इटलीचा दुसरा वित्तोरियो इमानुएले
दुसरा वित्तोरियो इमानुएले (आंग्लीकृत नामभेद: दुसरा व्हिक्टर इमॅन्युएल; इटालियन: Vittorio Emmanuele II, Vittorio Emanuele Maria Alberto Eugenio Ferdinando Tommaso, वित्तोरयो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो; इंग्लिश: Victor Emmanuel II ; ) (मार्च १४, इ.स. १८२० – जानेवारी ९, इ.स. १८७८) याने इ.स. १८४९ ते इ.स. १८६१ या काळात पीदमॉंत, सवॉय आणि सार्दिनिया या भागांवर राज्य केले. मार्च १७, इ.स. १८६१ रोजी त्याने संघटित इटलीचा प्रथम सम्राट म्हणून सूत्रे हाती घेतली. इटालियन प्रजेने त्याला 'पितृभूचा पिता' असे बिरुद दिले होते. इ.स. १८७८साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला उंबेर्तो याने इटलीचा सम्राट म्हणून राज्यकारभार हाती घेतला.
दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली | ||
---|---|---|
अधिकारकाळ | सार्दिनिया: २३ मार्च, इ.स. १८४९ - मार्च १७ इ.स. १८६१ इटली: मार्च १७, इ.स. १८६१ - जानेवारी ९ इ.स. १८७८ | |
पूर्ण नाव | वित्तोरियो इमानुएले मारिया अल्बेर्तो युजिनियो फेर्दिनांदो तोम्मासो दि सावियो | |
जन्म | मार्च १४, इ.स. १८२० | |
पलाझ्झो कारिन्यानो, तोरिनो, सार्दिनिया | ||
मृत्यू | जानेवारी ९, इ.स. १८७८ | |
रोम, इटली | ||
पूर्वाधिकारी | चार्ल्स अल्बर्ट | |
उत्तराधिकारी | पहिला उंबेर्तो | |
वडील | चार्ल्स अल्बर्ट | |
आई | मारिया तेरेसा, ऑस्ट्रिया | |
पत्नी | अॅडलेड, ऑस्ट्रिया | |
इतर पत्नी | रोझा वर्चेयाना | |
संतती | राजकुमारी मारिया क्लोतिल्द, इटलीचा सम्राट पहिला उंबेर्तो, स्पेनाचा सम्राट पहिला अमेदेओ, पोर्तुगालाची सम्राज्ञी मारिया पिया | |
राजघराणे | सवॉयाचे राजघराणे |
जीवन
संपादनसार्दिनियाचा सम्राट चार्ल्स अल्बर्ट आणि ऑस्ट्रियाची मारिया तेरेसा या दांपत्याच्या पोटी व्हिक्टर इमॅन्युएलाचा जन्म झाला. तो चार्ल्स अल्बर्टाचा थोरला मुलगा होता. तरुणपणीची काही वर्षे त्याने फ्लोरेन्सात व्यतीत केली. राजकारण, युद्धशास्त्र व खेळ या क्षेत्रांत त्याला सुरुवातीपासूनच रुची होती. इ.स. १८४२ साली त्याने आपली मावसबहीण अॅडलेड हिच्याशी विवाह केला. सार्दिनियाचे राजेपद त्याच्याकडे येण्याआधी त्याला 'सवॉयाचा ड्यूक' म्हणून अभिधान दिले होते.
पहिल्या इटालियन स्वातंत्र्ययुद्धात तो आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली पास्त्रेंगो, सांता लुसिया, गॉइतो, कस्तोझा येथे आघाडीवर लढला.
नोवारा येथे ऑस्ट्रियनांकडून अपमानास्पद हार पत्करून त्याच्या वडिलांनी राज्यत्याग केल्यावर इ.स. १८४९ साली तो पीदमॉंताचा राजा झाला.