जगन्नाथ मंदिर

पुरी येथील जगन्नाथाला समर्पित हिंदू मंदिर, ओडिशा, भारत

जगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली.

जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिर is located in ओडिशा
जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिराचे ओडिशामधील स्थान
चार धाम

बद्रीनाथरामेश्वरम्
द्वारकापुरी
पुरी येथील रथयात्रा

रथयात्रा[]

संपादन

जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते.[]

ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात, अशी यामागील धारणा आहे. पैकी जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी व्यवस्था आहे.[] या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात.[]

चित्रदालन

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Mahapatra, Sarat Chandra (1994). Car Festival of Lord Jagannath, Puri (इंग्रजी भाषेत). Sri Jagannath Research Centre.
  2. ^ "पुरीत आज निघणार जगन्नाथाची रथयात्रा; लाखो भाविकांची गर्दी". लोकसत्ता.
  3. ^ Dwivedi, Dr Bhojraj (2014-10-27). Religious Basis of Hindu Beliefs (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books Pvt Ltd. ISBN 9789351650928.
  4. ^ Kumar, Ramendra (2009). Folk Tales of Orissa (इंग्रजी भाषेत). Children's Book Trust. ISBN 9788189750992.