तमिळनाडू
तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते.
तमिळनाडू | |
भारताच्या नकाशावर तमिळनाडूचे स्थान | |
देश | भारत |
स्थापना | नोव्हेंबर १, १९५६ |
राजधानी | चेन्नई13°05′N 18°16′E / 13.09°N 18.27°E |
सर्वात मोठे शहर | चेन्नई आणि मदुराई |
सर्वात मोठे महानगर | चेन्नई |
जिल्हे | ३२ |
क्षेत्रफळ | १,३०,०५८ चौ. किमी (५०,२१६ चौ. मैल) (११) |
लोकसंख्या (२०११) - घनता |
७२,१३८,९५८ (७) - ५५० /चौ. किमी (१,४०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०) |
प्रशासन - राज्यपाल - मुख्यमंत्री - विधीमंडळ (जागा) |
आर्. एन्. रवी एम्. के. स्टॅलिन तमिळनाडू विधानसभा (२३५) |
राज्यभाषा | तमिळ |
आय.एस.ओ. कोड | IN-TN |
संकेतस्थळ: tn.gov.in/ | |
राज्यचिन्ह |
तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदूळ, रागी, कापूस व ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.
प्रागैतिहासिक
संपादनसाम्राज्यांचा काळ
संपादनचोळ साम्राज्य
संपादनविजयनगर आणि नायकांचा काळ
संपादनयुरोपिअन शासनकर्त्यांचा काळ
संपादनभारतीय स्वातंत्र्या नंतरचा काळ
संपादनभूगोल
संपादनहवामान
संपादनशासन आणि प्रशासन
संपादनजिल्हे
संपादनतमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात.
राजकारण
संपादनभौगोलिक विस्तार आणि समाज
संपादनहिमालय सोदुन् भारतातले सर्वात उन्च शिखर आनैमुदई हे तमिलनदुमध्ये आहे . उन्ची २६९५ मितर
शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
संपादनसंस्कृती
संपादनभाषा आणि साहित्य
संपादनतमिळ (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते.
धर्म आणि जातीव्यवस्था
संपादन२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% हिंदू, ६.१% ख्रिश्चन, ५.९% मुस्लिम, ०.१% जैन आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत.
Usatv=== सणवार /उत्सव ===
संगीत
संपादनकला आणि नृत्य
संपादनचित्रपट सृष्टी
संपादनखाद्यसंस्कृती
संपादनतामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी, शेंगा यांचा
सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल, इडली आणि
सांबर, मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते. तामिळ
लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते
भाताचा वापर करतात. भाता सोबतच मसुरीची डाळ आणि
शेंगाचाही वापर केला जातो. चिंच, मिरे, हिरवी, लाल मिरची ह्यांचा
जेवण स्वादिष्ट आणि मसालेदार करण्यासाठी वापर केला जातो.
सढळ हाताने कढीपत्याचा वापर तमिळ जेवणात केला जातो
मिरची आणि मसाल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच पदार्थ
पचनास सुलभ व्हावेत म्हणून दह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात
वापरले जात आहे. तीळ, लसूण, जिरे आणि मसाल्यांचे
फोडणीसाठी वापर केला जातो. नारळा चा प्रत्येक पदार्थात वापर
आणि लवंग जायफळ कोशिंबीर गुलाब पाण्याचा जेवणात वापर
होतो इडली डोसा आदि मेदू वडा या तिन्ही पदार्थानी भारताच्या
सीमाही पार केल्या आहेत.
तामिळनाडू म्हटलं की समोर येतात ते वेगवेगळ्या नावाचे भात. तांदळाच्या राज्यामध्ये आपल्याला मुरुक्कू, इडिअप्पम असे तांदळाचे विविध पदार्थ पाहायला मिळतात.
राज्याची मानचिन्हे
संपादनभाषा | तमिळ |
---|---|
गीत | तमिळ देवीस आवाहन |
नृत्य | भरतनाट्यम |
प्राणी | निलगिरी तहर |
पक्षी | पाचू कवडा |
फुल | कळलावी |
वनस्पती | ताड |
खेळ | कबड्डी |
अर्थव्यवस्था
संपादनशेतीव्यवसाय
संपादनकापडगिरण्या,वाहन आणि अवजड उद्योग
संपादनअणुसंधान आणि सॉफ्टवेर उद्योग
संपादनअन्न आणि पेयपदार्थ प्रक्रिया उद्योग
संपादनमूलभूत सुविधा
संपादनवातावरण
संपादनखेळ/क्रीडा
संपादनपर्यटन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |