पोपट (शास्त्रीय नाव: Psittacula krameri, सिटाक्युला क्रामेरी; इंग्लिश: Rose-ringed Parakeet, रोझ-रिंग्ड पॅराकीट;) ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये आढळणारी पॅराकिटांची एक मोठी प्रजाती आहे. नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात.

पोपट (Rose ringed parakeet)
Psittacula krameri (es); شوگہٕ (ks); крамеров папагал (bg); Psittacula krameri (ro); 紅領綠鸚鵡 (zh-hk); halsbandsparakit (sv); Папуга Крамера (uk); 紅領綠鸚鵡 (zh-hant); Psittacula krameri (mul); গলমণিকা (as); Kolumpapago (eo); мал александар (mk); Psittacula krameri (an); সবুজ টিয়া (bn); Perruche à collier (fr); شوگہٕ (ks-arab); पोपट (mr); Psittacula krameri (vi); Krāmera papagailis (lv); Ringnekpapegaai (af); Мали александар (sr); Periquito-de-colar (pt-br); 红领绿鹦鹉 (zh-sg); halsbåndparakitt (nb); Rose-ringed Parakeet (en); درة وردية الطوق (ar); Krakperoked Kramer (br); ကျေးကျုတ် (my); 紅領綠鸚鵡 (yue); kis sándorpapagáj (hu); સૂડો (gu); papagai lepokodun (eu); Psittacula krameri (ast); cotorra de Kramer (ca); Paracît torchog (cy); Psittacula krameri (sq); Мали александар (sr-ec); 红领绿鹦鹉 (zh); Halsbânparkyt (fy); कण्ठे सुगा (ne); ワカケホンセイインコ (ja); Psittacula krameri (ia); Kalo (ha); باراكيت اخضر (arz); דררה מצויה (he); Psittacula krameri (la); गुलाबी-माला तोता (hi); kauluskaija (fi); Шӓргӓшӓн попугай (mrj); பச்சைக்கிளி (ta); Psittacula krameri (it); kaeluspapagoi (et); 紅領綠鸚鵡 (zh-tw); 红领绿鹦鹉 (zh-hans); Periquito-de-colar (pt); Tsídii yáłtiʼí bizééjíjinígíí (nv); Rose-ringed Parakeet (sco); alexandr malý (cs); Mali aleksandar (sr-el); گلابی گانی والا طوطا (pnb); alexander malý (sk); देसी सुग्गा (bho); Žieduotoji papūga (lt); Индийский кольчатый попугай (ru); گلابی گردن طوطا (ur); Psittacula krameri (ceb); Halsbandsittich (de); Psittacula krameri (war); Aleksandretta obrożna (pl); മോതിരത്തത്ത (ml); Halsbandparkiet (nl); طوطی طوق صورتی (fa); pearaicít rósbhráisléadach (ga); Alexanderparakit (da); Yeşil papağan (tr); Catorra de Kramer (gl); 红领绿鹦鹉 (zh-cn); Δακτυλιοειδής παπαγάλος (el); Parakeet coillaragh (gv) especie de ave (es); madárfaj (hu); وُپھٕ وُن جاناوار (ks); especie de páxaru (ast); птица из подсемейства настоящих попугаев (ru); Art der Gattung Edelsittiche (Psittacula) (de); speiceas éan (ga); 舊世界鸚鵡科環頸鸚鵡屬下的一種鳥類 (zh); spesies manok (mad); papegojfågel (sv); מין של עוף [משפ דרראיים] (he); spesies cicém (ace); भारतीय उपमहाद्वीप और उप-सहारा अफ्रीका में मिलने वाली एक तोते की जाति (hi); lintulaji (fi); druh ptáka rodu Psittacula (cs); பறவை இனம் (ta); specie di uccello (it); পাখি প্রজাতি (bn); espèce d'oiseaux (fr); sepésiyes manuk (jv); کٲلؠ طوطہٕ چھُ اکھ وُپھٕ وُن طوطہٕ زٲژ. (ks-arab); भिकारी (mr); ave da família dos psitacídeo (pt); putnu suga (lv); вид птахів (uk); druh vtáka rodu Psittacula (sk); art av papegøyefuglar (nn); ငှက် မျိ​ုးစိတ်များ (my); نوع من الطيور (arz); spesies burung (id); gatunek ptaka (pl); art av papegøyefugler (nb); spésiés manuk (su); вид птица (bg); spésiés kedis (ban); spesies burung (ms); soort uit het geslacht Psittacula (nl); species of bird (en); نوع من الطيور (ar); rhywogaeth o adar (cy); fugleart (da) Cotorra de Kramer (es); Perruche à collier rose, Psittacula krameri, perruche à collier (fr); Rose-ringed Parakeet, നാട്ടുതത്ത, Psittacula krameri (ml); Kaelus-väärispapagoi, Psittacula krameri (et); papagai lepokoduna (eu); Psittacula krameri (br); Cotorra de Kramer, cotorra de kramer (ast); Ожереловый попугай Крамера, Psittacula krameri (ru); بيبي متوه, البراكيت الأخضر, الباراكيت, الدرة المطوقة, براكيت أخضر, درة مطوقة (ar); Indischer Halsbandsittich, Neumanns Halsbandsittich, Abessinischer Halsbandsittich, Psittacula krameri, Kleiner Alexandersittich, Afrikanischer Halsbandsittich (de); Piriquito-de-colar, Periquito-de-kramer, Psittacula krameri, Piriquito-de-kramer, periquito-rabijunco, periquito-de-colar (pt); pearaicít mhuinceach, Psittacula krameri (ga); طوطی ملنگو, طوطی کوچک اسکندر (fa); Psittacula krameri (bg); Psittacula Krameri (sr); Psittacula krameri (tr); Psittacula krameri (lt); דררת קרמר, דררה ירוקה (he); Cotorres de Kramer, Cotorreta de Kramer, Psittacula krameri (ca); Psittacula krameri (sv); Psittacula krameri (pl); Psittacula krameri (uk); 玫瑰環鸚鵡, 環頸鸚鵡, 月輪 (zh-tw); Parrocchetto dal collare (it); Psittacula krameri (nb); Psittacula krameri (nl); Kaulanauhaparakiitti, Kaulanauhapapukaija, Kauluspapukaija, Psittacula krameri, Aleksanterinkaija, Sepelpapukaija (fi); Psittacula krameri, Ring-necked Parakeet (en); Kolumopsitako, Psittacula krameri, Kolumpsitako (eo); Alexander malý, Psittacula krameri (cs); செந்தார்ப் பைங்கிளி, பயற்றங்கிளி (ta)
पोपट 
भिकारी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
  Wikispecies
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारटॅक्सॉन
IUCN conservation status
Wingspan
  • ४५ cm
पासून वेगळे आहे
  • Psittacula eupatria
Taxonomy
क्लेडNeocoelurosauria
क्लेडManiraptoriformes
क्लेडManiraptora
ClassAves
SubclassNeornithes
SubclassNeognathae
SuperorderNeoaves
SuperorderPsittacimorphae
OrderPsittaciformes
SuperfamilyPsittacoidea
FamilyPsittaculidae
SubfamilyPsittaculinae
GenusPsittacula
SpeciesPsittacula krameri
Original combination
Psittacus krameri
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चित्रदालन

संपादन

माहिती

संपादन

सिट्टॅसिडी या पक्षिकुलात ज्या पक्ष्यांचा समावेश केलेला आहे त्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे ‘पोपट’हे नाव दिलेले आहे. या कुलात ८२ वंश आणि त्यांच्या ३१६ जाती दिसून येतात मॅको, लोरी, काकाकुवा, बजरीगार, पॅराकीट, कॉन्यर इत्यादींचा यातच समावेश होतो. पोपट बव्हंशी उष्ण कटिबंधात राहणारे आहेत; पण उपोष्ण आणि थंड प्रदेशातही त्यांचा प्रसार झालेला आहे

. त्यांचा उगम ऑस्ट्रेलियन प्रदेशात झाला असावा असे मानतात; तथापि त्यांचे प्रथम सापडलेले काही जीवाश्म (शिळारूप अवशेष) फ्रान्समधील असून ते दीड कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या जितक्या विविध जाती आणि प्रकार आढळतात तितके दुसरीकडे कोठेच आढळत नाहीत.हे पक्षी विविध रंगाचे व आकारमानाचे असतात; पण दिसायला व शरीर-रचनेच्या दृष्टीने ते सारखेच असतात. यांची लांबी १० सेंमी. पासून १०० सेंमी पर्यंत असते. चोच आखूड, मजबूत वा बाकदार असते. चोचीचा वरचा अर्धा भाग कवटीला जोडलेला असून तो थोडाफार हालविता येतो. मान आखूड व शरीर आटोपशीर असल्यामुळे हा गुबगुबीत किंवा स्थुल दिसतो. यांचे पंख मजबूत व गोलसर असतात. थोड्या अंतरापर्यंत हा अतिशय वेगाने जरी उडू शकत असला, तरी फार दूरवर याला उडता येत नाही. ऑस्ट्रेलियातील भूचर पोपटासारख्या काही पोपटांना तर जवळजवळ उडताच येत नाही. काही पोपटांची शेपटी फार आखूड तर काहींची बरीच लांब असते. पायाच्या चार बोटांपैकी दोन पुढे व दोन मागे असतात आणि त्यांवर बारीक खवले असतात. बहुतेक जातींच्या पोपटांचे रंग भडक असतात. हिरवा हा या पक्षांचा सामान्य रंग होय; पण पुष्कळ जाती बहुरंगी असतात. त्यांच्या शरीराचे निरनिराळे भाग लाल, पिवळे, हिरवे, निळे, काळे इ. रंगांचे असतात. नर व मादी यांचे रंग सारखेच असतात; पण याला काही अपवाद आहेत; उदा; ऑस्ट्रेलियातील इलेक्टस पोपटाच्या नराचा रंग हिरवा तर मादीचा तांबडा असतो.त्यांच्या बोटांच्या विशिष्ट व्यवस्थेमुळे ते झाडावर झपाट्याने चढू शकतात किंवा फांद्यांवर हिंडू शकतात. झाडांच्या खोडांवर चढतांना किंवा फांद्यांवर इकडून तिकडे जाताना ते आपल्या चोचीचा देखील उपयोग करतात. पण काही पोपट (उदा. ऑस्ट्रेलियातील पोपटांच्या काही जाती) मुख्यतः जमिनीवरच राहतात; पण जरूर पडेल तेव्हा ते झाडांवर चढून बसू शकतात व आपली घरटीही तेथेच करतात.पोपट मुख्यतः शाकाहारी आहे; पण क्वचित प्रसंगी काही पोपट किडेही खातात. निरनिराळे धान्ये आणि सर्व प्रकारची लहानमोठी फळे हे त्यांचे खाद्य होय. फुलातला मधही ते शोषून घेतात. कठीण कवचीचे फळ, एक पाय वर उचलून त्याच्या बोटात घट्ट पकडून, आपल्या चोचीने फोडतात व वरचे टरफल काढून टाकून आतला गर खातात. सबंध फळ ते कधीच खात नाहीत; फळाचा थोडासा भाग खाऊन बाकीचा टाकून देतात. अशा तऱ्हेने फळबागेची, शेतातील उभ्या पिकाची व झाडांवरीलमध असणाऱ्या फुलांची ते फार नासाडी करतात. ऑस्ट्रेलियातील नेस्टर नोटॅबिलिस या जातीचा पोपट मेंढीच्या पाठीला चोच मारून मेंढीच्या मूत्रपिंडापर्यंत जातो व त्यामुळे मेंढी मरते.

झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. बहुतेक जाती घरट्याकरिता बाहेरच्या कोणत्याही पदार्थाचा उपयोग करीत नाहीत. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी घालतात. ऑस्ट्रेलियातील रानटी बजरीगार मात्र ढोलीत किंवा भोकात थोडेसे गवत घालून घरटे बनवितात. अर्जेंटिनातील एका जातीचे हिरवे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतात. वसाहतीच्या स्वरूपाच्या या घरट्यात प्रत्येक जोडप्याकरिता एक स्वतत्र खोली असते. ऑस्ट्रेलियातला एका जातीचा भूचर पोपट जमिनीवरील गवताच्या झुपक्यात घरटे तयार करतो.

मादी प्रत्येक खेपेस २–५ अंडी घालते; कधीकधी त्यांची संख्या ८ पर्यंतही असते. ती सापेक्षतया लहान असून पांढरी असतात. सर्वसाधारणपणे तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती केवळ मासांच्या गोळ्यांसारखी असून दुबळी असतात. आईबाप आपल्या अन्नपुटातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहेर् काढून त्यांना भरवितात.

पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परंतु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात इतकेच नव्हे, तर दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामुळे पुष्कळ लोक पोपट पाळतात. आफ्रिकेतील काही जातींचे पोपट (उदा., सिटॅकस एरिथॅकस) फार स्पष्ट शब्दोच्चार करतात. इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. काही पोपट ८० वर्षे जगल्याचीही नोंद आहे.

सिटॅकोसिस हा व्हायरसजन्य रोग पोपटामुळे माणसाला होतो व त्यामुळे बरेच लोक पोपट पाळण्यास नाखूश झाले होते. हा रोग फक्त पोपटांनाच होतो असा पूर्वी समज होता; पण तो इतर पाळीव पक्ष्यांनाही होतो असे आता आढळून आले आहे. प्रतिजैव (ॲंटिबायॉटिक) औषधांच्या शोधांमुळे या रोगांचा प्रतिबंध झाल्याने पोपटाची लोकप्रियता पुन्हा वाढीस लागली आहे.

बजरीगार हा छोटा ऑस्ट्रेलियन पोपट जगातील सर्व देशांच्या बाजारांत थोड्या किंमतीला विकत मिळतो. पुष्कळ लोक या छोट्या गोजिरवाण्या पक्ष्यांची जोडपी पिंजऱ्यात पाळतात. बंदिवासात देखील याची वीण होत असल्यामुळे माणसाने याचा फायदा घेऊन अनेक रंगांच्या बजरीगारांची निपज केली आहे. या पक्ष्यांचा रानटी अवस्थेतील मूळ रंग गवती हिरवा असतो; पण हल्ली बाजारात गडद हिरवा, करडा, पिवळा, पांढरा, निळा, जांभळा इ. रंगांचे बजरीगार वाटेल तितके मिळतात.

