वाकी नदी
वाकी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
वाकी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | नासिक महाराष्ट्र |
वाकी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीच्या उगमस्थानाजवळील इगतपुरी येथे त्रिंगलवाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे.
ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अहमदनगर व नाशिक जिल्हांच्या सीमेवर असणाऱ्या कळसुबाई या शिखराजवळ उगम पावते. या नदीचा उगम प्रत्यक्ष रित्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात होतो. या नदीच्या उगमस्थानाजवळील इगतपुरी येथे त्रिंगलवाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे. ही नदी उगम क्षेत्रापासून ५ किमी अंतरानं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवेश करते. कळसुबाई डोंगर रांगेत पडणाऱ्या पाऊसामुळे या नदीला दर वर्षी पावसाळ्यात पूर येतो.ही नदी प्रवरा नदीची एक लहान उपनदी असून ती निळवंडे गावाच्या अलीकडे २ किमी अंतरावर प्रवरेला मिळते. ही नदी अप्पर प्रवरा प्रकल्प म्हणजेच निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात येते. त्यामुळे या नदीच्या पुराचे पाणी प्रवरा नदीमार्गे या धरणात येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |