सहदेव
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सहदेव महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतीय युद्धात सहदेवाने शकुनीस मारले. हातकु्र्हाड हे त्याचे युद्धाचे प्रमुख हत्यार होते. महाभारतातील संदर्भांनुसार सहदेवाला कोणतीही वाईट गोष्ट होण्याआधी त्या गोष्टीचा पूर्वाभास होत असे असे म्हणले आहे.
हा लेख महाभारतातील व्यक्तीरेखा सहदेव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सहदेव (निःसंदिग्धीकरण).