसार मध्ये सापडतो, ज्यामध्ये नऊ नारायणांसह नऊ नाथांची ओळख करून महानुभाव पंथात नाथ संप्रदायाचे समक्रमण झाले आहे. [११]

मार्गशीर्ष (नोव्हेंबर/डिसेंबर) या हिंदू महिन्यातील वार्षिक उत्सव दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि हा दत्त जयंती म्हणून ओळखला जातो. [१२]

स्वरूप

संपादन

दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते.

जन्म कथा/आख्यायिका

संपादन

एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात.यांनी ऋषी च्या अवतार घेऊन माता अनसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले ,परंतु त्या ऋषी चे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनसूया मातेने स्वतः च्या योगशक्तिद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पीकविले, व योग्य आदरातिथ्य केले, त्या तिन्ही ऋषी रुपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा मातेने तिचे उदरी तीनही देवतांची पुत्र म्हणुन जन्म घेण्याची मागणी केली .[१३]

इतिहास

संपादन

दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे.

दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.[१४]

संप्रदाय

संपादन

एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात.

नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे.

समावेशकता

संपादन

गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

आखाडे

संपादन

दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे.


महाराष्ट्रातील दत्त मंदिर व तीर्थ क्षेत्रे

संपादन
  • श्री दत्त मंदिर प्रभादेवी मुंबई(गोपचार व भोये संस्थानचे)
  • श्री दत्त शिखर माहूर ( महाराष्ट्र )
  • श्री क्षेत्र प्रयाग दत्त मंदिर कोल्हापूर
  • श्री क्षेत्र अक्कलकोट
  • श्री क्षेत्र अंतापूर
  • श्री क्षेत्र अनसूयातीर्थ
  • श्री दत्त मंदिर संस्थान, रावेर, जळगांव
  • श्री क्षेत्र नगांव बु ( धुळे , महाराष्ट्र )
  • श्री क्षेत्र अंबेजोगाई
  • श्री क्षेत्र अमरकंटक
  • श्री क्षेत्र अमरापूर
  • श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र आष्टे दत्तमंदिर
  • श्री एकमुखी दत्तमूर्ती (कोल्हापूर, फलटण)
  • श्री क्षेत्र औदुंबर
  • श्री क्षेत्र अकलापूर
  • श्री क्षेत्र कडगंची
  • श्री क्षेत्र करंजी
  • श्री क्षेत्र कर्दळीवन
  • श्री क्षेत्र कारंजा
  • श्री क्षेत्र कुबेरेश्र्वर (बडोदा)
  • श्री क्षेत्र कुमशी
  • श्री क्षेत्र कुरवपूर
  • श्री क्षेत्र कोळंबी
  • श्री क्षेत्र खामगाव दत्त मंदिर
  • श्री क्षेत्र गरुडेश्वर (गुजरात)
  • श्री क्षेत्र गाणगापूर
  • श्री क्षेत्र गिरनार गुरुशिखर (गुजरात)
  • श्री सद्गुरू गुरुनाथ मुंगळे ध्यानमंदिर (पुणे)
  • श्री क्षेत्र गुरुशिखर अबू (राजस्थान)
  • श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर (बडोदा)
  • श्री गोरक्षनाथ मंदिर श्रीक्षेत्र भामानगर (धामोरी)
  • श्री क्षेत्र चिकुर्डे दत्त देवस्थान
  • श्री क्षेत्र चौल दत्तमंदिर
  • श्री जंगली महाराज मंदिर (पुणे)
  • श्री क्षेत्र जबलपूर पादुकामंदिर
  • श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड, मुंबई)
  • श्री क्षेत्र टिंगरी
  • श्री क्षेत्र डभोई (बडोदा)
  • श्री दत्तमंदिर (डिग्रज)
  • श्री तारकेश्र्वर स्थान
  • श्री दगडूशेठ दत्तमंदिर (पुणे)
  • श्री क्षेत्र दत्तभिक्षालिंग
  • श्री क्षेत्र दत्तवाडी (सांखळी गोवा)
  • श्री क्षेत्र दत्ताश्रम (जालना)
  • श्री क्षेत्र देवगड नेवासे
  • श्री क्षेत्र नरसी
  • श्री क्षेत्र नारायणपूर
  • श्री क्षेत्र नारेश्र्वर
  • नासिक रोड दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र नीलकंठेश्र्वर (बडोदा)
  • श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी)
  • श्री क्षेत्र दत्तगुरू मंदिर,मंगळवार पेठ सातारा (सातारा)
  • श्री क्षेत्र पवनी
  • श्री क्षेत्र पांचाळेश्र्वर आत्मतीर्थ
  • श्री क्षेत्र पिठापूर
  • श्री गुरुदेवदत्त मंदिर (पुणे)
  • श्री दत्तमंदिर रास्तापेठ (पुणे)
  • श्री क्षेत्र पैजारवाडी
  • श्री क्षेत्र पैठण
  • श्री क्षेत्र बसवकल्याण
  • श्री क्षेत्र बाचणी दत्तपादुका
  • श्री क्षेत्र बासर आणि ब्रह्मेश्वर
  • श्री क्षेत्र बाळेकुंद्री
  • श्री भटगाव दत्तमंदिर (नेपाळ)
  • श्री भणगे दत्त मंदिर (फलटण)
  • श्री क्षेत्र भामानगर (धामोरी)
  • श्री क्षेत्र भालोद (गुजरात)
  • श्री क्षेत्र मंथनगड
  • श्री क्षेत्र माणगांव
  • श्री क्षेत्र माचणूर
  • श्री क्षेत्र माणिकनगर
  • माधवनगर - फडके दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र माहूर
  • श्री क्षेत्र मुरगोड
  • श्री क्षेत्र राक्षसभुवन
  • श्री क्षेत्र रुईभर दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र लोणी भापकर दत्तमंदिर
  • श्री दत्तमंदिर (वाकोला)
  • श्री क्षेत्र विजापूर नृसिंह मंदिर
  • श्री क्षेत्र वेदान्तनगरी (दत्तदेवस्थान नगर)
  • श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र
  • श्री क्षेत्र शिर्डी
  • श्री क्षेत्र शिवपुरी दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र शुचिन्द्रम दत्तमंदिर
  • श्री क्षेत्र शेगाव
  • श्री क्षेत्र सटाणे
  • श्री साई मंदिर (कुडाळ गोवा)
  • श्री क्षेत्र साकुरी
  • श्री क्षेत्र सुलीभंजन
  • श्री स्वामी समर्थ मठ चेंबूर
  • श्री स्वामी समर्थ मठ दादर
  • श्री स्वामी समर्थ संस्थान (बडोदा)
  • श्री हरिबाबा मंदिर (पणदरे)
  • श्री हरिबुवा समाधी मंदिर (फलटण)
  • श्री हिंगोलीचे दत्त मंदिर
  • श्री दत्त मंदिर बु. अल्लुर (निपाणी गडहिंग्लज रोड)

उपासनेची वैशिष्ट्ये

संपादन

दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते.

दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.-

  • औदुंबर :
  • कोल्हापूर - श्री क्षेत्र प्रयाग करवीर काशी कोल्हापूर हे एक अत्यंत महत्त्वाचे व पवित्र असे ठिकाण कोल्हापूर पासून अवघ्या 7किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे ,येथे पवित्र पाच नद्यांचा संगम आहे याचे महत्त्व श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये पंधरा व सोळाव्या ओवीमध्ये व श्री करवीर माहात्म्य या ग्रंथामध्ये याची नोंद आहे.येथे श्री दत्तात्रेय रोज नित्यनियमाने स्नानास येतात व चंदन उटी लावतात अशी आख्यायिका आहे.तसेच येथे श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे त्यामध्ये श्रींच्या स्वयंभू पाषाणी पावदका आहेत. माघ महिन्यामध्ये माघ स्नान यात्रा भरते.या यात्रे साठी व स्नानासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.येथील श्रींची पूजा वंशपरंपरेनुसार श्री अभिनव अशोक गिरीगोसावी यांचेकडे आहे.
  • कडगंची : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र हे कर्नाटक राज्यात गुलबर्गा शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
  • कर्दळीवन : अक्कलकोट स्वामींची बखर, गुरुचरित्र, द्विसहस्र गुरुचरित्र, पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांचे चरित्र, श्रीपाद वल्लभ यांचे चरित्र, इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यामध्ये कर्दळीवनाचा उल्लेख आहे.
  • कारंजा : लाड कारंजे, श्रीगुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान.
  • कुरवपूर : श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे वास्तव्य आणि पादुका.
  • गरुडेश्वर : योगी श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. नर्मदा नदीच्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
  • गाणगापूर : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
  • गिरनार हे गुजरातमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजरातमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू नेमिनाथांचे मंदिर आहे. तसेच गोरखनाथ मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
  • नरसोबाची वाडी : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थानसांगली पासून चाळीस किलोमीटरवर आहे. या स्थानाला नृसिंहवाडी म्हणतात. वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले. विजापूरच्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे आदिलशहाने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
  • नारेश्वर : हे रंगावधूत महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र गुजरात राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी 'दत्त बावनी' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील वडोदरापासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. नर्मदा परिक्रमा करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि गोकुळाष्टमी हे उत्सव साजरे होतात.
  • नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्र कुटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून नेपाळमध्ये पूजले जाते.
  • पीठापूर
  • बसवकल्याण
  • श्रीपंत महाराज बाळेकुंद्री : श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर : - भारतात प्रचलित असलेल्या विविध उपासनामार्गात ‘दत्तसंप्रदाय’ हा अत्यंत प्राचीन आहे; किंबहूना इतर संप्रदायांवर त्याची छाप कमी अधिक प्रमाणात दिसून येते. अवधूतपंथ हा त्यापासून फारसा वेगळा नाही. दत्तसंप्रदायात अनेक महान् लोकोत्तर विभूति निर्माण झाल्या आणि त्यांनी हा संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवला असून त्याची परंपरा अखंड राखली आहे. अशा परंपरेत श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर या श्रीदत्तावतारी सत्पुरुषाची गणना असून, त्यांनी या पंथाची ध्वजा फडकत ठेवण्याचे कार्य प्रभावीपणे केले आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील (इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला. श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वाना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.
  • माणगाव
  • माहूर : चांगदेव राऊळ हे माहूरच्या यात्रेनिमित्त फलटणहून निघाले होते. तसेच ते द्वारका येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
  • अक्कलकोट : स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. सोलापूरजवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
  • श्रीक्षेत्र रुईभर श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद

इतर मंदिरे व स्थाने

संपादन
  • अंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज आणि संत दासोपंत यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात या अंबेजोगाई येथे आहे
  • अष्टे :
  • कोल्हापूर : भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
  • खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे संत पाचलेगावकर महाराजांचा मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
  • चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये रेवदंड्यापासून ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
  • फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
  • माणिकनगर : बीदर येथील हुमणाबाद या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. श्रीमाणिकप्रभू यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. अहमदाबाद येथील बाबा त्रिवेदी महाराज या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी नानासाहेब पेशव्यांनी रंगराव यांना माणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे गुलबर्गा रेल्वे स्थानक असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
  • विजापूर : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
  • सांखळी (गोवा) : डिचोली तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी रामनवमी, अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि दत्त जयंती असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
  • श्रीक्षेत्र रुईभर श्रीदत्त मंदिर संस्थान रुईभर ता. जि. उस्मानाबाद पासून १२ कि. मी. अंतरावरील गाव.

शिष्य व कार्य

संपादन

श्रीपाद वल्लभनृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले.

संप्रदायाचे ग्रंथ

संपादन
  • अथर्ववेदात दत्तात्रेय उपनिषदाचा समावेश आहे.
  • अवधूतगीता नावाचा ग्रंथ एक प्रमाणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा पावला आहे.
  • गुरुगीता
  • गोरक्षनाथ लिखित हिंदी रचनांचे संकलन गोरखबानी या ग्रंथात झाले आहे.
  • श्री दत्तगुरूंनी 'दत्त संहिता' नावाचा ग्रंथ लिहिला.
  • दत्तप्रबोध हा ग्रंथ कावडीबुवा यांनी लिहिला.
  • परशुरामांनी त्यावर आधारित 'परशुराम कल्पसूत्र' नावाची पन्‍नास खंडांची रचना केली.
  • सुमेधाने या दोन ग्रंथांच्या आधाराने त्रिपुररहस्य नावाचा ग्रंथ रचला.
  • महानुभावांच्या आद्य ग्रंथापैकी 'साती ग्रंथ' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात ग्रंथातील 'उद्धवगीता' या भास्करभट बोरीकर नावाच्या एकादशटीकेत प्रारंभीच दत्तात्रेयाला नमन केलेले आहे.
  • मुकुंदराज या आद्य मराठी कवीचे नाथपरंपरेशी जोडणारे उल्लेख आढळतात.
  • दत्तमहिमा गाण्यासाठी लिहिलेला सैदाद्रवर्णन हा ग्रंथ आहे.

दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते.

