तापी नदी
तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही पश्चिमवाहिनी नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग, खानदेश, व गुजरातमधील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदीची मुख्य उपनदी ही पूर्णा नदी आहे.
तापी | |
---|---|
सुरत जवळील तापी नदी | |
इतर नावे | ताप्ती |
उगम | मुलताईजवळ |
मुख | अरबी समुद्र |
पाणलोट क्षेत्रामधील देश | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात |
लांबी | ७२४ किमी (४५० मैल) |
उगम स्थान उंची | ७४९ मी (२,४५७ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ६५,१४५ |
उपनद्या | पूर्णा, गिरणा नदी, वाघूर |
धरणे | उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण |
उगम
संपादनतापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव "मूळतापी" आहे.
मुख
संपादन६७० कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी नदी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.
उपनद्या
संपादनपूर्णा
संपादनपूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात भैसदेही येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे तसेच हिला संपूर्णा असेही म्हणतात. ही नदी तापी नदीला समांतर पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी,गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे.
पांझरा ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक नदी आहे. धुळे जिल्ह्यातील ही नदी तापीची उपनदी आहे. तिची लांबी सुमारे १६० कि.मी. आहे. नदी
संपादनअनेर नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील प्रदेश- बडवानी जिल्हा, मध्य प्रदेश, | जळगाव जिल्हा, महाराष्ट्र |
अनेर नदी ही मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांतील सातपुडा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर ६०० मीटर उंचीवरील, अक्षांश २१° २३‘ उ./७५° ४५‘ पूर्व, या ठिकाणी उगम पावते. जळगाव जिल्ह्यातील वैजापूर हे गाव पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील शेवटचे गाव आहे. या गावातून वाहणारी अनेर नदी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमारेषा आहे. पुढे ही नदी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातून वाहते. तापीला उजवीकडून मिळणारी ही तापीची सर्वात मोठी उपनदी आहे. नैर्ऋत्य दिशेला ९४ कि.मी. वाहून, अनेर नदी जळगाव जिल्ह्यातील पिळोदा या गावाजवळ तापीला मिळते. अनेर नदीच्या काठावर तोंदे, अजंदे, होळ, नांथे, मोहिदा, वेळोदे, पिळोदा ही गावे आहेत. जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले अनेर धरण हे मातीचे धरण याच नदीवर आहे. अनेर नदीचे खोरे १७०२ चौरस किलोमीटर आकारमानाचे आहे.
गिरणा
संपादनगिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील 'दळवट' या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते. मांजरा नदीची उपनदी आहे. उजव्या बाजूने मांजरा नदीला मिळते. वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून ईशान्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अंमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.
गिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इ. पिके होतात.
गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरणयोजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे.
वाघूर
संपादनवाघूर नदी ही तापी नदीची उपनदी आहे. वाघूर नदीचा उगम औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणीमध्ये झाला आहे. ही नदी औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांमधून वाहते. भुसावळ तालुक्यातील शेळगावजवळ वाघूर नदीचा तापीशी संगम झाला आहेस
इतर उपनद्या
संपादनपौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.
या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.
हेही वाचा
संपादन- तापी नदी, थायलंड