बिग बॉस मराठी हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे. महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात.

बिग बॉस मराठी
निर्मिती संस्था एंडेमॉल शाईन इंडिया
सूत्रधार महेश मांजरेकर
आवाज रत्नाकर तारदाळकर
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ३९६
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ * सोम-शुक्र रात्री १० वाजता
  • शनि-रवि रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १५ एप्रिल २०१८ – ८ जानेवारी २०२३
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम बिग बॉस मराठी १
बिग बॉस मराठी २
बिग बॉस मराठी ३
बिग बॉस मराठी ४

आढावा

संपादन

स्पर्धक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा परवानगीशिवाय उपयोग करू शकत नाही. ते कोणाबरोबर ही नामांकन प्रक्रियेवर चर्चा करू शकत नाही. दिवसा झोपू शकत नाही. तसेच त्यांना नेहमीच माइक घालणं आणि मराठी भाषेत बोलणं बंधनकारक आहे.

प्रसारण

संपादन

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. दररोजच्या भागांमध्ये मागील दिवसाची मुख्य घटना असते. प्रत्येक शनिवार व रविवारचा भाग मुख्यतः सूत्रधाराद्वारे काढून टाकलेल्या स्पर्धकांच्या मुलाखतीवर केंद्रीत असतो.

बेदखल

संपादन

प्रतिस्पर्धी त्यांच्या घरातील स्पर्धकांद्वारे दर आठवड्याला नामांकित होतात. दर्शक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देतात आणि ज्या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळतात तो स्पर्धक घराबाहेर पडतो.

कार्यक्रम

संपादन
दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
कार्यक्रम नामांकन साप्ताहिक कार्य लक्झरी बजेट कॅप्टनसी मुलाखत बेदखल

स्पर्धक

संपादन
कंपू हंगाम १ हंगाम २ हंगाम ३ हंगाम ४
चित्रपट अभिनेते/अभिनेत्री मेघा धाडे किशोरी शहाणे अक्षय वाघमारे तेजस्विनी लोणारी
पुष्कर जोग आरोह वेलणकर
भूषण कडू अभिजीत केळकर सुरेखा कुडची स्नेहलता वसईकर
राजेश शृंगारपुरे
रेशम टिपणीस नेहा शितोळे विशाल निकम मेघा घाडगे
सई लोकूर
स्मिता गोंदकर दिगंबर नाईक
सुशांत शेलार
विनीत भोंडे मैथिली जावकर आदिश वैद्य
नंदकिशोर चौघुले नीता शेट्टी
दूरदर्शन अभिनेते/अभिनेत्री उषा नाडकर्णी वीणा जगताप विकास पाटील अपूर्वा नेमळेकर
स्नेहा वाघ प्रसाद जवादे
शर्मिष्ठा राऊत विद्याधर जोशी आविष्कार दारव्हेकर यशश्री मसूरकर
जुई गडकरी शिवानी सुर्वे गायत्री दातार निखिल राजेशिर्के
ऋतुजा धर्माधिकारी माधव देवचके मीरा जगन्नाथ अमृता धोंगडे
अमृता देशमुख
अस्ताद काळे रुपाली भोसले सोनाली पाटील किरण माने
अक्षय केळकर
रुचिरा जाधव
गायक त्यागराज खाडिलकर वैशाली माडे उत्कर्ष शिंदे कोणीही नाही
संतोष चौधरी
पत्रकार अनिल थत्ते कोणीही नाही
आचारी कोणीही नाही पराग कान्हेरे कोणीही नाही
राजकारणी अभिजीत बिचुकले तृप्ती देसाई
रिॲलिटी शो स्पर्धक शिव ठाकरे जय दुधाणे समृद्धी जाधव
मीनल शाह योगेश जाधव
डान्सर हीना पांचाळ कोणीही नाही त्रिशुळ मराठे
सुरेखा पुणेकर विकास सावंत
मॉडेल कोणीही नाही रोहित शिंदे
कीर्तनकार कोणीही नाही शिवलीला पाटील कोणीही नाही
विजेते मेघा धाडे शिव ठाकरे विशाल निकम अक्षय केळकर
उपविजेते पुष्कर जोग नेहा शितोळे जय दुधाणे अपूर्वा नेमळेकर

मालिका तपशील

संपादन
हंगाम पहिला भाग शेवटचा भाग सूत्रसंचालक दिवस स्पर्धक राशी विजेता उपविजेता
१४ एप्रिल २०१८ २२ जुलै २०१८ महेश मांजरेकर ९८ १९ २५,००,००० मेघा धाडे पुष्कर जोग
२६ मे २०१९ १ सप्टेंबर २०१९ १७ शिव ठाकरे नेहा शितोळे
१९ सप्टेंबर २०२१ २६ डिसेंबर २०२१ विशाल निकम जय दुधाणे
२ ऑक्टोबर २०२२ ८ जानेवारी २०२३ १९ अक्षय केळकर अपूर्वा नेमळेकर