नेहा शितोळे ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली नेहा हिने सेक्रेड गेम्स मध्ये मिसेस काटेकर यांची भूमिका निभावली होती[१] नंतर २०१९ साली बिग बॉस मराठी २ मध्ये प्रवेश घेतला आणि तिने दुसरा क्रमांक पटकावला.[२]

नेहा शितोळे
जन्म २७ जून
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम
वडील सुनिल शितोळे
आई मनिषा शितोळे
पती नचिकेत पुर्णपात्रे (2011)

सुरुवातीचे जीवनसंपादन करा

नेहाचा जन्म २७ जून रोजी पुणे येथे झाला. तिने ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे येथे आपले ग्रॅज्युएशन पुर्ण केले.

करिअरसंपादन करा

नेहा हिने २०११ मध्ये देऊळ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पोपट, दिशा आणि सुर सपाटा सारख्या चित्रपटात तिने काम केले. चित्रपटांसोबतच तिने फू बाई फू, तू तिथे मी, का रे दुरावा, कुंकू यांसारख्या मालिकेंमध्येसुद्धा आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने नेटफ्लिक्स सीरिज सॅक्रेड गेम्स मध्ये काटेकरबाई म्हणून आपले नाव कमावले आणि त्या कामामुळे तिला बिग बॉस मराठी २ची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत तिने दुसरे स्थान पटकावले.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Remember Katekar's Wife in 'Sacred Games'? Her Instagram Account is Meme Gold". News18 (इंग्रजी भाषेत). 2018-08-09. 2020-12-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Neha Shitole: Bigg Boss Marathi 2 is a great platform to showcase my personality". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-06-18. 2020-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ "Neha Shitole News | Latest News of Neha Shitole | Times of India Entertainment". timesofindia.indiatimes.com. 2020-12-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा