नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीमअर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.अश्वपालनात व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युद्धाचे प्रमुख अस्त्र होते.

सिंहासनस्थ युधिष्ठिर व द्रौपदी यांच्याभोवती जमलेले अन्य पांडव; मागे उभे असलेले नकुल व सहदेव