इजिप्त

उत्तर आफ्रिका खंडातील देश
(ईजिप्‍त या पानावरून पुनर्निर्देशित)


इजिप्त (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: ˈiː.dʒɪpt; इजिप्शियन: केमेत (Kemet); कॉप्टिक: Ⲭⲏⲙⲓ (कीमि); अरबी/हिंदी: مصر‎ (मिस्र); इजिप्शियन अरबी: Máṣr (मास्र); हिब्रू: מִצְרַיִם (मित्झ्रायिम); ग्रीक: Χημία (खेमिया)); अधिकृत नाव इजिप्तचे अरब गणराज्य हा उत्तर आफ्रिकेतील प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग आफ्रिकेमध्ये असून केवळ सिनाई द्वीपकल्प हा सुवेझ कालव्याच्या पूर्वेकडील भाग आशियामध्ये आहे. यामुळे इजिप्त हा देश मध्यपूर्वेशी संबंधित मानला जातो.

इजिप्त
جمهورية مصر العربية
जूम्हुरीया मेस्सर अल अरबीयाह
इजिप्तचे अरब प्रजासत्ताक
इजिप्तचा ध्वज इजिप्तचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: बिलादी, बिलादी, बिलादी
इजिप्तचे स्थान
इजिप्तचे स्थान
इजिप्तचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कैरो
अधिकृत भाषा अरबी
 - राष्ट्रप्रमुख अब्देल फताह एल-सिसी
 - पंतप्रधान कमाल गंझौरी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेब्रुवारी २८, १९२२ 
 - प्रजासत्ताक दिन जून १८, १९५३ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,०१,४५० किमी (३०वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६
लोकसंख्या
 -एकूण ७,६०,००,००० (१६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३३९.२ अब्ज अमेरिकन डॉलर (३२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,०७२ अमेरिकन डॉलर (११२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन इजिप्शियन पाऊंड(EGP)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ EG
आंतरजाल प्रत्यय .eg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इजिप्तचे क्षेत्रफळ अंदाजे १०,२०,००० चौरस किलोमीटर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने इजिप्त हा जगात पंधराव्या क्रमांकाचा देश आहे. इजिप्तच्या ७.७ कोटी लोकसंख्येपैकी (२००५चा अंदाज) बहुतेक लोक नाईल नदीच्या जवळ राहतात. या भागातच शेतीयोग्य जमीन आहे. इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात. आजकालच्या इजिप्तमधील बहुसंख्य लोक शहरी असून ते अरब लोकसंख्याबहुल अश्या कैरोअलेक्झांड्रिया, इजिप्त या शहरांजवळ राहतात. इजिप्त हा देश त्याच्या प्राचीन संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. गीझा येथील पिरॅमिड,स्फिक्स, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत. आजचा इजिप्त हा अरब व मध्यपूर्व भागाचे महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजला जातो.

इतिहास

संपादन

इजिप्तच्या इतिहासाचा जगाला परिचय हा नेपोलियन याने इजिप्त जिंकल्यावर झाला. सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी आदिम लोकांनी नाईल नदीच्या खो-यात इजिप्तमध्ये शेतीला सुरुवात करून सभ्यतेची मुहूर्तमेढ रोवली. इजिप्तमध्ये मेंफिस ही समृद्ध राज्याची राजधानी होती. अमुन या राज्याची संरक्षक देवता होती.लाल रंग हा राज्याचा प्रतीकरूप वर्ण होता. राजा लाल रंगाचा मुकुट धारण करी. यांच्या राजचिह्नावर ‘पपायरस’ वनस्पतीची शाखा होती. दक्षिण इजिप्तमध्ये नगरराज्ये संघटीत झाली.आबायदोस हे यांची राजधानी होती. गृध्र नरब्ब्त ही यांची संरक्षक देवता तर पांढरा हा त्यांचा प्रतीकरूप रंग होता. यांच्या राजचिह्नावर ‘लिली’ची शाखा होती.[]

