शंख हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण)पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो.

समुद्र मंथनातून पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून 'शंख'तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे.[]विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले.·[]        

शंखाची निर्मिती

संपादन

शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख  हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. []

महाभारतातील शंखांची नावे[][]

संपादन

महाभारतात युद्धावेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा खूपच मोठा असा शंख होता. जो तो वाजवायचा. तर युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची.

कोणाचा शंख शंखाचे नाव
श्रीकृष्ण पांचजन्य
अर्जुन देवदत्त
भीम पौंड्र
युधिष्ठिर अनंतविजय
नकुल सुघोष
सहदेव मणिपुष्पक


*वास्तुरहस्य :

शंखमाहात्म्य

संपादन

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा महत्त्वाची मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे.

शंख ठेवण्याकरिता जे (बहुधा कासवाच्या आकाराचे) आसन असते त्याला अडणी म्हणतात.

शंखाची उत्पत्ती

संपादन

त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णूना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते॥
अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.

शंखाचे एकूण तीन भाग पडतात. (१) शंखाची पन्हळ, (२) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र, (३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.

ब्रह्मवैवर्त पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा आहे- शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हणले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करावयास सुरुवात केली.

देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी १४ रत्‍ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे.

देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते. पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.

शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात, अशी धार्मिक कल्पना आहे. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे ‘शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल?’ असे एक सुभाषित आहे.

बंगाली लग्नात शंख वाजवल्याशिवाय लग्नाची सुरुवात होत नाही.

शंखाचे प्रकार व जाती

संपादन

शंखाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.

ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वतःकडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख.

याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.

दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा. दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात. शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.

द्विजाती भेदेनस पुनस्तु चतुर्विध:। श्‍वेतो रक्त: पीतकृष्णौ ब्राह्मक्षत्रादिवर्णज:। शंखांच्या जातिभेदाप्रमाणेच त्यांचे गणेश शंख, विष्णू शंख, देवी शंख व मोती शंख असेही भेद पडतात.

अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख आंतरिक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे. समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे.

शंख पूजा कशी करावी (धार्मिक समजुती)

संपादन

कासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो ? कासवाचे मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा ?

शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफूल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

शिवपूजेत शंखाचे महत्त्व नसणे :

‘शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही, तसेच शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल, तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये.’

शास्त्र : शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.

शंखनाद

संपादन

आरतीच्या वेळी शंखनाद विहित असणे :

‘देवळात महादेवाची पूजा करतांना शंखपूजा उक्त नाही. मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.’

शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही. .................................................................................................................. दक्षिणावर्ती शंख :

तंत्र क्रियांमध्ये शंख उपयोगात आणला जातो. तंत्र शास्त्रामध्ये दक्षिणावर्ती शंखाला विशेष महत्त्व आहे. या शंखाची विधिव्रत पूजा करून घरामध्ये स्थापना केल्यास विविध प्रकारच्या बाधा नष्ट होतात आणि धनाची कमतरता भासत नाही. दक्षिणावर्ती शंखाचे अनेक लाभ आहेत परंतु हा शंख घरामध्ये ठेवण्यापूर्वी याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे.

दक्षिणावर्ती शंखाचे शुद्धीकरण :

लाल वस्त्रावर दक्षिणावर्ती शंख ठेवून त्यामध्ये गंगाजल (गंगेचे पाणी) भरावे आणि आसनावर बसून खालील मंत्राचा जप करावा... ऊँ श्री लक्ष्मी सहोदराय नम: या मंत्राचा कमीतकमी पाच माळ जप करावा आणि त्यानंतर शंख देवघरात ठेवावा.

दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.

यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात. दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

शंख पूजाचे फळ

संपादन

साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणाऱ्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.

पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजनाने आपल्या देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेऱ्यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.

‘ॐ सर्वतोभद्राय सर्वाभीष्टफलप्रदाय सर्वारिष्ट-दुष्ट-कष्ट-विषारथ कामितार्थप्रदाय शंखाय स्वाधिष्ठायकाय भास्करा क्ली श्रीं ?? क्रौं नम: स्वाहा।’ या प्रतिष्ठा मंत्राने शंखाची स्थापना करून पुढीलपैकी एका मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा ॐ श्री लक्ष्मीसहोदराय नम:।, ॐ श्रीं पयोनिधी जाताय नम:।, ॐ श्रीं दक्षिणावर्तशंखाय नम:। शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे.

प्रकार

संपादन

उजवा ( दाक्षिणा वर्त) शंख

संपादन

डावा (वामावर्त )शंख

संपादन

पूजेचा शंख

संपादन

औषधी उपयोग

संपादन

शंख भस्म,

संदर्भ

संपादन
  1. ^ "समुद्र मंथन में से निकले थे ये 14 रत्न, जानिये इन रत्नों के पीछे छिपे अर्थ - Live India". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2019-09-09 रोजी पाहिले.
  2. ^ "जानें समुद्र मंथन से प्राप्त चौदह रत्न कौन से थे". Jagranjosh.com. 2019-09-10 रोजी पाहिले.
  3. ^ "शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?". www.timesnowmarathi.com. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-10 रोजी पाहिले.
  4. ^ श्रीमद्भगवत्गीता अध्याय १ श्लोक १५ व १६
  5. ^ "शंखाला का मानलं जातं देवी लक्ष्मीचा छोटा भाऊ?". www.timesnowmarathi.com. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-10 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन