कृष्ण

हिंदू धर्मातील विष्णूचा एक अवतार
(भगवान कृष्ण या पानावरून पुनर्निर्देशित)

कृष्ण[१] हा हिंदू धर्मातील एक देव आहे. विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्ण हा संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचा देव असून [२] [३] तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो. [४] हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात, जो ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो. [५] [६]

श्री कृष्ण

सिंगापूरच्या श्री मारिमान मंदिरामधील कृष्णाची प्रतिमा
कन्नड ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ.
निवासस्थान द्वारिका, गुजरात,गोलोक, वृंदावन, गोकुळ ,मथुरा, वैकुंठ.
शस्त्र सुदर्शन चक्र
वडील वसुदेव
आई देवकी (जन्मदात्री), यशोदा (पालन पोषण)
पत्नी रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा. ..(एकूण १६१०८)
अपत्ये ८०.
अन्य नावे/ नामांतरे वासुदेव, वासुदेवनंदन, गोपाल, नंदलाल, माखनचोर, शाम, मुरारी, पार्थसारथी, मोहन, किशन, गोविंदा, हरी
या देवतेचे अवतार विठ्ठल
या अवताराची मुख्य देवता विष्णू
मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
नामोल्लेख महाभारत, भगवद्गीता.
तीर्थक्षेत्रे मथुरा, वृंदावन, द्वारिका
कृष्णजन्म. चित्रकार: राजा रविवर्मा, १८९०. चित्राचे ठिकाण: महाराजा फतेह सिंह संग्रहालय, वडोदरा

कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.

कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यतः कृष्णलीला असे शीर्षक दिले जाते. तो महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे आणि अनेक हिंदू तात्विक, धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. [७] विविध दृष्टीकोनातून त्याला चित्रित करतात: एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि सर्वोच्च वैश्विक अस्तित्व म्हणून. [८] त्याची प्रतिमा अनेक दंतकथा प्रतिबिंबित करते आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवते, जसे की लोणी खाणारे तान्हे बाळ, बासरी वाजवणारा तरुण मुलगा, राधासोबतचा किंवा स्त्री भक्तांनी वेढलेला तरुण; किंवा अर्जुनाला सल्ला देणारा सारथी. [९]

यशोदा आणि बाळकृष्ण. चित्रकार: राजा रविवर्मा, १९०१. चित्राचे ठिकाण: नॅशनल आर्ट गॅलरी, चेन्नई

कृष्णाचे नाव आणि समानार्थी शब्द इ.स.पूर्व १ ल्या शतकातील साहित्य आणि पंथात सापडतात. [१०] कृष्णधर्मासारख्या काही उप-परंपरेत, कृष्णाची स्वयं भगवान (सर्वोच्च देव) म्हणून पूजा केली जाते. या उप-परंपरा मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीच्या संदर्भात उद्भवल्या. [११] [१२] कृष्ण-संबंधित साहित्याने भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, ओडिसी आणि मणिपुरी नृत्य यांसारख्या असंख्य कलाकृतींना प्रेरणा दिली आहे. [१३] [१४] तो संपूर्ण हिंदू धर्मात पूजला जाणारा देव आहे, परंतु तो विशेषतः उत्तर प्रदेशातील वृंदावन, [१५] द्वारका आणि गुजरातमधील जुनागढ ; ओडिशातील जगन्नाथ, पश्चिम बंगालमधील मायापूर ; [११] [१६] [१७] महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठलाच्या रूपात, राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी म्हणून, [११] [१८] कर्नाटकातील उडुपी कृष्णा, [१३] तमिळनाडूमध्ये पार्थसारथी आणि केरळमधील अरनमुला येथील गुरुवायूरमध्ये गुरुवायूरप्पन म्हणून प्रसिद्ध आहे. [१९]

१९६० पासून मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (ISKCON) च्या कार्यामुळे कृष्णाची उपासना पाश्चात्य जग आणि आफ्रिकेतही पसरली आहे. [२०]

श्रीकृष्ण जन्म

संपादन

'श्रावण महिन्याच्या कृष्ण[२१] पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो.[२२]महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.

कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.[२३]

 
बाळकृष्णाला दागिने घालताना यशोदा, चित्रकार: राजा रविवर्मा. चित्राचे ठिकाण: हुजूर महाडी पॅलेस, तंजावर, तमिळनाडू

इतिहास

संपादन
 
मुरलीधर कृष्णाचे चोळकालीन शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)

कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" येते.[२४] कृष्ण हे नाव "केशवनामांत" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापरयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. -३२२८ ला झाला. कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यतः कृष्ण लीला असे म्हटले जाते. तो महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे. अनेक हिंदू तात्विक, धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे.[२५] यामध्ये त्याला विविध दृष्टीकोनांतून चित्रित केले गेले आहे: एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि वैश्विक सर्वोच्च अस्तित्व. [२६] कृष्णाची विविध रूपे अनेक दंतकथांमधून प्रतिबिंबित होतात आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवतात, जसे की लोणी खाणारे तान्हे बाळ, बासरी वाजवणारा तरुण मुलगा, राधासोबतचा किंवा स्त्री भक्तांनी वेढलेला तरुण मुलगा किंवा अर्जुनाला सल्ले देणारा मित्र आणि सारथी. [२७]

कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेसत्तवीस वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.

कुटुंब

संपादन

कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा.[२८] सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, रुक्मिणी, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या. शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.

 • शिक्षण

श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.[२९]

ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृतीपुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. ब्रह्मा वैवर्त पुराण आणि गर्ग संहिता नमूद करतात की कृष्णाने वृंदावनाजवळील भांडिरवन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते.

कृष्णाची संबंधित विविध संकल्पना/प्रतीके

संपादन

कृष्णाला फुलामध्ये पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला ही त्याच्या आवडीची आहे.[३०] प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. कृष्ण हा उत्तम (रथाचा) सारथी होता.

शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.[३१] त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.

कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्याला त्याचा पिता नंद याने दिली होती.


श्रीकृष्णाची मुले (एकूण ८०)

संपादन
 • श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले (एकूण १०) : प्रद्युम्न (थोरला), चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारु, आणि चारु.
 • श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले (एकूण १०) : भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु
 • श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले (एकूण १०) : सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु
 • श्रीकृष्ण आणि नग्नजिती ऊर्फ सत्याची मुले (एकूण १०) : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती
 • श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले (एकूण १०) : श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक
 • श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले (एकूण १०) : प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित
 • श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले (एकूण १०) : वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि
 • श्रीकृष्ण आणि भद्रा ऊर्फ शैब्याची मुले (एकूण १०) : संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक.

श्रीकृष्ण आणि त्यांच्या वंशजांची कारकीर्द

संपादन
 • कृष्ण (इ.स.पू. २५८२ ते इ.स.पू. २४५७)
 • प्रद्युम्न - रुक्मिणीचा मुलगा, (इ.स.पू. २४५७ ते इ.स.पू. २४४२)
 • अनिरुद्ध - बाणासुराचा जावई, (इ.स.पू. २४४२ ते इ.स.पू. २४१४)
 • वज्रनाभ (इ.स.पू. २४१४ ते इ.स.पू. २३३९)
 • प्रतिबाहू (इ.स.पू. २३३९ ते इ.स.पू. २२६८)
 • सुबाहू (इ.स.पू. २२६८ ते इ.स.पू. २२२१)
 • शांतसेन (इ.स.पू. २२२१ ते इ.स.पू. २१६९)
 • सत्यसेन (इ.स.पू. २१६९ ते इ.स.पू. २०९२)
 • श्रुतसेन (इ.स.पू. २०९२ ते इ.स.पू. २०७१)
 • गोविंदभद्र (इ.स.पू. २०७१ ते इ.स.पू. २००९)
 • सूर्यभद्र (इ.स.पू. २००९ ते इ.स.पू. १९५१)
 • शांतिवाहन (इ.स.पू. १९५१ ते इ.स.पू. १८८२)
 • सद्विजय (इ.स.पू. १८८२ ते इ.स.पू. १८३७)
 • विश्वराह (इ.स.पू. १८३७ ते इ.स.पू. १७७७)
 • क्षेमराह/खेंगार (इ.स.पू. १७७७ ते इ.स.पू. १७३२)
 • हरिराज (इ.स.पू. १७३२ ते इ.स.पू. १६७२)
 • सोम (इ.स.पू. १६७२ ते इ.स.पू. १६२८)
 
पूजेचे ताम्हन

भगवद्‌गीता

संपादन
मुख्य लेख: भगवद्गीता

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली.[३२] यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.[३३]

त्यासाठी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा कर्मयोगाची महती सांगणारा ग्रंथ लिहिला.

गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.[३४]

श्रीकृष्णांच्या जीवनातून शिकण्यासारखी काही वाक्य

संपादन
 1. स्वतःला विसरून साधलेला कोणताही कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते!
 2. कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन.
 3. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन.
 4. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं - निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण.
 5. स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम.
 6. ज्याला अंतरंग कळलं-त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं.
 7. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो - कर्तव्याच्या पालनासाठी.
 8. वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत.
 9. वाढ म्हणजे आकाराची-बाहेरची-शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी.
 10. "कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं."
 11. "मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते."
 12. गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे.
 13. "अहंकार, मग तो सत्ता संपत्ती, सौन्दर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही."
 14. सर्वांहून ज्ञानाचा-अद्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट.

निर्वाण

संपादन

महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला.

उपास्य कृष्ण

संपादन

कृष्णाचे नाव आणि समानार्थी शब्द हे इ.स.पूर्व १ ल्या शतकातील साहित्य आणि पंथापासून सापडते. [३५] काही उप-परंपरांमध्ये कृष्णाची स्वयं भगवान (सर्वोच्च देव) म्हणून उपासना केली जाते आणि काहीवेळा याला कृष्णवाद म्हटले जाते. या उप-परंपरा मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीपासून सुरू झाल्या. [११] [३६] कृष्णाशी संबंधित साहित्याने भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, ओडिसी आणि मणिपुरी नृत्य यासारख्या असंख्य कलाकृतींना प्रेरणा दिली आहे. [१३] [३७]

कृष्ण हा सर्व हिंदू लोकांद्वारे मानला जाणारा देव आहे, परंतु तो काही ठिकाणी विशेषतः पूज्य आहे; यामध्ये पुढील स्थळांचा समावेश होतो: उत्तर प्रदेशातील वृंदावन आणि द्वारका;[१५] गुजरातमधील जुनागढ ; ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ, पश्चिम बंगालमधील मायापूर ; [११] [१६] [३८] महाराष्ट्रातील विठोबाच्या रूपात पंढरपूर येथे, राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी, [११] [३९] कर्नाटकातील उडुपी कृष्णा, [१३] तमिळनाडूमधील पार्थसारथी, केरळमधील अरनमुला आणि पार्थसारथी, केरळच्याच गुरुवायूरमध्ये गुरुवायूरप्पन म्हणून. [४०]

भागवत पुराणाने कृष्णाला विष्णूस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.

इतर कृष्ण

संपादन

कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचे नावही होते. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. अध्यात्मात कृष्णाची २४ नावे आहेत.

पुस्तके

संपादन

कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :

साहित्यात, चित्रपटांत, नाटकांत, दूरचित्रवाणीवरील मालिकांत श्रीकृष्ण

संपादन

श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-

 • कृष्ण (कानडी चित्रपट) (इसवी सन २००७) (दिग्दर्शक : एम.डी. श्रीधर)
 • कृष्ण (मराठी दूरचित्रवाणी मालिका १९९३-९६; कृष्णाच्या भूमिकेत स्वप्नील जोशी, वय १५ वर्षे)
 • कृष्ण (रामानंद सागर यांची हिंदी दूरचित्रवाणी मालिका, १९९०)
 • गोपाळ कृष्ण (मराठी चित्रपट) (१९२९) भूमिका : कमलादेवी, अनंत आपटे, साखरीबाई, जी.आर. माने, वगैरे; दिग्दर्शक : व्ही. शांताराम)
 • गोपाळकृष्ण/गोपाल कृष्ण (मराठी/हिंदी चित्रपट) (इसवी सन १९३८) प्रमुख भूमिका : शांता आपटे, परशुराम आणि कृष्णाच्या भूमिकेत राम मराठे; दिग्दर्शक : विष्णूपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल; संगीत : मास्टर कृष्णराव)
 • गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९६५) भूमिका : प्रकाश, जयश्री गडकर, डी.के सप्रू, वगैरे...दिग्दर्शक : डी. रामन)
 • गोपाल कृष्ण (हिंदी चित्रपट) (१९७९). प्रमुख भूमिका : झरीना वहाब, मनहर देसाई....मास्टर संदीप (छोटा कृष्ण), आणि मोठ्या कृष्णाच्या भूमिकेत सचिन. दिग्दर्शक : विजय शर्मा)
 • द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, २०११; कृष्णाच्या भूमिकेत - विशाल कडवाई) (विशाल कडवाईची ही पाचवी कृष्णाची भूमिका) हा कृष्णही अगदी अस्सल वाटतो.
 • परमावतार श्रीकृष्ण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका २०१७पासून पुढे; कृष्णाच्या भूमिकेत संदीप साहिर)
 • महाभारत (बी.आर. चोपरानिर्मित हिंदी दूरचित्रवाणी मालिका इसवी सन १९८८-९०; कृष्णाच्या भूमिकेत - नितीश भारद्वाज). आजपर्यंतच्या सर्व कृष्णांत सर्वश्रेष्ठ अभिनेता!)
 • महाभारत (२०१३-१४; कृष्णाच्या भूमिकेत सौरभराज जैन)
 • राधाकृष्ण (हिंदी-इंग्रजी दूरचित्रवाणी मालिका) (२०१८ पासून पुढे ३० भाग) प्रमुख भूमिका : सुमेध मुद्गलकर, मलिका सिंग; दिग्दर्शक : सिद्धनाथकुमार तिवारी)
 • श्रीमद्‌भागवत्‌ महापुराण (हिंदी दूरचित्रवाणी मालिका, जून २०१९ पासून पुढे), कृष्णाच्या भूमिकेत रजनीश दुग्गल)
 • संगीत सौभद्र (मराठी नाटक, सन १८८२, कृष्णाच्या भूमिकेत छोटा गंधर्व)


(अपूर्ण)

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
 1. ^ "Krishna".
 2. ^ Ben-Ami Scharfstein (1993). Ineffability: The Failure of Words in Philosophy and Religion. State University of New York Press. p. 166. ISBN 978-0-7914-1347-0.
 3. ^ Bryant & Ekstrand 2004.
 4. ^ Freda Matchett (2001). Krishna, Lord Or Avatara?. Psychology Press. p. 199. ISBN 978-0-7007-1281-6.
 5. ^ "Krishna". World History Encyclopedia.
 6. ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: A-M. The Rosen Publishing Group. pp. 314–315. ISBN 978-0-8239-3179-8.
 7. ^ Richard Thompson, Ph.D. (December 1994). "Reflections on the Relation Between Religion and Modern Rationalism". 4 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 April 2008 रोजी पाहिले.
 8. ^ Mahony, W. K. (1987). "Perspectives on Krsna's Various Personalities". History of Religions. 26 (3): 333–335. doi:10.1086/463085. JSTOR 1062381.
 9. ^ Knott 2000, pp. 15, 36, 56
 10. ^ Hein, Norvin (1986). "A Revolution in : The Cult of Gopāla". History of Religions. 25 (4): 296–317. doi:10.1086/463051. JSTOR 1062622.
 11. ^ a b c d e f Hardy 1987.
 12. ^ Ravi Gupta and Kenneth Valpey (2013), The Bhagavata Purana, Columbia University Press, आयएसबीएन 978-0231149990, pp. 185–200
 13. ^ a b c d Bryant 2007.
 14. ^ ML Varadpande (1987), History of Indian Theatre, Vol 1, Abhinav, आयएसबीएन 978-8170172215, pp. 98–99
 15. ^ a b Hawley 2020.
 16. ^ a b Miśra 2005.
 17. ^ J. Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-Clio. pp. 330–331. ISBN 978-1-59884-205-0.
 18. ^ Cynthia Packert (2010). The Art of Loving Krishna: Ornamentation and Devotion. Indiana University Press. pp. 5, 70–71, 181–187. ISBN 978-0-253-22198-8.
 19. ^ Lavanya Vemsani (2016). Krishna in History, Thought, and Culture. ABC-CLIO. pp. 112–113. ISBN 978-1-61069-211-3.
 20. ^ Selengut, Charles (1996). "Charisma and Religious Innovation: Prabhupada and the Founding of ISKCON". ISKCON Communications Journal. 4 (2). 10 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
 21. ^ "श्री कृष्ण भजन" (हिंदी भाषेत). 2024-02-05. 2023-12-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-02-15 रोजी पाहिले.
 22. ^ Shandilya, Rajeshwari (2009-01-01). Bharatiya Parva Evam Tyohar (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-617-5.
 23. ^ "Janmashtami 2022: जन्माष्टमी आज, श्रीकृष्ण पूजन के बाद जरूर पढ़ें ये व्रत कथा | janmashtami 2022: Read this Janmashtami Vrat Katha during Puja". Patrika News (हिंदी भाषेत). 2022-08-18. 2022-08-19 रोजी पाहिले.
 24. ^ Vishnu Sahasranama (इंग्रजी भाषेत). SRG Publishers. ISBN 978-81-902827-2-7.
 25. ^ Richard Thompson, Ph.D. (डिसेंबर 1994). "Reflections on the Relation Between Religion and Modern Rationalism". 4 जानेवारी 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 एप्रिल 2008 रोजी पाहिले.
 26. ^ Mahony, W. K. (1987). "Perspectives on Krsna's Various Personalities". History of Religions. 26 (3): 333–335. doi:10.1086/463085. JSTOR 1062381.
 27. ^ Knott 2000
 28. ^ Sāvanta, Śivājī (2009). Yugandhar (हिंदी भाषेत). Bharatiya Gyanpith. ISBN 978-81-263-1718-9.
 29. ^ Khole, Gajānana Śã (1992). Om̐kāra Gaṇeśa, Purāṇokta 21 Gaṇapatī, pūjā-utsava, upāsanā, ārādhanā. Indrāyaṇī Sāhitya.
 30. ^ Meera Kakavya (हिंदी भाषेत). Vani Prakashan.
 31. ^ Shri Vishnu Aur Unke Avtar (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 978-81-7055-823-1.
 32. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
 33. ^ Ranganathananda, Swami (2020-10-16). भगवद्गीतेचा सार्वजनीन संदेश/Bhagawadgitecha Sarvajanin Sandesh - 1 (इंग्रजी भाषेत). Ramakrishna Math, Nagpur. ISBN 978-93-5318-113-0.
 34. ^ Yamini, Rachna Bhola (2021-01-19). Lokmanya Bal Gangadhar Tilak (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5048-416-6.
 35. ^ Hein, Norvin (1986). "A Revolution in : The Cult of Gopāla". History of Religions. 25 (4): 296–317. doi:10.1086/463051. JSTOR 1062622.
 36. ^ Ravi Gupta and Kenneth Valpey (2013), The Bhagavata Purana, Columbia University Press, आयएसबीएन 978-0231149990, pp. 185–200
 37. ^ ML Varadpande (1987), History of Indian Theatre, Vol 1, Abhinav, आयएसबीएन 978-8170172215, pp. 98–99
 38. ^ J. Gordon Melton (2011). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations. ABC-Clio. pp. 330–331. ISBN 978-1-59884-205-0.
 39. ^ Cynthia Packert (2010). The Art of Loving Krishna: Ornamentation and Devotion. Indiana University Press. pp. 5, 70–71, 181–187. ISBN 978-0-253-22198-8.
 40. ^ Lavanya Vemsani (2016). Krishna in History, Thought, and Culture. ABC-CLIO. pp. 112–113. ISBN 978-1-61069-211-3.