नोव्हेंबर ११
दिनांक
(११ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१५ वा किंवा लीप वर्षात ३१६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- १९१८ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसमधील कॉम्पियेन्ये गावाजवळ दोस्त राष्ट्रांशी संधी केली व युद्ध संपुष्टात आणले.
- १९१८ - ऑस्ट्रियाच्या सम्राट चार्ल्स पहिल्याने पदत्याग केला.
- १९२१ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वॉरेन जी. हार्डिंगने वॉशिंग्टन डी.सीमधील अज्ञात सैनिकाची समाधी राष्ट्राला अर्पण केली.
- १९२६ - अमेरिकेतील रूट ६६ या रस्त्याची आखणी करण्यात आली.
- १९३३ - अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यात प्रचंड वादळाने जमिनीवरील माती उडून गेली. डस्ट बोलची ही सुरुवात होती. यानंतर अमेरिकेतील महाभयंकर दुष्काळास सुरुवात झाली.
- १९४० - दुसरे महायुद्ध-टारांटोची लढाई - रॉयल नेव्हीने इतिहासातील सर्वप्रथम विमानवाहू नौकेवरून विमानहल्ला केला.
- १९४० - अमेरिकेत हिमवादळात १४४ ठार.
- १९६२ - कुवैतने नवीन संविधान अंगिकारले.
- १९६५ - ऱ्होडेशियाच्या (आताचे झिम्बाब्वे) श्वेतवर्णीय लघुमतीतील सरकारने राष्ट्राला स्वतंत्र जाहीर केले.
- १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.
- १९९२ - चर्च ऑफ इंग्लंडने स्त्रीयांना पादरी होण्याची मुभा दिली.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००० - ऑस्ट्रियातील कॅप्रन गावातील केबलकारला लागलेल्या आगीत १५५ स्कीयर व स्नो-बोर्डर्सचा मृत्यू.
- २००४ - यासर अराफातच्या मृत्यूनंतर महमूद अब्बास पी.एल.ओ.च्या नेतेपदी.
जन्मसंपादन करा
- १०५० - हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
- ११५४ - सांचो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- ११५५ - आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
- १७४८ - कार्लोस चौथा, स्पेनचा राजा.
- १८६९ - व्हिकटर इम्मॅन्युएल तिसरा, इटलीचा राजा.
- १८७८ स्टॅनली स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - गुस्ताफ सहावा एडॉल्फ, स्वीडनचा राजा.
- १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२८ ट्रेव्हर मील, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ रॉय फ्रेडरिक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - डॅनियेल ओर्तेगा, निकाराग्वाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६४ - कॅलिस्टा फ्लॉकहार्ट, अमेरिकन अभिनेत्री.
- १९६७ सोहेल फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ मायकेल ओवेन्स, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - लिओनार्डो डिकॅप्रियो, अमेरिकन अभिनेता.
- १९७४ - वजातुल्लाह वस्ती, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७७ बेन होलियोके, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ५३७ - पोप सिल्व्हेरियस.
- १८८० - नेड केली, ऑस्ट्रेलियन दरोडेखोर.
- १९१७ - लिलिउओकलानी, हवाईची राणी.
- १९१८ - जॉर्ज लॉरेंस प्राइस, पहिल्या महायुद्धाचा शेवटचा बळी.
- २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- स्वातंत्र्य दिन - पोलंड, ॲंगोला.
- शस्त्रसंधी दिन - फ्रांस, बेल्जियम.
- सैनिक दिन - अमेरिका.
- स्मृती दिन - युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)