पिकाची व फळांची नासाडी करणारा पक्षी म्हणून माणसाने यांची बेसुमार हत्या केल्यामुळे पोपटांच्या कित्येक जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही त्या वाटेवर आहेत. मॅस्करीन आणि त्याच्या जवळपासच्या इतर बेटांवर आज एकही पोपट शिल्लक नाही. अमेरीकेच्या संयुक्त संस्थानांच्या मध्य भागात एके काळी विपुल असणारा कॅरोलायना पोपट विसाव्या शतकात पूर्णपणे लोप पावला आहे. भारतातील जाती : भारतात पोपटांच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी तीन सर्वत्र आढळणाऱ्या असून बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशांपुरत्याचा मर्यादित आहेत.राघू : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. दाट पाने असलेले मोठाले वृक्ष जेथे असतील अशा सर्व प्रकारच्या प्रदेशांत हा राहतो. मनुष्यवस्तीतली मोठाली झाडे, बागा, आणि आसपासची शेते यांत तो वरचेवर येतो. साधारणपणे कबुतराएवढा हा असतो; रंग वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा; चोच लाल, आखूड, मजबूत आणि वाकडी; डोके मोठे; मानेच्या भोवती गुलाबी कडे असून पुढच्या बाजूला ते काळ्या पट्ट्याने चोचीच्या बुडाला जोडलेले असते; खांद्यावर तांबडा पट्टा; शेपूट लांब व टोकदार; मादीच्या मानेभोवती गुलाबी वलय नसते.यांची लहान लहान टोळकी किंवा मोठाले थवे असतात.ते उभ्या पिकांवर व फळबागेतील फळांवर हल्ला चढवून त्याची खाण्यापेक्षा नासधूसच जास्त करतात. धान्य किंवा फळे खात असताना मधून मधून ओरडून ते गोंगाट करीत असतात. यांचे उडणे जलद व डौलदार असते. ठराविक झाडीमध्ये रात्री झोपण्याकरिता यांचे थवे गोळा होतात व गोंगाट करीत करीत तेथे झोपी जातात. पुष्कळ लोक पिंजऱ्यात राघू बाळगतात व त्यांना बोलायला शिकवितात. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ डिसेंबर ते एप्रिल असतो.कीर : या पोपटाच्या आवाजावरून त्याला कीर असे नाव दिले असावे असे दिसते. याचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला क्रॅमरी असे आहे. मैदानी प्रदेशात व डोंगरांवर १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो. विरळ जंगलांत, शेतांत, त्याचप्रमाणे गावांत व खेड्यांत हा नेहमी आढळत असल्यामुळे हा सगळ्यांच्या माहितीचा आहे.सांळुकीपेक्षा हा मोठा असतो. राघूची ही लहान आवृत्ती असते, असे म्हणावयास हरकत नाही; परंतु याच्याखांद्यावर राघूप्रमाणे तांबडा पट्टा नसतो; मादीच्या मानेभोवती नराप्रमाणे गुलाबी काळे वलय नसते. सामान्यतः हा झाडावर असतो; पणपण कधीकधी भक्ष्य मिळवण्याकरिता तो जमिनीवर उतरतो. राघूप्रमाणेच यांचे थवे असतात व ते शेतांत व बागांत नासधूस करतात. राघूप्रमाणेच यांचे थवे दाट झाडीमधील ठराविक झाडांवर रात्री झोप घेतात. उडताना किंवा बसला असताना हा कर्कश आवाज काढीत असतो.पुष्कळ लोक हा बाळगतात. हा बोलायला शिकतो; त्याचप्रमाणे कसरतीचे बरेचसे खेळ, बंदूक उडविणे, मशाल वाटोळी फिरविणे वैगेरे खेळ त्याला शिकविले, तर तो ते करून दाखवतो. प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत असतो.तोता : या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हा मुख्यतः अरण्यात राहणारा असला, तरी लागवडीखाली असलेल्या झाडीच्या प्रदेशातही हा आढळतो. हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. तोता साळुंकीएवढा असतो. बांधा सडपातळ व शेपटी लांब, टोकदार असते; नराचे डोके निळसर तांबड्या रंगाचे; मानेभोवती हनुवटीपासून निघालेले बारीक काळे वलय; खांद्यावर मोठा तांबडा डाग; शेपटीची मधली पिसे निळी व त्यांची टोके पांढरी; मादीच्या डोक्याचा रंग निळसर करडा; मानेभोवती पिवळ्या रंगाचे वलय; खांद्यावर तांबडा डाग नसतो. चोच शेंदरी रंगाची असते.दाट जंगलात यांचे थवे आढळतात. बी व रानफळे हे यांचे मुख्य खाद्य होय. राघू किंवा कीर यांच्यापेक्षा हा जास्त वेगाने उडतो. याचा आवाज ‘ट्युई ट्युई’असा काहीसा असून मंजूळ असतो. इतर पोपटांप्रमाणे हा पिंजऱ्यातून बाळगीत नाहीत.यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत असतो.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत