काटेपूर्णा नदी
काटेपूर्ण नदी याच्याशी गल्लत करू नका.
काटेपूर्णा नदी ही महाराष्ट्रातील अकोला व वाशीम , (कारंजा) जिल्ह्यांतून वाहणारी एक नदी आहे. अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पूर्णा नदीची ही उत्तरवाहिनी उपनदी आहे. नदीची लांबी सुमारे ९७ किमी. नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावते व उगमस्थानी शिवशक्ती मंदिर व उगमेश्वर असे दोन शिवमंदिर आहे . काटा येथून नदी मालेगाव,मंगरूळ, अकोला आणि मूर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते.
काटेपूर्णा नदी | |
---|---|
उगम | काटा(अजिंठा पर्वतराजी) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत महाराष्ट्र |
लांबी | ९७ किमी (६० मैल) |