वैशाली भैसने-माडे या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे २४ ऑगस्ट १९८४ रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केलेय. लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती चाहती आहे.[१]

वैशाली माडे
वैशाली भैसने माडे.jpg
वैशाली माडे
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

माडे या दूरचित्रवाणीवर २००८ साली झालेल्या ’सारेगमप’ या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेत्या ठरल्या. हिंदी सारेगमप या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसेच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.[२]

'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेले गाणं गाजले. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेय. तसेच तिने 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायले आहे. मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीम गीते गायली आहेत.[३]

पुरस्कारसंपादन करा

  • सोलापूरच्या दमाणी पटेल प्रतिष्ठानचा कर्मयोगी पुरस्कार (फेब्रुवारी २०१६)
  1. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.
  2. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.
  3. ^ "गायिका वैशाली माडे लवकरच राजकारणात; 'या' पक्षात करणार प्रवेश". Maharashtra Times. 2021-04-03 रोजी पाहिले.