आदिश वैद्य हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. तो नागिन, बॅरिस्टर बाबू आणि साम दाम दंड भेद या दूरचित्रवाणी कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. त्याने २०१५ मध्ये जयोस्तुते या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आदिश मूळचा मुंबई, महाराष्ट्राचा आहे.[]

आदिश वैद्य
जन्म ५ ऑक्टोबर, १९९२ (1992-10-05) (वय: ३२)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१६ - चालू
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी ३
रात्रीस खेळ चाले

कारकीर्द

संपादन

आदिशने मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम जयोस्तुतेमध्ये एका एपिसोडिक भूमिकेने आपल्या कारकीर्दची सुरुवात केली. या शोनंतर, तुमचं आमचं सेम अस्तं, रात्रीस खेळ चाले, जिंदगी नॉट आऊट, कुंकू टिकली आणि टॅटू इत्यादी अनेक मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रममध्ये काम करण्याची संधी मिळाली. एकता कपूरच्या प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रममधून त्याने हिंदी दूरचित्रवाणी इंडस्ट्रीत पदार्पण केले. 2018 मध्ये नागिन सीझन 3. या शोने आदिशला दूरचित्रवाणी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्धी मिळवून दिली, त्यानंतर तो बॅरिस्टर बाबू, साम दाम दंड भेद आणि घूम है किसी के प्यार में मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.[]

वैयक्तिक जीवन

संपादन

आदिश वैद्य सध्या अभिनेत्री रेवती लेलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. झी युवा टीव्ही शो जिंदगी नॉट आऊटच्या अभिनय सेटवर त्यांची पहिली भेट झाली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Adish Vaidya (Actor) Height, Weight, Age, Biography, Affairs & More". The Wiki (इंग्रजी भाषेत). 2021-06-15. 2022-04-29 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठी बिग बॉसमधून आदिश वैद्य बेघर; प्रेक्षक म्हणाले..." Maharashtra Times. 2022-04-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Adish Vaidya enjoys romantic holiday with beau Revati Lele in Udaipur - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-29 रोजी पाहिले.