रॅमसिस

संपादन

इजिप्तचे १९ व २० व्या राजवंशातील राजे स्वतःला रॅमसिस असे म्हणवून घेत. त्यांच्यापैकी द्वितीय राम हा राजा इ.स. १३१५ मध्ये जन्माला आला. ६७ वर्षे त्याने राज्य केले. त्याने नुबियात सोन्याच्या खाणींचा शोध लावून राजकोष समृद्ध केला.याने अनेक मंदिरेही बांधली. आशियातील राज्य जिंकून साम्राज्य विस्तार केला. इ.स. पूर्व पाचव्या शतकापर्यंत इजिप्तची ही संस्कृती टिकली. नंतर ग्रीक, रोमन राजांनी त्यावर वर्चस्व गाजवले. त्यानंतर मुस्लिम आक्रमक येथे आले आणि त्यांनी येथील प्रजेला इस्लामची दीक्षा दिली.

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

इजिप्तच्या पश्चिम सीमेवर लिबिया, दक्षिण सीमेवर सुदान, तसेच ईशान्य सीमेवर इस्राइल आणि गाझा पट्टी हे प्रदेश येतात. इजिप्तच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर पूर्वेस लाल समुद्र येतात.

राजकीय विभाग

संपादन

इजिप्तचे २६ मुहाफझात अथवा प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताचे अनेक मर्काझी(भागांत) विभाजन केले आहे.

प्रांत राजधानी भाग
अलेक्झांड्रिया अलेक्झांड्रिया, इजिप्त उत्तर इजिप्त
आस्वान आस्वान वरचे इजिप्त
अस्युत अस्युत वरचे इजिप्त
अल बुहायराह दमानहुर खालचे इजिप्त
बेनी सुएफ बेनी सुएफ वरचे इजिप्त
कैरो कैरो मधले इजिप्त
अद दकालियाह मन्सुरा खालचे इजिप्त
दोम्यात दोम्यात खालचे इजिप्त
फय्युम फय्युम वरचे इजिप्त
गर्बियाह तांता खालचे इजिप्त
गिझा गिझा वरचे इजिप्त
इस्माइलिया इस्माइलिया कालवा
कफ्र अल-शेख कफ्र अल-शेख खालचे इजिप्त
प्रांत राजधानी भाग
मातृह मेर्सा मातृह पश्चिम
मिन्या मिन्या वरचे इजिप्त
मिनुफिया शिबिन एल-कोम खालचे इजिप्त
अल वाडी अल जदिद खर्गा पश्चिम
उत्तर सिनाई आरिश सिनाई
बुर सैद पोर्ट सैद कालवा
कालुबिया बन्हा खालचे इजिप्त
किना केना वरचे इजिप्त
लाल समुद्र हुर्घादा पूर्व
शर्किया झागाझिग खालचे इजिप्त
सुहाज सोहाग वरचे इजिप्त
दक्षिण सिनाई एल-तोर सिनाई
सुएझ सुएझ खालचे इजिप्त

मोठी शहरे

संपादन

इजिप्तमध्ये कैरो, अलेक्झांड्रिया, इजिप्त, आस्वान, अस्युत, अल-महाल्ला अल-कुब्रा, गिझा, हुरघडा, लक्झर, कोम ओम्बो, पोर्ट सफागा, पोर्ट सैद, शर्म अल शेख, सुएझ, झगाझिगअल-मिन्या ही मोठी शहरे आहेत.

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

लोकसंख्येनुसार इजिप्त हा मध्यपूर्वेतील देशांपैकी सर्वांत मोठा आणि आफ्रिकेत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. लोकसंख्या मुख्यत्वे नाईल नदीच्या काठाने त्यातही कैरो आणि अलेक्झांड्रिया, इजिप्त तसेच सुवेझ कालव्यानजिकच्या परिसरातच प्रामुख्याने केंद्रित झाली आहे. मोठी शहरे आणि ग्रामीण भागातील फेलाही (शेतकरी) यांच्यात लोकवस्ती विभागलेली आहे. लोकसंख्येच्या ९१ टक्के असलेला इजिप्शीयन वंश हा इजिप्तमधील सर्वांत मोठा वंश आहे. त्याशिवाय अबाज, तुर्क, ग्रीक आणि बदायूं अरब जमातींचे पूर्वेकडील वाळवंटात वास्तव्य आहे.

