मोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.

मोसम नदीचे खोरे सुपीक आहे. या खो‍ऱ्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेमुळे मुख्यत्वे नगदी पिके घेतली जातात.ऊस, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला इ.मुख्य पिके घेतली जातात.मागिल पंधरा वर्षापूर्वी बारमाही वाहणारी मोसम नदीला बदलत्या हवामानामूळे पावसाळा वगळता वाहण्यासाठी हरणबारी धरणावर अवलंबून रहावे लागते.परंतु आजही मोसम खोऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी मोसम नदीवरच आहे.

काठावर वसलेली गावे

संपादन