श्रीलक्ष्मी नारायण

हिंदू देवी देवता

श्रीलक्ष्मीनारायण वा लक्ष्मी-नारायण (संस्कृत: लक्ष्मी-नारायण, IAST: Lakṣmīnārāyaṇa) हा हिंदू देवता, नारायण(विष्णू)आणि त्यांची पत्नी भगवती देवी लक्ष्मी यांच्या जोडपे रूपात आहे.श्रीवैष्णवपंथातील आराध्य देवता आहे. नारायण(विष्णू) विश्वाचे पालनकर्ता ईश्वर आहे.वैकुंठामध्ये शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र धारण करणारा नारायण बाजूला लक्ष्मी, सौंदर्य देवी दर्शविली गेली आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी देवी ही ऐश्वर्य, प्रकृति ,शांती आणि समृद्धीची, देवी आहे. तिला कमळ,गुलाबाचे फूल प्रिय आहे. एक हातात कमळाचे फूल आहे.दुसरा हातात अभयमुद्रा आहेत.लाल,गुलबी रंगाची वस्त्र(साडी) परिधान केलेले असते.

श्रीलक्ष्मी नारायण

लक्ष्मीनारायण देव चे चित्र

समृद्धी,संपत्ती,विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता

मराठी लक्ष्मीनारायण
संस्कृत लक्ष्मीनारायणः
कन्नड ಲಕ್ಷ್ಮಿ ನಾರಾಯಣ್
तमिळ லட்சுமி நாராயண்
निवासस्थान वैकुंठ, क्षीरसागर
लोक वैकुंठ,विष्णूलोक
वाहन घुबड गरुड कमळ
शस्त्र सुदर्शन चक्र,शंख,कौमोदकी गदा
पती विष्णू
पत्नी लक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरे माधवी ,पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,माधवी (श्रीसूक्त श्लोक)

 परमात्मा  श्रीमान्  केशवः    पुरुषोत्तमः  माधवः   सत्यः  चतुर्भुजः सहस्राक्षः नारायणः  पद्मनाभः सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान्  श्रीगर्भः  परमेश्वरः अनन्तात्मा  गोविन्दः चक्रगदाधरः  कृष्णः  श्रीशः  श्रीनिधिः  श्रीधरः केशिहा   हरिः  अनन्तः  ब्राह्मणप्रियः वासुदेवः  भक्तवत्सलः  गदाग्रजः चतुर्बाहुः चतुरात्मा सुन्दरः रत्ननाभः  भयनाशनः सात्त्विकः  सत्यः अनन्तः  चक्री  पुण्यः   रक्षणः अनन्तश्रीः  भयापहः  प्राणदः  देवकीनन्दनः   नन्दकी शार्ङ्गधन्वा गदाधरः( विष्णू सहस्रनाम )

या देवतेचे अवतार सीता, पद्मा, राधा, रुक्मिणी, भूदेवी,श्रीदेवी(लक्ष्मी)

दशावतार (‌विष्णू)

या अवताराची मुख्य देवता विष्णू लक्ष्मी
मंत्र नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णू: प्रचोदयात्॥

श्रीलक्ष्मी नारायणाभ्यां नमो नमः श्री महालक्ष्मै नमः महादेव्यै च विद्महे विष्णू पत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्

नामोल्लेख विष्णू पुराण,श्रीलक्ष्मीनारायणसंहिता ,लक्ष्मी नारायणा हृदय स्तोत्रम
तीर्थक्षेत्रे श्रीलक्ष्मी नारायण बिड़ला मंदिर ,नवी दिल्ली.

श्रीलक्ष्मीनारायण हे परमेश्वर -परमेश्वरी संयुक्त रूपात आहे त्या जोडीला 'लक्ष्मी नारायण' वा , ' श्रीलक्ष्मीनारायण ' म्हणतात, विष्णूला नारायण म्हणूनही ओळखले जाते, त्याच्या पत्नी लक्ष्मीबरोबर वैकुंठ म्हणजे विष्णूलोकात क्षीरमहासागरात अनंतशेषानागावर लक्ष्मीसह निवास करतात. []

.[]

लक्ष्मी नारायण बिड़ला मंदिर ,नवी दिल्ली
श्रीविष्णू क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह

लक्ष्मीनारायणातील खालीलदिलेला चित्रात लक्ष्मी नारायणच्या कमलशरणाजवळ असते, जो क्षीरमहासागर शेषानागावर तरंगत आहेत. 

जय-विजय हे दोघे वैकुंठाच्या द्वाराचे रक्षक आहे.

निवासस्थान आणि प्रतीक

संपादन

वैकुंठ हे वैकुंठ धाम (IAST: Vaikuṇṭha ,संस्कृत: वैकुण्ठ ) श्रीलक्ष्मीनारायणाचे वास्तविक निवासस्थान आहे.सुखदायक दिव्य नैसर्गिक स्वर्गासारखे निवासस्थान आहे ,सर्वोत्तम निवासस्थान मानले जाते.ज्या स्वर्गीय जगामध्ये पालनकर्ता श्रीविष्णू क्षीरमहासागर शेषनागावर लक्ष्मीसह निवास करतात.

शांति, प्रेम,पुण्य,शुद्धता,संयम, दान, परिश्रम, धैर्य, दया आणि नम्रता व आनंदाचे स्थान आहे.

पुण्याद्वारे माणसाला या जगात स्थान मिळते. जो येथे पोचतो तो गर्भात परत येणार नाही कारण त्याला तारण प्राप्त झाले आहे.अध्यात्माच्या दृष्टीने वैकुंठलोक मन वा चेतनाची स्थान आहे.

मोक्ष,पुण्य करणारे लोक वैकुंठातच राहतात.एक शाश्वत दैवीय अविनाशी प्रकाशमान जग आहे.सर्व काही फलझाड,फुल,प्राणी,पक्षी,गाय,जलचर, समुद्र अनंत आहे.

भागवत पुराण वा ऋग्वेदः सूक्तं १.२२| अथर्ववेदसंहिता भाग २ मध्ये वर्णन, तद् विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः।[][]

अर्थ आणि नाव
संपादन

वैकुण्ठ शब्दाचा अर्थ जहा कुंठा  न हो , दुःख,निराशा, आळस आणि दारिद्र्य नाहीत.[]

साकेत, गोलोका, परमधाम, परमस्थान, परमपद, परमवायम, सनातन आकाश, सत्त्व-पद, ब्रह्मपूर. नावे आहे.

कलशकुम्भ ,शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र हे श्रीलक्ष्मीनारायणचेच समजले जाते.


व्युत्पत्ती

संपादन

विष्णू म्हणजे सर्व व्यापक

लक्ष्मी म्हणजे लक्षण (सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान् विष्णू सहस्रनाम )

विष्णो: सर्वव्यापकत्वम् : नारायणोपनिषदि

नारायणपरोज्योतिरात्मानारायणः परः ।

नारायणपरं ब्रम्हतत्त्वं नारायणः परः |

नारायण परो ध्याता ध्यानं नारायणः परः ॥४॥     नारायणोपनिषद्

पुराणांत नारायण या शब्दाने जाणला जाणारा जो परमेश्वर हाच सत्य-ज्ञानादि वाक्यप्रतिपादित तत्त्व आहे. तीच सर्वोत्कृष्ट ज्योति आहे. नारायणच परमात्मा आहे. नारायणच परब्रम्हतत्त्व आहे. नारायणच सर्वोत्कृष्ट आहे. तोच ध्याता(वेदान्ताचा अधिकारी), ध्यान(प्रत्यगात्माविषयक वृत्तिविशेष) आणि पाप्यांचा शत्रू आहे अशा नारायणाचे ध्यान करावे. ॥४॥


लक्ष्मी नारायणाचे अवतार

संपादन

दशावतार व श्रीअष्टलक्ष्मी

  1. मत्स्य
  2. कूर्म
  3. वराह
  4. नरसिंह
  5. वामन
  6. परशुराम
  7. श्रीराम
  8. श्रीकृष्ण
  9. बलराम्
  10. कल्की

'लक्ष्मीचे आठ अवताराला 'श्रीअष्टलक्ष्मी' असे म्हणतात.महालक्ष्मीचे आठ रूप आहेत म्हणून नाव प्रसिद्ध आहे.

आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी.

श्लोक आणि ग्रंथ

संपादन
  • विष्णूसहस्रनाम
  • श्रीलक्ष्मीनारायणसंहिता
  • लक्ष्मी नारायणा हृदय स्तोत्रम
  • जय कल्कि जय जगत्पते। पद्मापति जय रमापते।।

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्

वन्दे विष्णूं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ 

  • श्रीविष्णू गायत्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णू: प्रचोदयात्॥
  • श्रीलक्ष्मी गायत्री महालक्ष्मीच विद्महे विष्णूपत्नीच धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥
  • श्रीसुदर्शन चक्र गायत्री सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि । तन्नो चक्रः प्रचोदयात्॥
  • श्रीपाञ्चजन्य शङ्ख गायत्री पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि । तन्नो शङ्खः प्रचोदयात्॥
  • गरुड गायत्री तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुड प्रचोदयात् ॥


भक्ति

संपादन

श्रीवैष्णवसंप्रदाय लक्ष्मी नारायणाला आराध्यदैवत मानणारे संप्रदाय आहे .

वारकरी संप्रदाय पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय

इस्कॉन[]
संपादन

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदू संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम्भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदू मान्यतेनुसार सुमारे ५००० वराहे जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.

 
कृष्ण व्हॅली येथील कृष्ण मंदिर मेलबर्न
 
वैदिक पद्धतीने बांधलेले इको हाऊस यात कमीत कमी ताण निसर्गावर येतो - कृष्ण व्हॅली मेलबर्न जवळ


महामंत्र

संपादन

हरे कृष्ण हरे कृष्ण

कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे


हेच व्यावहारिक पालन करण्यासाठी ISKCONचे काही मूलभूत नियम आहेत.

कोणत्याही प्रकारची नशा नाही. (चहा, कॉफी नाही)

अवैध स्त्री / पुरुष गमन नाही

मांसहार / बायोगिक भक्षण नाही. (कांदा, लसुन नाही)

 
मायापूर येथील राधाकृष्ण मंदिर

जुआ नाही (शेअर बाजारही नाही)

त्यांना तामसिक अन्न सोडून द्या (तामसिक अन्न म्हणून त्यांना ,कांदा लसुन, मांस, मदिरा इत्यापासून दूर राहा)

अनैतिक वर्तणुकीपासून दूर राहा (जुगार, पब, वेश्यालय अशा स्थानांवर बंदी घातलेली आहे)

एक तास शास्त्रीययन (यात गीता आणि भारतीय धर्म-इतिहास संबंधित शास्त्रांचा अभ्यास करणे)

'हरे कृष्णा-हरे कृष्णा' नावाची १६ वेळा माळा जपा.

ते शुद्ध शाकाहार खातात

एकादशी तिथी

संपादन
हिंदू महिना (इंग्रजी) पालक देव शुक्लपक्षातली एकादशी कृष्णपक्षातली एकादशी
चैत्र (मार्च–एप्रिल) विष्णू कामदा एकादशी वरूथिनी एकादशी
वैशाख (एप्रिल–मे) मधुसूदन मोहिनी एकादशी अपरा एकादशी
ज्येष्ठ (मे–जून) त्रिविक्रम निर्जला एकादशी योगिनी एकादशी
आषाढ (जून–जुलै) वामन शयनी एकादशी कामिका एकादशी
श्रावण (जुलै-ऑगस्ट) श्रीधर पुत्रदा एकादशी अजा एकादशी
भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) हृषीकेश की वामन? परिवर्तिनी एकादशी/पद्मा एकादशी इंदिरा एकादशी
आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) पद्मनाभ पाशांकुशा एकादशी रमा एकादशी
कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) दामोदर प्रबोधिनी एकादशी उत्पत्ती एकादशी
मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) केशव मोक्षदा एकादशी सफला एकादशी
पौष (डिसेंबर–जानेवारी) नारायण पुत्रदा एकादशी षट्‌तिला एकादशी
माघ (जानेवारी–फेब्रुवारी) माधव जया एकादशी विजया एकादशी
फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) गोविंद आमलकी एकादशी पापमोचिनी एकादशी
अधिक मास (३ वर्षांतून एकदा) पुरुषोत्तम कमला एकादशी कमला एकादशी


भगवद्‌गीता अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग

संपादन

भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

Whenever there is decay of righteousness, O Bharata,

And there is exaltation of unrighteousness, then I Myself come forth ;

For the protection of the good, for the destruction of evil-doers, 

For the sake of firmly establishing righteousness, I am born from age to age.

सण-उत्सव

संपादन

हिंदू धर्मात दिवाळी(दीपावली) आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी घरांत  प्रदोषकाळी (संध्याकाळी) कुबेर, गणेश व लक्ष्मीचे पूजन श्रीसूक्तपठणही केले जाते .घरामध्ये आणि बाहेर अनेक दीप (दिवा) लावला जाते .काही वैष्णव भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना  करतात.लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक उर्जा असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात.

आश्‍विन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेलाही धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि को-जागरती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते. म्हणूनच या दिवसाला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हणतात.आश्विन पौर्णिमा  किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरमध्ये कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते

कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात. रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलचीपुड, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.

तुळशी विवाह

तुळशी वनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते.

तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.


श्रीलक्ष्मीनारायणचे नाव

संपादन

माधवी ,पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,माधवी (श्रीसूक्त श्लोक),पृथ्वी

 विष्णू परमात्मा  श्रीमान्  केशवः    पुरुषोत्तमः  माधवः   सत्यः  चतुर्भुजः सहस्राक्षः नारायणः  पद्मनाभः सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान्  श्रीगर्भः  परमेश्वरः अनन्तात्मा  गोविन्दः चक्रगदाधरः  कृष्णः  श्रीशः  श्रीनिधिः  श्रीधरः केशिहा   हरिः  अनन्तः  ब्राह्मणप्रियः वासुदेवः  भक्तवत्सलः  गदाग्रजः चतुर्बाहुः चतुरात्मा सुन्दरः रत्ननाभः  भयनाशनः सात्त्विकः  सत्यः अनन्तः  चक्री  पुण्यः   रक्षणः अनन्तश्रीः  भयापहः  प्राणदः  देवकीनन्दनः   नन्दकी शार्ङ्गधन्वा गदाधरः( विष्णू सहस्रनाम )

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "लक्ष्मी-नारायण". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-07-19.
  2. ^ "Lakshmi Narayan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-07-25.
  3. ^ "ऋग्वेदः सूक्तं १.२२ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले.
  4. ^ "पृष्ठम्:अथर्ववेदसंहिता-भागः २.pdf/३७१ - विकिस्रोतः". sa.wikisource.org. 2019-09-04 रोजी पाहिले.
  5. ^ "बैकुण्ठ". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2018-06-28.
  6. ^ "इस्कॉन". विकिपीडिया. 2019-01-17.


दूरदर्शन मालिका

संपादन

श्रीलक्ष्मीनारायण []

लक्ष्मी नारायण - सुख सामर्थ्य संतुलन.[]

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "Colors". www.colorsmarathi.com. 2024-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Lakshmi Narayan – Sukh Samarthya Santulan". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2024-10-24.