वॉरेन हार्डिंग

अमेरिकन राजकारणी
(वॉरेन जी. हार्डिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉरेन जी. हार्डिंग (मराठी लेखनभेद: वॉरन जी. हार्डिंग; इंग्लिश: Warren Gamaliel Harding) (२ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात ओहायोचा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर इ.स. १९१५ ते इ.स. १९२१ या कालखंडात याने अमेरिकेची सेनेट सभागृहात ओहायोचो प्रतिनिधित्व केले. इ.स. १८९९ ते इ.स. १९०३ या काळात हा ओहायो विधिमंडळाच्या संस्थानी सेनेटेचा निर्वाचित सदस्य होता.

वॉरेन हार्डिंग

पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला हार्डिंग रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला व अमेरिकन सेनेटेचे सदस्यत्व चालू असताना अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला तो पहिला व्यक्ती ठरला.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनी व ऑस्ट्रियासोबत अमेरिकेने केलेल्या दोन निरनिराळ्या तहांवर त्याने सही केली. महायुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय तंट्यांची परिस्थिति हाताळण्यासाठी लीग ऑफ नेशन्स स्थापण्यात हार्डिंग प्रशासनाने पुढाकार घेतला.

ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये अलास्क्याहून परतत असताना कॅलिफोर्नियात सान फ्रान्सिस्को येथे हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाला.

बाह्य दुवे

संपादन
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "वॉरेन हार्डिंग: अ रिसोर्स गाइड (वॉरेन हार्डिंग: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)