प्राचीन इजिप्तचा धर्म

संपादन

‘रा’ ही इजिप्तची सूर्यदेवता होती.सूर्यदेवाच्या अनेक पशुमुखी मूर्ती प्राप्त झाल्या आहेत. इजिप्तमध्ये गाय पवित्र मानली गेली होती. इझीस ही देवी गायीची प्रतीकरूप देवी होती. सर्व नगरातून तिची मंदिरे होती.नील (नाईल) नदी ही इजिप्तची गंगा मानली जात होती.निलोस देवी हे तिचे रूप. या नदीच्या पाण्याचा देवतांना अभिषेक केला जात असे. इजिप्तचा ब्रह्मा किंवा परमपिताही होता. त्याला ‘पिता’ म्हणत. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता होती. पौराणिक परंपरेनुसार ‘थोथ’ या देवतेने इजिप्तच्या ज्ञानाचा पाया घातला.[]

आता ९0 टक्के लोक इस्लाम धर्मीय आहेत. अल्पसंख्यकांमध्ये ख्रिश्चनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

संस्कृती

संपादन

इजिप्तच्या संस्कृतीला सहा हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे. इजिप्तची संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन लोकसंस्कृतीपैकी एक आहे आणि हजारो वर्षे इजिप्तने गुंतागुंतीची तरीही स्थिर अशी संस्कृती जोपासली आहे जिचा प्रभाव, त्यानंतरच्या युरोप, मध्यपूर्व आणि आफ्रिकन संस्कृतींवर दिसून येतो. इजिप्तची राजधानी कैरो हे आफ्रिकेतील सर्वांत मोठे शहर आहे. शिक्षण, संस्कृती आणि व्यापाराचे कित्येक शतकांपासून ते केंद्र आहे. आफ्रिका आणि अरब जगतातील नोबेल विजेत्यांमध्ये इजिप्शीयन नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. अरब संस्कृतीत नव्या प्रवाहांची सुरुवात इजिप्तपासूनच झाली आहे आणि इजिप्तमधील साहित्य, संगीत, चित्रपट आणि दूरचित्रवाणीचा प्रभाव अरब संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात आहे.

राजकारण

संपादन

इजिप्तचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद अन्वर अल सादातची १९८१ मध्ये हत्या झाली. त्यानंतर २०११ पर्यंत मोहम्मद होस्नी मुबारकची इजिप्तमध्ये होती. मुबारक हे नॅशनल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते आहेत. इजिप्तचे पंतप्रधान अहमद शफीक आहेत, पंतप्रधान अहमद नजीफ यांनी २९ जानेवारी २०११ला राजीनामा दिल्यानंतर शफीक यांचा शपथविधी झाला. जानेवारी २०११पासून सुरू असलेल्या आंदोलनासमोर नमते घेउन फेब्रुवारी ११, २०११ रोजी मुबारकने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

अर्थतंत्र

संपादन

कृषी, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात आणि पर्यटन हे इजिप्तमधील काही प्रमुख व्यवसाय होत. इजिप्तचे सुमारे तीस लाखाहून अधिक रहिवासी सौदी अरेबिया, इराणचा आखात आणि युरोपमध्ये कामाला आहेत. वेगाने वाढणारी लोकसंख्या, मर्यादित शेतीयोग्य जमीन आणि नाईल नदीवरचे अत्यधिक अवलंबित्व यामुळे इजिप्तच्या साधनसंपत्तीवर मोठा ताण येतो. १९७९ पासून अमेरिकेची आर्थिक मदत इजिप्तला मिळत आली आहे.

अलिकडच्या काळात कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायु साठ्यांवर आधारित उर्जा बाजारपेठ इजिप्तने विकसित केली आहे. पिरॅमिड्स साठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्तकडे पर्यटन आणि सुवेझ कालव्यांमधून होत असलेल्या जहाज वाहतुकीद्वारेही महसूल गोळा होतो.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृृतीचा विश्वसंचार,भारतीय विचार साधना प्रकाशन
  2. ^ डाॅॅ.हेबाळकर शरद, भारतीय संस्कृृतीचा विश्वसंचार, भारतीय विचार साधना प्रकाशन