पांडव हे हस्तिनापूरचा राजा पंडू यांचे पुत्र होते. त्यांची नावे- युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. पांडव महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.

द्रौपदी आणि पांडव. सिंहासनावर द्रौपदी आणि युधिष्ठीर, खाली भीम व अर्जुन आणि पाठीमागे नकुल व सहदेव
देवगड, उत्तर प्रदेश, भारत येथील दशावतार मंदिरातील पांडवांचे शिल्प. मध्यभागी युधिष्ठिर, डावीकडे भीम व अर्जुन, उजवीकडे नकुल व सहदेव. अगदी उजवीकडे पाच पांडवांची पत्‍नी द्रौपदी.

पांडवांचा जन्म

संपादन

कुंतीमाद्री ह्या पंडूच्या दोन पत्‍नी होत्या. पंडू हा पंडुरोगाने पीडित असल्याने त्याच्यापासून मुले होणे उचित नव्हते. त्यामुळे, पंडूबरोबर वनवासात असताना दुर्वास ऋषींनी कुंतीला दिलेल्या वरदानाचा वापर करून कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन अशी तीन मुले झाली. त्यानंतर माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव ही जुळी मुले झाली.