हिंदू दैवते
हिंदू धर्मातील देवता किंवा हिंदू दैवते हे हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जातात. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना हिंदू धर्मात केली जात असल्याचे दिसून येते.[१] हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, गाणपत्य, शाक्त, लिंगायत अशा पंथांच्या माध्यमातून अनुक्रमे शंकर, विष्णू, गणपती, देवी अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील उपदेवता यांची उपासना केली जाते.[२]
इतिहास
संपादनहिंदू धर्मातील देवतांचा विकास वैदिक काळात झालेला आहे. वैदिक काळापासून पुराण काळापर्यंत असा देवता विकास होत आलेला आहे.वैदिक काळात वैदिकांनी त्याकाळी अनार्य मानल्या गेलेल्या ग्राम जनजातींच्या देवतांचा स्वीकार केला आणि त्यातून हिंदू धर्मात ग्रामीण जीवनातील देवतांचा प्रवेश झाला असे मानले जाते.[३]
देवता विकासाचे टप्पे
संपादनहिंदू धर्माचा उगम प्राचीन संस्कृतीत सापडतो. त्यातील देवता ह्यासुद्धा हिंदू धर्मातील आद्य देवता मानल्या जातात.[४]सिंधु संस्कृतीचा शोध लावलेल्या अभ्यासक- संशोधकांनी तत्कालीन देव-देवता यांची माहिती संशोधनाने मिळविली आहे. योगी आसनात बसलेला , तीन शिंगे असलेला, दाढी असलेला पुरुष देव, नग्न अवस्थेत असलेल्या स्त्री- प्रतिमा, लिंगाचा आकार कोरलेल्या मृत्तिका शिळा यावर देव-देवतांची चित्रे अंकित केलेली संशोधनात आढळून आलेली आहेत. या जोडीनी पिंपळाचे झाड,गेंड्यासारखा दिसणारा पशु, कुबड असलेला बैल यांच्याही मृत्तिका प्रतिमा सापडल्या आहेत. आर्येतरांच्या देवताही अशाच प्रकारच्या असून वैदिक आर्यानी त्यांचा स्वीकार उपासना पद्धतीत केला असावा असा अंदाज अभ्यासक वर्तवितात.[५][६]
- वैदिक काळ-
हिंदू धर्माचा प्राचीन ग्रंथ मानला गेलेल्या ऋग्वेदात अग्नी, वरुण, इंद्र, मरुत, उषा, सरस्वती, अश्विनीकुमार, ब्रह्मणस्पती, रुद्र, आदित्य, सोम अशा विविध देवतांचा उल्लेख सापडतो. निसर्गातील आग, पाऊस, वारा, नदी, पहाट, सूर्य, चंद्र अश्या विविध शक्तींना देवतास्वरूप देऊन त्यांची प्रार्थना ऋग्वेदात केलेली दिसून येते. याखेरीज विष्णू, इला, समिधा, नाराशंस, यम, पितर अश्या लहान देवताही ऋग्वेदात व अन्य वेदांत उल्लेखिल्या आहेत.[७]
रुद्रातील दैवते
संपादनरुद्रातील सहाव्या अनुवाकात नमूद दैवते :
संदर्भ
संपादन- ^ Chandra, Dr Lokesh (2014-02-04). Vishwavyapi Hindu Sanskruti / Nachiket Prakashan: विश्वव्यापी हिंदू संस्कृती. Nachiket Prakashan.
- ^ Chandra, Suresh (1998). Encyclopaedia of Hindu Gods and Goddesses (इंग्रजी भाषेत). Sarup & Sons. ISBN 9788176250399.
- ^ Jain, Sandhya (2018). Aadidev Aarya Devata (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352668731.
- ^ Parpola, Asko (2015-07-15). The Roots of Hinduism: The Early Aryans and the Indus Civilization (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-022693-0.
- ^ Sharma, Ram Sharan (2018-03-16). Bharat ka Prachin Itihas (हिंदी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-909396-0.
- ^ Sahay, Shivswaroop (2008). Pracheen Bharatiya Dharm Evam Darshan (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120823693.
- ^ Dasgupta, Surendranath (1975). A History of Indian Philosophy (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publ. ISBN 9788120804128.
देवता
संपादनहे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |