पाचू कवडा
शास्त्रीय नाव | Chalcophaps indica indica (Linaaeus) |
---|---|
कुळ | कपोताद्य (Columbidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Emerald Dove |
संस्कृत | हरित कपोत |
हिंदी | मरकत फाखता |
वर्णन
संपादनपाचू कवडा हा आकाराने साधारणपणे २७ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. हा पक्षी पाठीकडून तपकिरी-गुलाबी रंगाचा त्यावर पाचू सारखी चमकदार झाक असलेला आहे. याची शेपूट गडद तपकिरी रंगाची असून याच्या डोक्यावर पांढरा-राखाडी रंग असतो. पाचू कवडा उडतांना याच्या पंखाखालचा तांबूस रंग दिसतो. नराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पांढरा पट्टा असतो. हा फरक सोडून नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे एकट्याने किंवा लहान थव्याने राहणे पसंत करतात.
वास्तव्य/आढळस्थान
संपादनभारतात हिमालयाच्या पायथ्यापासून आसाम पर्यंत, निलगिरी पर्वत रांगांसह पश्चिम घाट, मध्य भारतात विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आणि अंदमान आणि निकोबार येथील सदाहरित जंगले, पानगळीची जंगले, बांबूची जंगले येथे पाचू कवडा राहतो तसेच बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशातही याचे वास्तव्य आहे. श्रीलंका येथील Chalcophaps robinsoni ही उपजात रंगाने आणि आकाराने थोडी वेगळी आहे.
खाद्य
संपादनविविध बिया, विशेषतः जमिनीवर पडलेल्या बिया खाणे या पक्ष्यांना आवडते.
प्रजनन काळ
संपादनजानेवारी ते एप्रिल-मे हा काळ या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ आहे. यांचे घरटे बांबू किंवा इतर झाडात, जमिनीपासून ४ ते ५ मी. उंचीवर काटक्या वापरून बनविलेले असते. मादी एकावेळी २ ते ३ फिकट पिवळसर पांढऱ्या रंगाची अंडी देते. नर-मादी मिळून अंडी उबविण्यापासून पिलांचे संगोपन पर्यंतची सर्व कामे करतात.
विशेष
संपादनपाचू कवडा हा तमिळनाडू राज्याचा राज्य पक्षी आहे.
हे सुद्धा पहा
संपादनचित्रदालन
संपादन-
पाचू कवडा मादी, गोरेगाव, मुंबई.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |