मे १४
दिनांक
(१४ मे या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
मे १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३४ वा किंवा लीप वर्षात १३५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६४३ - फ्रांसचा राजा लुई तेराव्याच्या मृत्यूपश्चात लुई चौदावा राजा झाला. लई चौदाव्याने पुढील ७२ वर्षे राज्य केले.
अठरावे शतक
संपादन- १७९६ - एडवर्ड जेनरने प्रथमतः देवीची लस टोचली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८११ - पेराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य.
विसावे शतक
संपादन- १९०० - दुसरे ऑलिंपिक खेळ पॅरिसमध्ये सुरू.
- १९२९ - इंग्लिश क्रिकेट खेळाडू विल्फ्रेड ऱ्होड्सने आपला ४,०००वा बळी घेतला.
- १९४० - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेने रॉटरडॅम शहरावर तुफान बॉम्बफेक केल्यावर नेदरलॅंड्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४८ - इस्रायेल सार्वभौम राष्ट्र असल्याची घोषणा. शेजारी अरब देशांनी लगेच इस्रायेलवर हल्ला चढवला.
- १९५५ - शीत युद्ध - सोवियेत संघ व सात इतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी वॉर्सोचा तह केला.
- १९७३ - अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.
- १९८८ - अमेरिकेतील कॅरल्टन गावाजवळ दारु पिउन वाहन चालविणाऱ्या चालकाने तरुण मुले असलेल्या बसला धडक दिली. पेटलेल्या बसमध्ये २७ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.
- २००४ - दक्षिण कोरियाच्या संवैधानिक न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युनविरुद्धचा महाभियोगातील निकाल दोषी ठरवला व रोहला निर्दोष ठरवले.
जन्म
संपादन- १३१६ - चार्ल्स चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- १६५७ - छत्रपती संभाजी महाराज.
- १६६६ - व्हिक्टर आमाद्युस, सार्डिनियाचा राजा.
- १७१० - ऍडोल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.
- १८१७ - अलेक्झांडर कॉफमन, जर्मन कवी.
- १९०७ - अयुब खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष, हुकुमशहा.
- १९२२ - फ्रान्यो तुडमन, क्रोएशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - मृणाल सेन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
- १९३६ - वहीदा रेहमान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४३ - ओलाफुर राग्नार ग्रिमसन, आइसलॅंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४८ - बॉब वूल्मर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, क्रिकेट मार्गदर्शक.
- १९५३ - नोरोदोम सिहामोणी, कंबोडियाचा राजा.
- १९८४ - मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक
मृत्यू
संपादन- ९६४ - पोप जॉन बारावा.
- १४७० - चार्ल्स आठवा, स्वीडनचा राजा.
- १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
- १६१० - चौथा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १६४३ - लुई तेरावा, फ्रांसचा राजा.
- १९१२ - फ्रेडरिक आठवा, डेन्मार्कचा राजा.
- १९२३ - नारायण गणेश चंदावरकर, अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.
- १९२३ - चार्ल्स दि फ्रेसिने, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९६३ - डॉ. रघुवीर, वैदिक, संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.
- १९७८ - रॉबर्ट मेंझिस, ऑस्ट्रेलियाचा बारावा पंतप्रधान.
- १९८८ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- २००० - ओबुची कीझो, जपानी पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)