संबंधित ग्रंथ

संपादन
  • श्रीगुरुचरित्र लेखक सरस्वती गंगाधर
  • दत्तप्रबोध
  • दत्तमाहात्म्य
  • गुरुलीलामृत
  • नवनाथभक्तिसार
  • नवनाथ सार - लेखक धुंडिसुत मालू
  • दक्षिणामूर्ती संहिता
  • दत्तसंहिता

आधुनिक पुस्तके

संपादन
  • आध्यात्मिक साधना पूर्वतयारी - लेखक श्री. कुलदीप निकम दत्तप्रबोधिनी प्रकाशन[१५]
  • दत्त अनुभूती : स्वामिकृपेने घडलेल्या ११ गिरनार वाऱ्यांमधील चमत्कारिक अनुभव (आनंद कामत)
  • दत्त संप्रदायाचा इतिहास - लेखक डॉ. रा.चिं. ढेरे पद्मगंधा प्रकाशन
  • श्रीदत्तात्रेय ज्ञानकोश - संपादक डॉ. प्र.न. जोशी
  • 'मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती' - लेखक डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन
  • दत्त माझा दिनानाथ (डाॅ. ॐश्रीश श्रीदत्तोपासक)

आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप.

पराडकर यांची सुप्रसिद्ध गीते

संपादन
  • अनुसूयेच्या धामी आले (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
  • आज मी दत्तगुरू पाहिले
  • कृष्णाकाठी दत्तगुरूंचा नित्य असे संचार (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
  • गगनिचे नंदादीप जळती (कवी डॉ. व्ही.टी. पंचभाई, संगीत आर.एन. पराडकर)
  • गुरुदत्त पाहिले कृष्णातिरीं
  • गेलो दत्तमयी होउनी (कवी गिरिबाल, संगीत शांताराम पाबळकर)
  • जय जय दत्तराज माऊली (कवी सुधांशु, संगीत विठ्ठल शिंदे)
  • दत्तगुरूंना स्मरा
  • दत्तगुरू सुखधाम, माझा दत्तगुरू सुख धाम
  • दत्त दिगंबर दैवत माझे (कवी सुधांशु, संगीत आर.एन. पराडकर)
  • दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी
  • दत्ता दिगंबरा या हो
  • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. (कवी सुधांशु; राग यमन)
  • धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची (पारंपरिक गीत)
  • निघालो घेऊन दत्ताची पालखी (संगीत-सद्गुरू नंदू होनप)
  • पुजा हो दत्तगुरू दिनरात (कवी गुलाब भेदोडकर)
  • मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
  • माझी देवपूजा पाय तुझे (कवी शिवदीन केसरी),

वगैरे


संदर्भ

संपादन
  1. ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: A-M. The Rosen Publishing Group. p. 176. ISBN 978-0-8239-3179-8. 1 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Tulsidas, Goswami (2020). Srimad Bhagavata Mahapurana. Gorakhpur: Gita Press.
  3. ^ Gorakhpur, Gita Press (2015). Sankshipta Markandeya Puran. Gorakhpur: Gita Press.
  4. ^ J. L., Shastri; G. P., Bhatt; G. V., Tagare. Brahmanda Purana: Ancient Indian Tradition And Mythology.
  5. ^ Antonio Rigopoulos (1998). Dattatreya: The Immortal Guru, Yogin, and Avatara: A Study of the Transformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindu Deity. State University of New York Press. pp. 57–68. ISBN 978-0-7914-3696-7. 19 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Dalal 2010.
  7. ^ K P Gietz 1992.
  8. ^ Maxine Berntsen (1988). The Experience of Hinduism: Essays on Religion in Maharashtra. State University of New York Press. pp. 96–106. ISBN 978-0-88706-662-7. 17 March 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 October 2016 रोजी पाहिले.
  9. ^ Rigopoulos (1998), p. 77.
  10. ^ Harper & Brown (2002), p. 155.
  11. ^ Mallinson 2012, पाने. 407–411.
  12. ^ Gudrun Buhnemann (1988), Puja: A study in Smarta Ritual, University of Vienna, Be Nobili, Editor: G Oberhammer, page 126
  13. ^ Kalelkar, Dattatraya Balakrishna (1972). Jivanta vratotsava. Rāshṭrīya Granthamālā.
  14. ^ Jośī, Pralhāda Narahara (1974). Śrīdattātreya-jñānakośa. Surekhā Prakāśana-Grantha.
  15. ^ [१][permanent dead link]