इ.स. १९६३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
(१९६३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६० - १९६१ - १९६२ - १९६३ - १९६४ - १९६५ - १९६६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी ८ - डॉ.झाकीर हुसेन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
- मे २५ - इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.
- जून २२ - पॉल सहावा पोपपदी.
- जून २६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने मी बर्लिनचा एक नागरिक आहे (इश बिन आइन बर्लिनेर) असे जाहीर केले.
- जुलै १९ - ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
- जुलै २६ - सिनकॉम २ या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.
- जुलै २६ - युगोस्लाव्हियातील स्कोप्ये शहरात भूकंप. १,१०० ठार.
- जुलै २८ - फर्नान्डो बेलॉॅंडे टेरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट ८ - ईंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटिश पाउंड लुटले.
- ऑगस्ट १७ - जपानमध्ये फेरीबोट बुडाली. ११२ ठार.
- डिसेंबर १२ - केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- डिसेंबर १ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले.
- डिसेंबर १९ - झांझिबारला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य. सुलतान हमुद बिन मोहम्मदराजेपदी.
- डिसेंबर २२ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
जन्म
संपादन- ऑगस्ट १० - फूलनदेवी, दरोडेखोर;खासदार
- फेब्रुवारी २२ - विजय सिंग, फिजीचा गोल्फपटू.
- एप्रिल १३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.
- एप्रिल २६ - जेट ली, चीनी अभिनेता.
- मे २३ - टोनी ग्रे, वेस्ट ईंडिझचा क्रिकेट खेळाडू.
- जून ९ - जॉनी डेप, अमेरिकन अभिनेता.
- जून २६ - मिखाइल खोदोर्कोव्स्की, रशियन उद्योगपती.
- जून २७ - मीरा स्याल, ब्रिटिश लेखिका, अभिनेत्री.
- जुलै १७ - लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.
- जुलै २४ - कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
- जुलै २७- नवेद अंजुम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - रॉबिन स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १४ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २० - नवज्योतसिंग सिद्धू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ३० - माइक व्हेलेटा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- डिसेंबर ८ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.